Sunday, October 27, 2019

कोवळीक (भाग १)

रिमझिम बरसणारा तो पाऊस मनाला वेड लावत होता . बालपणाला मागे टाकून तिने नुकतच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होत . वसुधा दहावीची परीक्षा पास करून यावर्षी अकरावीला गेली होती . मोहरण्याच वय होत तिचं . ती जेव्हा कॉलेजला आली तेव्हा हे सगळं नवीन जग पाहून तिला काय करावं आणि काय नाही असं झालं होत . एकतर त्यांच गाव लहान होत तिथून इथ या शहरात ती पहिल्यांदाच आली होती . आपलं गाव आणि गावातली शाळा यापलीकडे जग तिने पाहिलं नव्हत . आणि आता एकाएकी अशा मोठ्या शहरात आल्यावर तिला सुरवातीला फारच वेगळ वाटायच . पण आता ती सरावली होती . सरी आणि राधा पण तिच्यासोबत  होत्या . त्यामुळे तिला जरा आधार वाटायचा . सुरुवातीला शहरातल्या मुली त्यांच्यात मिसळायच्या नाहीत . पण आता हळूहळू त्या मैत्रिणी होऊ लागल्या होत्या . इकडे येऊन त्यासुद्धा बदलल्या होत्या , त्यांचं राहणीमान बदललं होत . ड्रेस , हेअर स्टाईल मॉडर्न बनत होती . त्या मोकळेपणानं जीवन जगू लागल्या होत्या . अशाच एक दिवस त्या कॉलेजमधून निघाल्या होत्या आणि अचानक एक बाईक वेगात त्यांच्या शेजारून निघून गेली . तिघीही घाबरल्या .
" अगं कसली घाबरले मी . " - राधा
त्या त्यातून सावरत होत्या तेव्हढ्यात सरी म्हणाली
" अगं हे पोरग गेल्या काही दिवसापासून आसपास दिसतय बघ . "
" तुझी लय नजर बघ पोरांवर " राधा तिला चिडवत म्हणाली .
" अगं किती जोरात गेला तो , आम्हाला तर कळलं पण नाही . " - वसुधा
" अगं आज चेहरातर मी पण नाही पाहिला पण तसच कीडमिडं आणि केसाची तशीच स्टाईल . " - सरी
" अगं , तुझ्यावर लाईन मारतोय काय ? " - राधा
" वाटतय तर तसच पण नक्की कोणावर हे मात्र माहीत नाही . " - सरी
आतामात्र वसुधा आणि राधा कावऱ्याबावऱ्या झाल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या .
" आपण आप्पांना सांगूया का ? " - वसुधा
" काय सांगणार ? " - सरी
" हेच . ते पोरगं ... " - राधा
" अजून आपल्यालाच नक्की माहित नाही आणि त्यांना काय सांगणार आपण ? " - सरी
" आता आपण काय करायचं " राधा रडवेली झालेली .
" ए रडके गप अजून कशात काय नाही . जरा वाट बघू ते पुढ काय करतय का पाहू . मग पुढ ठरवू काय करायच ते . पण तोपर्यंत तिघींनी सोबतच राहायच . " - सरी
" अगं मग त्याला काय वाटत असल तर नक्की कुणाबद्दल वाटतंय हे कस कळणार . " - वसुधा
" बया... हित माझ्या काळजाचं पाणी पाणी झालय आन हिला पडलय कुणाच्या माग हाय ते " - राधा
" अगं तुला तसलं करायच हाय का ? " - सरी
वसुधाने मानेनेच नकार दिला .
" मग कशाला नसती बिलामत . माझं तस काही नाही . " - सरी
" आणि माझंपण नाही . " राधाने स्पष्ट केल .
" अगं तिघींनाही त्या वाटेला जायच नाही . मग कशाला कोणासाठी फिरतंय . आता वाट बघू त्यानं काय केलं तर मग पुढच पुढ ठरवू . " - सरी
हि गोष्ट सर्वांना पटली .
पुढचे काही दिवस ते पोरगं त्यांना मधून मधून दिसायचं . पुढे पुढे त्याच दिसणं वाढतच गेल आणि त्याच जवळ येणही . आधी त्या बिचकायच्या पण हळूहळू त्या सरावल्या .
एक दिवस वसुधा दुकानात गेलेली आणि राधा आणि सरी तिची वाट बघत होत्या . तेव्हढ्यात सरीला आठवण झाली कि तिला एक पुस्तक बघायचं होत . ती राधाला चल म्हणाली पण राधा म्हणाली
" मी दमलेय फार आज . मी बसते तू ये जाऊन . "
" हं आत्ताच वय झालं बघ राधे तुझं . हितं तर जायचय अन तू नाय म्हणतीय . " - सरी
" तू जा बाई सरे . एव्हढच अंतर हाय पण सगळा चढ हाय . म्हणून तर मघाशी नाय बोलले वसुधा बरोबर . " - राधा
" बर तू बस " म्हणत सरी गेली .
राधा तिथेच एका कट्ट्यावर बसली . क्षणभरच ती बसलेली तेव्हढ्यात तिला मागून आवाज आला . तिने वळून पाहिलं . तोच मुलगा होता . तो पुढे आला आणि म्हणाला
" लवशीप देतीस का ? "
राधानं रडायला सुरुवात केली .
" ए रडू नको कि " त्या मुलानं तिला विनंती केली .
राधा रडतच होती .
" ए थांब कि . रडू नको कि . " त्यानं परत तिला थांबवायचा प्रयत्न केला .
" तुला काय करायचाय मी रडीन नाहीतर कायपन करीन . " राधा रडतच म्हणाली .
" अगं पण ते नाकात शेंबूड आलाय कि . " त्यानं तिच्या नाकाकडं हात दाखवत सांगितलं .
" असू दे माझं नाक आहे . आन माझा शेंबूड आहे . तुला काय करायचंय ? " ती तशीच रडत बोलली .
" अगं पण तो शेंबूड वहात वहात तोंडात चाललाय कि . " त्यानं असं म्हटल्यावर तिने मनगटानच शेंबूड पुसला .
त्यानं तिला रुमाल दिला .
" काय नको तुझा रुमाल . " ती त्राग्याने म्हणाली .
" अगं हात भरलाय तुझा . पुसून घे . " तो तिला समजावत म्हटला .
" पुसून काय तू जपून ठेवणार आहेस का रुमाल ? " तिचा राग अजून कमी झाला नव्हता .
" धुवून वापरीन मी तो रुमाल परत " त्यानं असं म्हटल्यावर तिने तो रुमाल घेतला व आपलं मनगट आणि नाक पुसून घेतलं आणि घडी करून तो रुमाल त्याला दिला .
" नीट घे हात भरलं "
" असू दे " म्हणत त्याने घडी करून तो रुमाल खिशात ठेवला .
" थँक्यू " ती म्हणाली .
" वेलकम " त्यानं उत्तर दिल आणि विचारलं " पण तू अशी रडायला का लागलीस ? "
" मग तू असा डायरेक्ट येऊन म्हणला मग "
" हे बघ मला तू आवडतीस अन म्हणून तुझ्याकडे लवशीप मागितली . आता जे मनात हाय ते सांगाय नको ? "
" आमच्या घरी असल चालत नाय "
" अन आमच्या आबानं तर आमाला लवशीपच लायसनच दिलय ना "
" कुटला हाईस तू ? "
" का ? "
" कसल बुलतूय . आमच्याकडं कोण बोलत नाय असं . "
आता तोही निवांत कट्ट्यावर बसला होता . असच वेगवेगळे विषय निघत होते . आणि दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या .
तेव्हढयात वसुधा आणि सरी तिथे आल्या .
त्या दोघांना बोलताना बघून दोघीही आश्चर्यचकित झाल्या .
" बघितलस का कशी साळसूद असल्यासारखी दाखवती आणि कशी बसलीय गप्पा मारत . कधीपासून सुरु हाय काय माहित हिज " - सरी
" अन आपल्यालापण नाही बोलली काही " - वसुधा
" गपचूप गपचूप चालल असणार म्हणून तर आली नाय आपल्याबर " - सरी
" आता बोलत्यात तर बोलू दे " - वसुधा
" काय बोलत्यात तर बोलू दे ? आधीच उशीर झालाय आता आजून थांबलो तर हि यष्टी पन जाइल . मग पुढची यष्टी लवकर नाही . " असं म्हणत तिने राधाला हाक मारली . राधाने वळून पाहिलं मग त्याच्याशी काहीतरी बोलली आणि निघाली . निघताना तिने त्या मुलाला टाटा केला .
" अगं कसला भारी हाय रव्या " - राधा
" कोन ? " - सरी
" त्यो न्हाय का आता गेला . अगं कसल बोलतय असं वाटतय ऐकतच राहाव  " - राधा
" असं काय बोलला गं ? " - सरी
" अगं लय कॉमेडी बोलतय . मला तर किती बोलावं असं झालेलं " - राधा
" ए काय ठरलेलं आपलं ? " - सरी
" अगं तो आला न मला म्हनला लवशीप देतीस का ? " - राधा
" अन तू हो म्हनलीस ? " - सरी
" मी त्याला म्हनल आमच्याकडं असं नाय चालनार . पन ते लयच भारी बोलत होत . मग मी त्याला फ्रेंडशिप दिली . " - राधा
" आता तू पोरांसोबत फ्रेंडशिप करनार वय ? " - सरी
" अगं सगळ्या पोरांसोबत नाय फक्त त्याच्या सोबत " - राधा
" बग लय अवघड जाईल तुला " - सरी
" नाय होत काय " - राधा
" हं कळलं कळलं " - सरी
" अगं चला आता लवकर यष्टी जाईल " - वसुधा अशी बोलली आणि आता मात्र तिघी पळतच निघाल्या स्टॉपकडे .

...क्रमशः

Saturday, October 26, 2019

लव्हर्स पाईंट

" सोन्या जरा डोक्यात बघ ना लय वळवळतय . तुला भेटायला लय आसुसले होते पण हे डोकं थंड बसूच देत नव्हतं . तासभर फनी केली पण काय फरक नाय पडला बघ . एकदा तू प्रयत्न करून बघ कि , काय माहित तुझ्या प्रेमाच्या स्पर्शातून सगळं मोकळं होईल . " पिंकीच्या डोळ्यात ती वेदना आणि मनात ते दुःख जाणवत होत जी ती डोकं खाजवून शांत करण्याचा प्रयत्न करत होती .
" थांब प्रिये तुझा छान भांग पाडतो . तुझ्या केसातल्या सगळ्या उवा काढतो . " बंड्या एव्हढच बोलला आणि कामाला लागला  . शांतपणे तिच्या डोक्यातली एक-एक बट मोकळी करून तिच्या डोक्यातली एकेक ऊ हळूहळू तो बाजूला करू लागला .  त्याच काम मनोभावे चालल होत .

त्या दोघांपासून थोड्या अंतरावर सुमी बसली होती . सुमी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती . तिचा बॉयफ्रेंड सागऱ्या तिला त्यांच्याकडे तस बघताना बघून म्हणाला
" अय काय चाललंय तुझं ? हित तुझ्यासाठी आलुय मी न तू तिकडंच बघत बसलीस . "
ती म्हटली ," तिकडं बघ कि त्यो कसा प्रेमानं तिच्या डोक्यातल्या वा ती काडतूय . कसलं प्रेम असल . "
त्याला रागच आला तिचा . आणि म्हटला
" असलं असतय व्हय गं प्रेम . वा काढणं म्हणजे काय प्रेम झालं का ? मी सांगू का तुला कस असत प्रेम " असं म्हणून त्यानं तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला . ती म्हटली
" अय थांब जरा . हो बाजूला . आधी ती तोंडातली गायछाप थूक . त्याच्यामुळं गेल्या वेळेला मला चक्कर यायला लागली हूती . "
तिचा हा हल्ला त्याच्या मनाला लागला आणि तो कळवळून म्हणाला
" अय गायछापला नावं नाय ठेवायची . गायछाप हाय म्हणून आपण हाय . पण एक सांग तुझा ब्रँड कुठला . "
सुमीला काय कळेना हा असं का विचारतोय ती बावरून त्याला म्हणाली
" मी कुठं तंबाकू खाती ? मी फक्त मशेरी लावती . "
" अगं मशेरी काय अन तंबाकू काय , काय फरक नसतो . ये अशी जवळ . अशी जवळ आली म्हणजे तुलापण सवय हुवून जाईल तंबाकूची . " असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतलं .

शेजारीच बसलेल्या बज्यान ते बघितल अन त्यानं धनीला सांगितलं
" बघ धने कस चाललंय त्यांचं अन तू बसलीय लांब आपली तिकडं . "
धनीन लगेच थोडं दूर होत त्याला सांगितलं
" अय बास कर कि बाबा तुझं . तुला त्याच्याशिवाय दुसरं काय सुचत का ? कधी आलं कि तुझं तेच . दुसरं काय नको बोलाय नको काय नगो सारक तेच "
" अगं त्याच्याशिवाय कुठं मजा हाय . " बज्या तिला समजावत म्हणाला .
" बस कर एकदा सुरु झाला कि किती वेळ चालत तुझं काय थांबत नाय . " सुमी तक्रारीच्या सुरात म्हणाली .
" गप असं नसतय काय . " - बज्या
" राहू दे मी काय ऐकायची नाय . " सुमीनं परत नकार दिला .
पण त्यानं काय ऐकल नाही तिच . आणि तो जबरदस्तीच तिला कीस करू लागला . बराच वेळ त्यांचा कीस चालू होता . त्याच्यानंतर तो तिच्याकडे प्रेमाने पाहून म्हटला
" धने मी तुझ्या तोंडातल चिंगम खाल्ल . "
धनी जराशी लाजली आणि म्हणाली
" चिंगम नव्हत काय ते जरासा शेंबूड आला होता . "
तो एकदम चिडला आणि म्हटला
" अगं काय ? तुला काय कळत का नाय ? शेंबडे ... आधी नाक शिकरून करशील का नाय कीस "
ती म्हटली
" मग शिकारल होत कि मघाशी पण तुझं काय थोडक्यात उराकत वय ? मंग आला थोडा . अन त्याला काय होतय ? गर्लफ्रेंडच सगळ गोड लागत अन शेंबूडच काय गोड लागत नाय वय "
" हं तर तर लय हाय शानी शेंबडे "
" तुला सांगू बज्या मला ना दिवसभर तुझीच आठवण येते आणि वाटत कधी येऊन तुला भेटेल आणि तुझ्याशी किती बोलेल अन तुझं मात्र हे असं सुरु असत बोलत जा कि . "
" अगं धने तुजा आवाज लय गोड हाय . त्यामुळे बोलण्यापेक्षा तुला ऐकत राहावं असं वाटत . "
" खरं "
" हो ग माझ्या धने "
" पन मग मला एक सांग तुला इतकं बोलायचं असत आन तू लगीच कशी जातीस . "
" अर मला पण वाटत कि इथून जाऊच नये पण घराची विचारत्याती कि . आन हे चिम्पाट घेऊन यायचं म्हनलं कि ती गुड मॉर्निंग पथक वाली कुठ भेटत्याल त्याचा काय नेम नाय . आणि वर आई पण म्हणती धने कमी खात जा इतका वेळ लागतो तुला झेपलं इतकंच खा . असं म्हणून दोन दिवस १ चपातीच देतीय . माझं मी कस सहन करते आहे माझं मला माहित आहे . "
" अगं धने अजून थोडे दिवस मग तुला नाय त्रास होणार "
" खरंच . "
" हो गं माझी रानी . "

तिकडं बंड्याच्या बराचश्या उवा काढून झाल्या होत्या . पिंकी म्हणाली
" बास कर आता . फूडच्या वेळेला येईन तेव्हासाठी असू दे कि . "
" म्हणजे तू निघालीस . "
" नाही निघाले  लगेच पण आता उवा काढायचं बास . "
बंड्या आता उवा काढायचं थांबवून पिंकीच्या केसातून हात फिरवत होता .
" तुला सांगू बंड्या मला असं वाटतं ... मला असं वाटत "
" काय वाटत पिंके ? "
" मला असं वाटत माझे केस असावे , तुझा हात असावा आणि आयुष्यभर तू अशाच उवा काढत बसावा . "
" हो गं पिंके किती भारी स्वप्न आहे गं तुझं . हे स्वप्न नक्की खर होणार . "

इकडे सुमीच डोक गरगरायला लागलं होत .
" सागऱ्या तुला किती वेळा सांगितलं ती गायछाप नको चक्कर येतेय बग . "
" अगं सुमे होईल सवय तुला पण असं गायछापला नाव ठेऊ नये . अगं असा एकदा बार लावला कि कशी ब्रह्मानंदी टाळी लागते . "
" मजी रं . "
" अगं म्हणजे मग कितीबी काम असलं तरी दमायला होत नाही . "
" बर बर . भारी हाय तुझं . पण यगदा माझ्या बाबाला य कि भेटायला . आपलं कधी सांगणार . "
" अगं सांगणारच कि . ह्यो पट्ट्या घाबरतो कि काय कुणाला . "
ती कौतुकानं म्हणाली " तर तर ... "

" काय गं धने तुला सारखी सर्दी कशी होते गं . सगळी तुला शेंबडी धनी म्हणतात कि . "
" अं समदी म्हणू दे पण तू नको म्हणू . "
" अगं प्रेमान म्हणतो मी . प्रेमाचं बोलणं असं नाकारायचं नसत . "
" बर मग म्हण . "
" ए शेंबडे , माझ्या शेंबडे धने . "
त्याच्या अशा हाक मारण्यान धनी आनंदानं न्हाऊन निघाली आणि म्हणाली
" तुला काय सांगू तू असं प्रेमान मला शेंबडे म्हणतो ती मला कस गलबलून आलय . "
" होय . "
" अर कसचं गलबलून आलाय . मी जाऊन येऊ का चिंपाट घेऊन पाच मिनटात . "
" तुज काय गं . कधी कुठल्या वेळी काय सुचलं काय सांगता येत नाही . येताना जाऊन नव्हती का आलीस . "
" कुठं तू गडबड केली ती तशीच आले . "
" बर जा . "

तोपर्यंत एकच गलका झाला
" अर गुड मॉर्निग पथक आलं . "
सगळ्यांनी पळायला सुरुवात केली . धनीपण चिंपाट सावरत निघाली .
" अगं टाक ते चिंपाट "
" ऊं म्हणं टाक चिंपाट . आय जोड्यान हानल . आमच्या आज्ज्यापासन चिंपाट हाय ते . "
" बर घे ते चिंपाट आन पळ . "

Wednesday, October 23, 2019

अनुराधा (भाग २ )

सोमवारी म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी असा उशीर होण तिला ठीक वाटत नव्हत पण काय करणार ? आज एकतर सुधा उशिरा उठली आणि परत तिचं आवरता आवरता अनुला उशीर झाला होता . आणि असा उशीर झाला की मेली बसपण वेळेवर मिळत नाही . आता जर बस नाही मिळाली तर उशीर हमखास होणार म्हणून तिने त्रासिकपणे एकवार रस्त्यावर दूरपर्यंत नजर टाकली पण बसचा काही नामोनिशान नाही . तितक्यात एक बाईक तिच्याशेजारी येऊन उभी राहिली . तिने चमकून तिकडे पहिले . त्याने त्याच्या हेल्मेटची काच वर केली आणि म्हणाला
" बसची वाट पाहत थांबाल तर लेट व्हाल , बसची स्ट्राइक आहे आज . "
" असं कस ? कुठ बातम्यांमध्ये सुद्धा नाही , अशी अचानक कशी होईल स्ट्राइक ? " अस म्हणत तिने दूरवर नजर टाकली .
" त्यांच्या कर्मचाऱ्यासोबत काहीतरी घडल . बहुदा मारहाण वगैरेही झाली त्यामुळे अचानक बंद पुकारला त्यांच्या संघटनेने आत्ताच . ग्रुपवर आल आहे . "
" ओह ,  मग उशीर होणार . "
" मी तुम्हाला सोडू का ? "
" नाही नको . "
" अहो आपण एकाच ऑफिस बिल्डिंगमध्ये काम करतो . ' अहर्निश टॉवर ' मध्येच माझही ऑफिस आहे 14th फ्लोअरवर . "
" ओह , माझ्या लक्षातच नाही आलं . " तिने त्याला निरखून पाहिलं पण एकतर त्या उघड्या काचेतून दिसणारा त्याचा एव्हढासा चेहरा त्यामुळे तिला त्याला पाहिल्याच आठवेना . पण तिने त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला . काय माहित काय पण त्याचे डोळे पाहून तिला काहीतरी जाणवलं होत आणि ती तयार झाली होती . पण अचानक तिने एक शंका बोलून दाखवली . ते पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट लागत ना ,  ट्राफिक रूल्समुळे . तुम्हाला फाईन होईल ना . "
" नाही होणार . कोणीतरी सोबत असतंच नेहमी त्यामुळे मी नेहमी एक्स्ट्रा हेल्मेट सोबत ठेवतो . " असं म्हणत त्याने ते एक्स्ट्राच हेल्मेट तिच्यासमोर धरल . तिने ते पाहिलं आणि विचार केला ,
' यामुळे केस बिघडतील . '
त्याने तिच्या मनातलं ओळखून म्हणाला
" स्कार्फ बांधा केसांना खराब नाहीत होणार . "
" पण मी स्कार्फ युज करतानापण तो कधी केसांना नाही बांधत . बांधलातर फक्त चेहऱ्यावर बांधते . "
" बांधा हो एव्हढ्या काही ऊवा वगैरे थोडीच आहेत जे त्यात जातील . "
क्षणभर स्माइल आल तिच्या चेहऱ्यावर , पण पुढच्याच क्षणी ती सावरून म्हणाली
" तस आपण आज पहिल्यांदाच भेटतो आहोत आणि इतक म्हणजे फार जास्त होतंय अस नाही वाटत का तुम्हाला . "
" त्याच काय घेऊन बसला आहात . कधीकधी काही लोकांसोबत आयुष्यजरी काढल तरी त्यांना नाही ओळखता येत आणि काही लोकांसोबत काही वेळातच खूप छान जमत . "
" खर आहे तुमचं " म्हणत तिने स्कार्फ बांधला व हेल्मेट चढवलं आणि ती गाडीवर बसली . इतक्या ट्रॅफिकमध्ये ते दोघे काहीना काही विषयावर बोलत होते . अगदी सहज बोलणं होत होत खूप दिवसांची ओळख असल्यासारखं . तिला मधेच जाणवल आपण कित्येक दिवसात कुणाशी इतकं बोललोच नाही . त्यांची ऑफिस बिल्डिंग आली . ती उतरली आणि म्हणाली
" आता हि दोन-दोन हेल्मेट कुठे ठेवता . "
" इथे पार्किंगमध्येच काही लॉकर्स अव्हेलेबल आहेत तिथे ठेवतो . "
" असही आहे काही इथे ? "
" अहो खूप काही आहे तुमचं लक्ष कुठे असत . "
तिने हलकेच स्माईल दिली . त्याने हेल्मेट काढल्यावर तिने त्याला पाहिलं . काहीतरी होत त्याच्यात जे ओळखीचं वाटत होत .
" तुम्ही जा पुढे तुम्हाला उशीर होईल " म्हणून तो गाडी पार्क करायला गेला .
ती गडबडीने लिफ्टपाशी गेली . लिफ्ट आली ती आत शिरली बाकीचेही आत येत होते . तिची नजर अजूनही वाट पाहत होती . डोअर क्लोज होता होता तिला तो येताना दिसला . तिचा हात अभावितपणे थोडा वर झाला होता . तिने इकडे  तिकडे पाहत तो पटकन खाली घेतला . ती चेंज होणाऱ्या फ्लोअर नंबरकडे पाहत होती . आठ नंबर गेला पण लिफ्ट नाही थांबली तिने चमकून पाहिलं तर आठ नंबर ऍक्टिव्ह नव्हता . तिने बटणच नव्हतं दाबल . नाही नंबर तर प्रेस केला होता . मग . तिची नजर थोडी पुढे गेली १४ वा फ्लोअर ऍक्टिव्ह दाखवत होता . लिफ्टमध्ये थांबली पण ती नाही उतरली . लिफ्ट १४ व्या फ्लोअरवर थांबली तेव्हा ती बाहेर आली . बाहेर येणारी ती एकटीच होती म्हणजे ते बटन तिनेच प्रेस केल होत . इतक्यात वरून लिफ्ट आली ती आत गेली  आणि परत आपल्या आठव्या फ्लोअरवर पोहोचली . दिवसभर तिच्या मनात काहीतरी सुरु होत . तीच कशातच लक्ष लागत नव्हतं .
संध्याकाळी ती निघाली होती आणि अचानक गाण्याच्या ओळी तिच्या कानावर पडल्या .
' जीव भुलला , रुणझुणला का असा सांगणा रे श्वास हा गंधाळला . '

  ..... क्रमशः

Saturday, October 19, 2019

लग्नगाठ

" अहो, लहान आहे पोरगी , एव्हढात कस ? " आईला आपल्या मुलीची काळजी वाटत होती .
" एव्हढ्यात अगं अठराची झाली कि ती आता . " आज्जी समजावत म्हणाली .
" पण अजून शिक्षण चाललंय तिचं . "
" ते काय तिकडेही होईल कि पूर्ण . "
" पण... "
" पण नको आणि काही नको . "
" बर होऊ द्या तुमच्या मनासारख . "

Sunday, October 13, 2019

प्रिया

" सर आम्हाला पण शिकवा कि हे "
" काय शिकवायचं आहे ? "
" हेच जे तुम्ही दिवसभर करत असता . "
" हे कुठ काय . काम आहे माझं तेच चालत दिवसभर . "
" तरीही दिवसभर तुमच्या तालावर सगळ ऑफिस चालत "
" अस का "
" तुमच्या इथून गेल्याशिवाय काम होत नाहीत . "
" हो ते खर आहे . माझी पोझिशनच अशी आहे कि तुम्हा सर्वांना इथून जाव लागत ना . "
" हो तर "
" बर तुझ काम झाल का ? "
" नाही ना . आता नविनच आले आहे अजून तितकस नाही जमत काम व्यवस्थित . पण मी लवकरच शिकेन . मी खूप फास्ट आहे त्यात . "
" बर मग पहिला रिझल्ट कधी देते आहेस ? "
" सध्यातरी काही नाही . पण लवकरात लवकर देईन मी रिझल्ट . "
" ऑल द बेस्ट "
==========================================================
" अरे कुठल्या बेसीसवर घेतात यांना काही माहित नाही . इतक विचित्र बोलतात क्लायंट सोबत कि काय विचारायची सोय नाही . "
" अरे अस का म्हणतोय अजून काही एक्सपिरिअन्स नाही त्यांना . थोडा वेळ जाऊदे मग करतील . "
" सुमित, तुझा भारी सपोर्ट असतो हा या सगळ्यांना . "
" अरे असायलाच हवा . थोड एन्करेज तर करू शकतो ना आपण यांना . "
" तुला अजून व्यवहार नाही कळत सुमित . हे सगळे गोडबोले आहेत फक्त . त्यांच त्यांच काम कसही करून काढून घ्यायच एव्हढच माहित आहे यांना . "
" अस कस असेल सगळेच कसे असतील असे ? "
" हो मान्य आहे सगळेच नसतील असे पण काही तर नक्की आहेत आणि कोण अस आहे आणि कोण नाही हे समजायला इतक सोप नाही . "
" हो हे खर आहे . ज्याचा त्याचा स्वभाव . तो आपण नाही बदलू शकत . तेच माझ आहे . मलाही चांगलच वाटत त्यांना सपोर्ट करण , म्हणून तर करतो . बाकी काही नाही . "
" हो तुला सांगितलं तरी तू काही सुधारणार नाहीस सुमित . "
==========================================================
कामातून थोड मोकळ करणारा ब्रेक मिळाला आणि सगळे चहा कॉफीचा स्वाद घेत गप्पामधे मग्न होते . सुमित निवांतपणे खिडकीतून बाहेर पाहत कॉफीचा स्वाद घेत होता . तितक्यात त्याला पाठीमागून कुणीतरी हाक मारली . त्याने माग वळून पाहिलं . प्रिया उभी होती आणि त्याला आवाज देत होती .
" काय कुठ आहे लक्ष ? "
" काही नाही ग थोड निवांतपणे बाहेरचा निसर्ग पाहत होतो . "
" इथं इतके लोक आहेत आणि तुम्ही असे एकटे एकटे का ? "
" कस आहे प्रिया दिवसभर काम आणि बाकी सारं असत त्यातून असा स्वतःसाठी वेळच नाही मिळत . असा वेळ मिळाला कि थांबतो मग स्वतःसोबत . तुही वेळ घालवत जा स्वतःसोबत थोडातरी चांगलं वाटेल . "
" तुमच्यासारखं मला नाही जमणार . मला एकट राहिलं कि त्रास होतो . काही जुन्या आठवणी छळू लागतात . "
" एव्हढ काय आहे ? "
तेव्हढ्यात ब्रेक संपला आणि सगळे जाऊ लागले . प्रियाही जाऊ लागली .
" प्रिया सांगितल नाहीस . "
" सांगेन. नक्की सांगेन पण आत्ता जाव लागेल . "
=============================================================
त्या दिवशी वेळ होता आणि आता सर्व सविस्तर विचारता येईल प्रियाला म्हणून तिच्यासमोर तो विषय काढला .
" तुम्हाला एक बोलू तुमच्या समोर मन मोकळ करते म्हणून जरातरी ठीक आहे पण  कधी कधी अस वाटत कि जीव द्यावा "
" जीव द्यायचा आहे तुला सोप आहे बघ हि खिडकी आहे बघ बरीच उंचावर इथून उडी मारलीस कि सगळ संपल पण कस आहे आता जी तू इथं उभी आहेस ते काही एका दिवसात झालेलं नाही . त्यासाठी तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं असेल . आणि जवळपास २-२.५ किलो वजन असत बाळाचं . कधी पाठीला २.५ किलोची बॅग अडकवून दिवसभर फिरून पहा कस वाटतय ते सांग . आणि हे काही तास आहे इथतर चोवीस तास हे सांभाळायचं असत आणि तेही खांद्याला नाही पोटाच्या नाजूक स्नायूंना हा भार सहन करावा लागतो . "
" सर तुमचं सायन्स होत का ? "
" हो होत "
" किती भयंकर सांगता हो तुम्ही बाकीच सोडून याचीच भीती वाटावी . "
" आणि इतकच नाही कधी लहान बाळ सांभाळलं आहे . "
" हो सांभाळलं आहे कि . मला खूप आवडतात . "
" ती वेगळी गोष्ट . दुसऱ्याच्या मुलाला थोडावेळ खेळवणे वेगळ आणि २४ तास स्वतःच्या मुलाला सांभाळणं वेगळ . त्या एव्हढ्याश्या बाळाची इतकी मोठी मुलगी व्हायला तुझ्या पेरेन्टस्ला किती त्रास सहन करावे लागले असतील हे तुला आता नाही कळणार . ते तेव्हा कळेल जेव्हा तू स्वतः आई होशील . "
आता मात्र तिला काय बोलावं हे समजत नव्हत .
" आता सांगशील का काय झाल इतक ? " सुमितने परत विचारल .
" तुम्ही कधी कुणावर प्रेम केल आहे का ? " तिने त्यालाच प्रतिप्रश्न केला .
" म्हणजे प्रेमभंगातून तू हे करणार आहेस तर .  "
" प्रेमभंग किती सहज बोलून मोकळे झालात ना तुम्ही . पण त्याच दुःख काय असत हे त्यालाच माहित जो यातून गेलेला आहे . "
" सांगशील तर कळेल ना मला . "
" काय सांगू आणि काय नको . कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही . "
" अतुल, अतुल त्याच नाव . आम्ही  एकत्र होतो कॉलेजला . तो आवडायचा मला पण बोलता आल नव्हत किती दिवस . तो सगळ्या फ्रेंड सर्कलच्या सेंटर पॉइंटवर असायचा . अगदी हसरा खोडकर . कुणालाही प्रेम व्हाव असाच होता तो . आणि मी... मी त्याच्या अगदी विरुद्ध . मला राग फार यायचा . फ्रेंड सर्कलमधे होते पण माझ फार कुणाशी बोलण व्हायच नाही . माझी एक खास मैत्रीण होती तिच्यासोबतच असायचे मी जास्त आणि तिच्यामुळेच मी त्या सर्कलला जोडली गेली होती . एकदा त्याने माझी खूप चेष्टा केली . म्हणजे तस सगळ्या ग्रुपचं ठरल होत . आणि तो फक्त पुढे होता . पण बाकीचेही त्याला साथ देत होते . पण माझा सगळा राग त्याच्यावर निघाला . तो खरतर इतका घाबरला होता माझा अवतार पाहून कि काय सांगू ते आठवून आताही हसू येत . त्या दिवसानंतर मी बरीच मिसळले ग्रुपमधे . आणि त्यांनी माझं नावही ठेवल होत .
" काय नाव ठेवल होत ? "
" चिडकू , काय नाव झाल का हे . पण ते वेडेपणाचे दिवस होते आणि तसेच होते सगळे . "

नंतर माझी ती मैत्रीण एका मुलासोबत एंगेज झाली . ती त्याला भेटायला जायची तिच्या सोबत मी असायचे . आणि त्या मुलासोबत अतुल असायचा . सगळे एकत्र असायचो तोपर्यंत ठीक पण जेव्हा ते दोघंच असायचे तेव्हा मात्र आम्हा दोघांनाच दुसरीकडे थांबव लागे . आणि तेव्हा जर त्याने पाहिलं काही काम केलं असेल तर ते म्हणजे त्याने माझी माफी मागितली अगदी कितीतरी वेळा . मी त्याला सांगितलं होत कि मी तुला माफ केलं तरीही कितीतरी वेळा तो माफी मागतच राहायचा आणि तेही असं कि मला खूप हसू यायच . खूप खुश असायचे मी त्याच्या सहवासात . माझी मैत्रीण बाजूला राहिली आणि मी आणि अतुलच जास्त एकत्र राहू लागलो . कॉलेजमधे आल कि सगळा वेळ त्याच्या सोबतच जायचा . कितीवेळ आम्ही बोलायचो आणि किती नाही याच भानच राहायचं नाही . एकदा त्यांच्या घरी पूजा होती तेव्हा आमचा ग्रुप सगळा ग्रुप त्यांच्याकडे गेलेला तेव्हा त्याच्या घरच्यांसोबत माझी छान ओळख झाली होती . त्याच्या आईच आणि माझं खूप छान जमल होत . सगळी काम करताना आम्ही दोघी सोबतच होतो . दोघीमध्ये वयाच अंतर असूनही ते तस जाणवलच नाही . तो दिवस खूप छान गेला आणि जाताना त्याच्या आईने मला परत येत जा म्हणून सांगितल . आणि त्यानंतर तर काय मी नेहमीच त्यांच्या घरी जायचे . अगदी सर्वांसोबत माझ छान जमायच . आणि अतुलच तर काय आम्ही अगदी नवरा बायको सारखेच झालो होतो फक्त आता कधीतरी लग्न होईल आणि आम्ही ऑफिशिअली त्या नात्यात येणार होतो . पण म्हणतात ना सगळ कस चांगल होईल .

त्याचा त्याच्या व्यवसायात जम बसू लागला . ते लोक मोठ प्रस्थ झाले . मी खुश होते त्याच्या प्रगतीने पण मला कुठे माहित होत पुढे काय वाढून ठेवल आहे माझ्यासाठी . तो हळूहळू माझ्यापासून दूर राहू लागला . त्याला माझ्याशी बोलायला भेटायला वेळ मिळेनासा झाला . त्याच काम , त्यातून त्याला वेळ मिळत नाही हि त्याची सबब होती . मीही विचार केला तो प्रगति करतो आहे तर करुदे . चांगलच आहे ना . पण मी वेडी होते आणि अशीच गाफील राहिले . आणि एके दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला . त्याच लग्न आहे उद्या . मला तर काही समजेनासच झालेल . मी त्याला फोन करत होते पण तो उचलत नव्हता . मी त्याच्या घरातल्या सर्वांना फोन लावून पाहिला पण एकतर फोन लागत नव्हते किंवा लागले तरी कुणी ते उचलत नव्हत . मी खूपच सैरभैर झाले . सरळ त्याच घर गाठलं पण तिथे कुलूप होत . शेजारी चौकशी केली तेव्हा समजल कि गावी गेले आहेत आणि त्याच लग्न आहे . किती वय असेल माझं आणि किती समज असेल . सोबत फारशे पैसेही नाहीत . पण फार काही विचार न करता होते तेव्हढे पैसे घेऊन मी त्याच्या गावी गेले तर तिकडे समजलं कि ज्या मुलीसोबत त्याच लग्न होणार आहे त्या मुलीच्या गावी गेले आहेत ते . ते गाव तिथून बरच दूर होत माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते पण मी तशीच निघाले . शेवटी काही अंतर तर मला विदाउट तिकीट प्रवास करावा लागला . मला गाडीतून मधेच रस्त्यात उतरवल . मी तशीच चालत तिथून त्या गावापर्यंत पोहोचले . पण तिथे मला कुणी दाद लागू दिली नाही . मला दमदाटी करून मला बाजूला सारून त्यांनी ते लग्न उरकलच .

इतक्या आड बाजूच्या गावात कोणी ओळखीच ना पाळखीच कोण मदत करणार माझी . मला तर काय कराव हेच समजेनास झाल होत . मी तिथून कशी घरी आले ते माझं मला माहित . माघारी आले आणि आजारी पडले . आपण जिवंत राहूच नये असच वाटत होत मला . त्यामुळे लवकर बरीही नाही झाले . पुढे कशीबशी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. अनेक फ्रेंड्सनी मदत केली यातून बाहेर पडायला पण जेव्हा एकटी असते तेव्हा परत त्या आठवणी रुंजी घालू लागतात . मग प्रश्न पडतो कि का जगते आहे . म्हणूनच म्हटल कधी कधी वाटत मरून जाव . "
" तो अतुल कसा आहे आता ? "
" छान चालल आहे त्याच . संसार आहे बायको आहे आणि एक मुलगीही आहे. कस आहे ना कधी कधी वाटत कि जे लोक वाईट वागतात त्यांच चांगल होत . आणि जे यात त्रास सहन करतात त्यांनाच पुढही दुःख भोगावी लागतात. "
" मला माहित नव्हतं तुझ्या आयुष्यात इतक काही घडून गेल आहे . माझ्यामुळे तुला हे सगळं परत आठवाव लागल . "
" आठवायच काय त्यात ते नेहमी असत माझ्यासोबत फक्त आता बोलले इतकच . "
त्यानंतर मात्र त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला . तिला शक्य ती मदत व्हावी . तिला शक्य तितकं एन्करेज करण सुरु होत . पण बहुदा तिचं मन तिथे लागत नव्हत . एकूणच परिस्थिती अशी होती कि तिच कामही व्यवस्थित होत नव्हत त्यामुळे ती फार दिवस तिथे राहील अस वाटत नव्हत . एक दिवस ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली
" मी आता इथे फार दिवस नाही राहणार . "
" का गं ? असं का ? "
" का आणि काय नाही राहणार . पण मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरून जाल ना . "
" तुझं नाही माहित पण मी तर तुला नाही विसरणार. "
" इथं किती लोक येतात किती जातात तुम्ही सर्वाना थोडीच लक्षात ठेवणार आहे ? "
"सर्वाना नाही पण तू नक्कीच आठवणीत राहशील . "
दोघांनी आपले नंबर एक्सचेंज केले .
ती त्या दिवशी जाणार होती त्या दिवशी त्याने तिला सांगितल कि जाताना भेटून जा . तो वाट पाहत होता पण ती त्याला न सांगताच गेली . त्याला राग आला होता तिचा .

काही दिवसांनी ती परत आलेली ऑफिसमध्ये पण त्याने लक्षच नाही दिल तिच्याकडे . ती त्याला भेटायला आली पण तो दुसऱ्याच कामात मग्न राहिला . दोघांचं काही बोलणंही नाही झालं .
काही दिवसांनी त्यांची परत भेट झाली तोपर्यंत त्याचा राग शांत झाला होता .
" तुम्ही तर म्हणाला होतात कि मला विसरणार नाही आणि त्यादिवशी साध बोललाही नाही . मी स्वतःहून भेटायला आले होते ना तुम्हाला . "
" त्या दिवशी तुला ऑफिसमधून जाताना थांब म्हटल होत . तू थांबलीस का ? "
" त्या दिवशी माझं भांडण झाल त्यांच्यासोबत मग कशी थांबणार होते मी . सरळ निघून जावं लागलं तिथून मला . "
" मला राग आला होता तुझा . "
" तुम्ही पण काय कशावर राग येईल तुम्हाला सांगता यायच नाही . आणि नंतर तर मी स्वतःच आले होते ना तुम्हाला भेटायला मग का नाही भेटलात . "
" त्या दिवशीचा राग होता म्हणून . "
" आता गेला ना राग "
" हो "

त्यानंतर दोघांचं फोनवरच बोलण व्हायच . ती कशी आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही . नेहमीचच बोलता बोलता तिची इतकी चिंता इतकी काळजी आपण का करतो आहे याच काही उत्तर त्याला मिळत नव्हत . सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना अजाणतेपणे काही लोक आपल्या मनाच्या इतक्या जवळ येतात कि काही विचार करणही अवघड होऊन जात .

त्यादिवशी त्या दोघांच बोलणं सुरु होत त्याच्या शब्दातली काळजी तिलाही जाणवली आणि तिने विचारलं
" का करता इतकी काळजी ? "
" नाही माहीत "
" नसेलच माहित तर शोधा कारण . आणि कारण माहित असूनही स्वतःलाच नसेल पटत तर ...
इक सांगू ज्या रस्त्यावर चालून इच्छित स्थळी पोहचता येत नाही त्या रस्त्यावर चालू नये . " तिने थोडक्यात महत्वाचं सांगितल होत .
" तुला माहित आहे आपल्या हृदयाची धडधड मुद्दाम करावी लागत नाही ती आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत होत राहते तुझ्यासाठी माझ्या भावना माझी काळजी अशीच आहे . मी आहे तोपर्यंत ती अशीच राहील . अनेक कपल्सची रिलेशन सर्वसाधारणपणे जितका वेळ टिकतात तितका वेळ तर मी तुला विसरण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतका प्रयत्न केल्यावर लक्षात आल कि असा ऑप्शनच नाही माझ्याकडे . सकाळी जाग आली कि पहिली तुझी आठवण येते तुझा लास्ट सीन पाहिल्याशिवाय चैन पडत नाही . दिवसभर हाच विचार डोक्यात असतो कि या वेळी तू काय करत असशील . रात्री झोपताना तुझीच आठवण असते . जर एखाद्या दिवशी तू ऑनलाईन नसलीस तरी ठीक नाही वाटत मला . मागे तुमच्या एरिया मधे तो प्रॉब्लेम झाला होता तेव्हा न्यूज मध्ये फक्त तुमच्या एरियाच नाव येत होत . तेव्हा तर काय करू आणि काय नाही अस होऊन तुला फोनही केला पण तू नाहीस उचललास . काय सांगू तेव्हा माझी काय अवस्था झाली होती .  "
" पण का आणि कशासाठी मला या मोहात परत पडायचं नाही . "
तिच्या या विचारासाठी त्याच्याकडे उत्तर नव्हत .
आता त्याचा नाइलाजच झाला होता . त्याने तिला उत्तर दिल

" तू तुझं आयुष्य जग. मी तुझ्याकडून  काहीही अपेक्षा ठेवत नाहीये . फक्त आपल्यातल नातं असच राहू दे . "
" काय नातं आहे आपल्यात ? मी मैत्रीपर्यंत ठीक आहे आणि तुला त्याच्या पुढ जायच आहे कस राहिल नात . "
" हे बघ दोन व्यक्तीमधलं नात एखादे वेळीस परिस्थिनुसार बदलेल पण जर त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटत असेल तर ते टिकत . "
" अस परिस्थितीनुसार बदलणार नात काय कामाच ? "
" तस म्हणत नाहीये मी . कधी मित्राच्या नात्याने राहू शकतो कधी तुला किंवा मला जर काही सल्ला किंवा काही मदत लागली तर ती करू शकतो . आपण जितक एकमेकांना ओळखतो त्याचा नक्कीच काही चांगला उपयोग होईल . "
" काय चांगला उपयोग मला राग येतो कधीकधी तुझ्या मेसेजेसचा . "
" मग येऊ दे ना . ते चांगलच आहे तुझ्यासाठी . तुला लो बीपीचा त्रास होतो ना . असा कधीकधी राग येण चांगलाच आहे . रागाने बीपी वाढतो आणि त्यामुळे तुझ्या बाबतीत तो नॉर्मल राहील . तुझ्यासाठी दुःखी आणि निराश होणं चांगल नाही कारण त्याच्यामुळे बीपी कमी होऊन तुला त्रास होईल . "
" कसा आहेस रे तू ? अस काही बोलतो कि वाटत डॉक्टर सोबत बोलते आहे . "
" म्हणून म्हणतो एकच काम कर विश्वास ठेव माझ्यावर आणि माझ्या कृतीचा अर्थ नको लावूस किंवा त्यांच स्पष्टीकरण नको मागू . इतकच लक्षात ठेव मी तुझ्यासाठी जे चांगल करू शकतो तेच करेन . म्हणून माझ्या प्रेमासाठी इतकच कर, तू फक्त आनंदी रहा, हसत रहा, इतकं तर करू शकतेस ना माझ्यासाठी . "
" परत तेच परत प्रेम "

हे बघ माझ आहे तुझ्यावर प्रेम आणि ते आयुष्यभर राहिल ते मी नाही बदलू शकत . मी तुला अस नाही म्हणत कि तू माझ्या प्रेमाचा स्विकार कर , तुही माझ्यावर प्रेम कराव अस नाही . माझ म्हणन इतकच आहे कि तू फक्त तुला हव तशी रहा अॅज फ्रेंड ऑर जस तुला हव तस . पण सोबत राहा आयुष्यभर "
" बर ठीक आहे . पण एक सांग आयुष्यभर माझ्यावर प्रेमच करणार आहेस कि काही करिअरचं पाहणार आहे . "
" जॉबच म्हणशील तर अस नाही कि मी काहीच करत नाही . मी इतर लोकांसारखा नाही नॉर्मल वे ने नाही जाऊ शकत माझे माझे प्रयत्न सुरूच आहेत . आणि मी माझ्या क्षेत्रात सक्सेस मिळवेनच तू त्याची काळजी नको करू . "
" तुला अस नाही का वाटत कि तुझ्या माझ्यासाठी इतक वाटत आणि मी तुझा काहीच विचार करू नये . तू काळजी करतो आहेस माझी मग मला नाही वाटणार का तुझ चांगल व्हाव . "
" ते नक्की होईल गं . तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करते आहे ते सुरु ठेव माझी माझ्या करिअरबद्दल जी स्वप्न आहेत त्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत . बघू आपल्याला आपली नशीब कुठं घेऊन जातात पण तोपर्यंत माझ्यासाठी माझा हा वेडेपणा सहन कर ना "

त्याने तर त्याच भविष्य स्वतःची मेहनत आणि त्याच भविष्यावर सोडल . पण तुम्ही या कथेचा शेवट तसा करा जसा तुम्हाला स्वतःला वाटतो .

.... 

Friday, October 11, 2019

प्रियतमा (भाग ८)

" तर इथलं सगळं बऱ्यापैकी कंट्रोलमधे आहे आता . "
" हो सर . तुम्ही फारच सुरेख हे सगळ हाताळल . " कुलकर्णींनी त्याच्या कामाची मनापासून तारीफ केली . 
तो मीटिंग संपल्याचं त्याने ऑफिशिअली जाहीर केल आणि सगळे निघाले . त्याने सुजीतला थांबवून घेतल . 
" हे बघ सुजीत हे आता तरी सांभाळलंय पण पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तू जातीन लक्ष दे . " 
" सर खर सांगायच तर आता जे आपण केल आहे ते बाहेर बाहेरची डागडुजी आहे . खरा प्रॉब्लेम काय आहे . म्हणजे ऍक्च्युली कोण आहे हे अजून समजलेलंच नाही . "
" तुला काय म्हणायच आहे सुजीत ? " 
" सर डिअर मस्ट बी अ ट्रोजन "
" आर यू शुअर ? "
" हो सर . एकाएकी इतक्या मोठ्या गोष्टी कशा होतील आणि तेही कुणालाही न समजता ? "
तो विचार करू लागला . हे त्यालाही वाटत होत पण त्याला सुजीतच मत लक्षात घ्यायचं होत . 
" तुला काय वाटतय काय करायला हव मग ? "
" सर तुम्ही इथले खरे मालक आहात हे फार कुणाला माहीत नाही .  त्यांना असच वाटत कि तुमचे अंकल इथले मालक आहेत . आणि फ्रँकली स्पिकिंग अंकलच वय झालय आता त्यामुळे कुणालाही असच वाटेल कि त्यांना बाजूला करून हे सगळ एम्पायर हस्तगत करायच . "
तो विचार करत होता . 
" सर आता तुम्ही स्वतः पुढे येऊन कंपनी लीड करायला हवी . " 
सुजीत तुझ म्हणन पटतय मला त्यांना त्रास द्यायला मलाही आवडत नाही . खरच आता मलाच हे सगळ करायला हवं . "
" ठीक आहे आपण करूया हे . यासाठी काही लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील . ते करू आपण पण तोपर्यंत सतर्क राहा . "
" सर आता तुम्ही ? "
" बॅक टू पॅव्हेलियन . "
दोघेही हसले . 
========================================================

" मी येतो आहे तू म्हणाली होती ते लक्षात आहे ना तुझ्या ? "
" हो  सर , तुम्ही या तर खर "
" ओके " म्हणत त्याने फोन ठेवला . 

तो ऑफिस बिल्डिंगच्या बाहेरच होता त्याच लक्ष तिच्याकडे गेल . ती फारच डिस्टर्ब वाटत होती . त्याने विचार केला कि आता नको हे , नंतर विचार करूया याचा . त्याने पाहिलं प्रिया समोरच होती .  तिने त्याच्याकडे पाहिलं आणि स्माईल केल . त्याने विचार केला कि हे सगळं तर इथंच घडून आलं आहे . एकतर तिचा मूडही चांगला नाही आणि हे ठिकाण पण योग्य होणार नाही . त्याने ठरवल गोष्टी पोस्टपोन करायला हव्या . त्याने पटकन फोन लावला ... पण समोरून फोन उचलला जात नव्हता . आता मात्र त्याला काही समजत नव्हत . एका अनामिक भीतीने त्याला घेरल होत . तो परत परत कॉल लावत होता पण समोरून नो रिप्लाय . आणि अचानक फोन रिसिव्ह झाला तो पटपट बोलत होता . हे सगळ थांबवायला सांगत होता . पण समोरून काहीही रिप्लाय नव्हता . फोन फक्त समोर होणाऱ्या गोष्टी त्याला ऐकता येण्यासाठी उचलला गेला होता . सर्वकाही त्याच्या नजरेसमोर घडत होत  आणि कानाने ऐकू येत होत . सर्व होताना तो पाहू शकत होता पण त्याला आता काहीही करता येत नव्हत . त्याला जे करायच होत ते हे नक्कीच नव्हत . आणि जे होत होत ते त्याला पाहवत नव्हत . त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते . मानसी मानसी काय अवस्था झाली होती तिची तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते  . ती स्वतःच प्रेम वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होती . सुधीर तिला हवं तस बोलत होता त्याला त्याचा राग येत होता आणि तिची अवस्था पाहून डोळ्यात पाणी दाटून आलं होत त्याला पाणावलेल्या डोळ्यासमोर ती अस्पष्ट दिसत होती . ती तशीच वळली आणि धावू लागली . तो हताशपणे तिला पाहत होता इतक्यात त्याला जाणवलं ती रस्त्याच्या दिशेने धावते आहे . तो तिकडे धावला . त्याच्या काळजाचा ठोका क्षणात चुकला ती मोठी लॉरी तिच्या दिशेने येत होती . मानसी त्याने जिवाच्या आकांताने आवाज दिला पण तो तिच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही . ती तशीच बेभान धावत होती . तो तिच्यापर्यंत पोहोचला . तिला त्यानं वेगान दूर ढकललं आणि काहीतरी जोरदार आघात झाला . त्याने तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू सर्व अस्पष्ट धूसर होत गेलं . 

Thursday, October 10, 2019

आरसपानी भाग ५

ते दोघे आत गेले . आत सुरुवातीला दोन साध्याशा खोल्या होत्या . त्यात मोडक-तोडक सामान लावलं होत . ते दोन्ही खोल्या ओलांडून पुढे आले , ती एक छोटीशी अडगळीची खोली होती . त्यात एक मोठं जाडजूड कपाट होत त्याने ते उघडल आत काहीतरी केलं तसा काहीतरी आवाज झाला एखादा दरवाजा उघडल्यासारखा . त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मानेनंच तिला येण्याची खून केली . तो आत शिरला तिही त्याच्या पाठोपाठ आत शिरली . तिला एक छोटासा दरवाजा उघडलेला दिसला आत तो त्यातून आत गेला त्याच्या पाठोपाठ तीही गेली . आतापर्यंत या वस्तीत सगळीकडे घाण आणि दारिद्र्य दिसलं होत तिला . पण इथे होती टापटीप आणि चांगलच श्रीमंतीचं दर्शन घडत होत . ती बघतच राहिली .
" हे सगळं काय आहे ? " ती जवळपास ओरडलीच . त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला .
" हळू बोल . मला चांगल ऐकू येत . इतकी ओरडलीस तर बहिरा होईन मी . "
" इतकीही ओरडली नाही काय मी . " असं ती अजून जोराने ओरडत म्हणाली .
ती काही ऐकणार नाही हे समजूनपण  त्याने स्वतःच्या ओठावर बोट ठेवलं आणि शांत व्हायला सांगितल . हि मात्रा मात्र उपयोगी पडली . तिने स्वतःच्या ओठावर बोट ठेवल आणि हळू आवाजात म्हणाली " हे सगळ काय आहे ? "
" तू बस इथे . तुला सगळं सांगतो . "
तो एव्हढ म्हणताच ती पटकन तिथे जाऊन बसली आणि त्याच्या बोलण्याची वाट पाहू . तो पण पटकन तिथे बसला आणि सांगू लागला .
" तुला काय वाटत मी कोण आहे ? "
" मला काय माहीत तू कोण आहेस , तू सांगतपाहत पहात  नाहीस तोपर्यंत कस कळणार मला "
त्याला राग आलेला पण तो आवरून तो म्हणाला
" मी तेच सांगतो आहे तू आता मध्ये मध्ये बोलू नको . फक्त ऐक .
तिने होकारात मान हलवली आणि त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली .
" मी एक डॉन आहे अंडरवर्ड डॉन "
" तुला सकाळपासून कुणी भेटलं नाही का ? " ती मधेच बोलली .
" काय म्हणायच आहे तुला ? " तो वैतागला होता पण तरीही स्वतःला शांत ठेवत तो बोलला .
" म्हणजे बघ ना मी विचारलं हे सगळं काय आहे ? तर तू काहीही सांगणार आणि मी विश्वास ठेवू त्यावर . काय तर म्हणे तू डॉन आहे . "
" हो आहेच " तो म्हणाला .
" वाटतोय का ? " ती त्याला पहात म्हणाली .
" तुला काय म्हणायच आहे मी डॉन नाही वाटत ? " तो अविश्वासानं म्हणाला .
तिने त्याच्याकडे परत एकदा पाहिलं आणि नुसताच ' चक ' असा आवाज करून नकार दर्शवला .
" अग मी खरंच डॉन आहे . अशी का अब्रू काढते आहेस माझी . "
" माझा विश्वास नाही . तर मी कस मानू . "
" बर मी सांगतो ते आधी ऐक सगळ मग ठरव काय ठरवायच ते . "
" ठीक आहे बोल तू "
त्याला समजत न्हवत अस काय झाल कि हिला मी डॉन वाटत नाहीये आणि आधी मला तुम्ही म्हणणारी हि एकेरीवर कशी आली . त्याने तसच त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली .
" मी एका चांगल्या कुटुंबातून होतो . माझ शिक्षणही चांगल्या शाळेत होत होत . पण माझ्या कुटुंबासोबत फार वाईट घटना घडल्या आणि मी एकटा राहिलो या निर्दयी जगात . मी तेव्हा १३-१४ वर्षांचा असेल तेव्हा अशा झोपडपट्टीने मला सहारा दिला . अशीच टवार मुल माझ्यासोबत होती . ते करतील तस करत गेलो शेवटी आयुष्य अवघड असत ना . त्यातच एका टोळीत सामील झालो . भाईगिरी करत राहिलो . हे सगळे डोक्याने तितकेशे सुपीक नाहीत . अनेक वेळा साध डोक चालवल ज्यामुळं हे लोक अनेक ठिकाणी वाचले अनेक ठिकाणी यांचा फायदा झाला . आमचा त्यावेळचा भाई सुलेमान बुढ्ढा झाला होता . असाच एका एन्काऊंटर मध्ये मारला गेला आणि या सगळ्यांनी मला त्यांचा नवीन भाई बनवल . पुढे माझं डोक वापरत गेलो अनेक भाईंनी एकतर माझी शरणागती पत्करली किंवा ते मारले तरी गेले . आणि आता मी या अंडरवर्डमध्येला डॉन आहे . "
एव्हढं बोलून तो शांत झाला .
" तुला पटत हे सगळ ? " तिने त्याला विचारलं .
" नाही पटत सगळंच पण काय करणार . हे अंडरवर्ड आहे इथ आत यायला तर रस्ता आहे पण बाहेर जायला नाही . "
ती उठली आणि तडक आलेल्या वाटेनी माघारी निघाली .
" काय करते आहेस तू ? " त्याने जागेवरूनच तिला विचारलं .
" मला अशा जगात अशा माणसासोबत नाही राहायचं आहे . "
" तू विसरते आहेस आत येताना मी तुला काय सांगितलं होत . आत यायचं हे तू तुझ्या मर्जीने ठरवलं पण बाहेर जायचं कि नाही हे माझ्या परमिशन शिवाय माझ्या मर्जीशिवाय नाही . "
ती तशीच तो दरवाजा ढकलत होती . पण तो तसूभरही हलला नाही .
..... क्रमशः 

Thursday, October 3, 2019

आरसपानी (भाग ४)

" यार ती पोरगी काहीतरी वेगळ प्रकरण आहे. " तो मुलगा काळजीच्या सूरात म्हणाला .
" म्हणजे काय ? " दुसऱ्याने विचारलं .
" अरे बघ ना तिला कुठून आली काय माहित नाही . कुणाशी कस बोलाव कळत नाही . " त्याच्या शब्दात चिंता होती .
त्याला थांबवत एकजण मधेच म्हणाला , " ते तिकडे गेलेले ना ? "
" हो तर काय . मी काय म्हणतोय जे नाय व्हायला पायजे ते होतय ना . म्हणजे मुद्दाम केल्यासारखा होतय , ते इतक कॉपरेट करतात आणि आपण असं करायचं . परत त्यांनी काय केलं तर . " तो विचारमग्न झाला बाकीचेही विचार करत होते इतक्यात एकजण बोलला
" अरे मघाशी काय ओरडली ती . सगळे जमले ना . "
" मला तर वाटत भूत आहे ती " मघाचा मुलगा म्हणाला .
" नाय हडळ असेल " - दुसरा
" तू पाय बघितले का तिचे ? " त्यानं शंका व्यक्त केली .
" अरे पण दिसायला तर बरी दिसते . " अजून एकाने शंका मांडली .
" दिसण्यावर नको जाऊ हडळीच असच असत दिवसा वेगळी दिसते आणि तिचा टाइम झाला कि वेगळी . "
" तुला लय माहित आहे रे " बाकीच्यांनी त्याची स्तुती केली . तो हुरळला आणि म्हणाला
" मग असच नाय . "
तेव्हढ्यात तो आला . ती पोरं त्याच्यासमोर जमा झाली . सगळेजण शांतपणे तो काय बोलतोय याकडं लक्ष देत होती तेव्हढ्यात मघाचा हिरो बोलला
" भाई ती पनवती का पाळलीय . "
भाईने त्याच्यावरआपली नजर रोखली तरी तो पुढे सुरूच होता
" मी काय म्हणतो इथून सोडूया ना गटारात तिला वहात वहात जाईल ना बरोबर . "
एकदोघांना ते चांगलच पटल ते त्यांनी मान डोलावून ' हो हो ' म्हणून दाखवलं .
" अरे काय इथून सोडायची ? मरेल ना ती . " अस म्हणून त्याने त्यांना सोडल व तो ती कुठे आहे हे पाहू लागला . इकडे त्या पोरांच्यात चर्चा होती .
" भाई मरणाची इतकी काळजी कधीपासून करू लागला ? "
तिकडे त्याने विचारलं
" कुठे आहे ती ? "
ती आली . तो तिच्यापाशी गेला आणि म्हणाला
" अग, केवढ्यानं ओरडलीस ? म्हातारी मेली असती ना "
ती घाबरली होती आणि इकडं तिकडं पाहून म्हणाली " मला भूत दिसलेलं . "
" भूत ? "
एकजणाने त्याच्या कानात काहीतरी सांगितल .
" अग, भूत नव्हत ते . माणूस आहे तो . "
" नाही भूतच होत . मी पाहिलं ना . " ती ठामपणे म्हणाली .
त्याने हाताने इशारा केला तसा दोघेजण त्याला घेऊन आले . त्याला पाहून ती परत ओरडली आणि त्याच्या मागे लपली .
तो परत तिला समजावत म्हणाला , " माणूस आहे माणूस "
तिने त्याच्या पाठीमागून डोकावून पाहिलं आणि म्हणाली
" वाटतो का ? "
तो पण एव्हढच म्हणाला , " आहे " आणि मग त्याने वळून त्या सगळ्यांना सांगितल
" बर मी बघतो काय करायच ते तुम्ही निघा . "
त्यासरशी सगळे निघाले . पण त्याचा खास असलेला तो घुटमळला आणि म्हणाला
" पण भाई काळजी घ्यायला हवी . "
त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला " मी बघतो . "
" ते नाही भाई तो मॅटर "
" तुम्ही आहे ना सगळे . जरा सावध रहा . जा तू . "
" ओके भाई म्हणत तोही निघाला .
आता ते दोघेच उरले .
तिला " चल " म्हणून तो निघाला . तीही त्याच्या सोबत येऊ लागली .
तो शांतपणे चालत होता . तीच त्याला म्हणाली
" असली कसली माणस आहेत ही ? "
" आहेत ती अशीच आहेत "
" यातलं कुणी अंघोळ तरी करत का ? " तिने विचारलं .
तस त्याने थांबून तिच्याकडे एकवार पाहिलं .
" करतात करतात " एव्हढंच म्हणून त्याने परत चालायला सुरुवात केली .
" तुम्ही ? " तिने परत प्रश्न केला .
त्यावर त्याने थोड रागातच तिच्याकडे पाहिलं . पण ती घाबरली नाही . आता तिला त्याच वागणं सरावाच झालं होत . त्यामुळे ती तशीच त्याच्याकडे पाहत होती .
" मी पण करतो रोज " म्हणत तो निघाला .
ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यात पाहून तिने विचारलं
" रोज ? "
त्याने नजर चुकवली आणि पुढे चालत म्हणाला
" रोज म्हणजे ... तुला नाही माहित अर्ध्या महाराष्ट्राला प्यायला पण पाणी नाही मिळत आणि तुझं काय ? "
" म्हणजे रोज नाही करत . " तिने आपला मुद्दा परत मांडला .
" रोज नाय पण करतो . " तो कसाबसा बोलला . ते बोलतच होते तेव्हढ्यात ते एका दरवाज्यापाशी पोहोचले . संपूर्ण लोखंडाच दार होत ते . अगदी मजबूत . ते उघडल आणि ते आत निघाले . तशी ती म्हणाली
" केवढा आहे हा दरवाजा . मला तर उघडताही नाही येणार . "
त्यासरशी तो थोडा गंभीर होत म्हणाला
" हे बघ एक सांगतो नीट लक्षात घे . इथून एकदा आत गेल कि बाहेर माझ्या परमिशन शिवाय नाही . मग तू ठरव आत यायच का नाही . "
तिने आजूबाजूला नजर टाकली . दरवाजातून आत पाहिलं . क्षणभर विचार केला  आणि होकारात मान डोलावली . ते दोघ आत गेले . ते प्रचंड दार आवाज करत बंद झालं .
... क्रमशः 

Monday, August 26, 2019

प्रियतमा (भाग ७)

' चोर चोरी से जाये पर हेराफेरीसे ना जाये ' या त्याच ओळी होत्या ज्या भरोशावर तो सगळ सोडून आला होता . त्याला विश्वास होता कि या गोष्टी नक्की होतील .
तेव्हढ्यात अंकलचा फोन आला .
" बोला काय म्हणताय कशी आहे तुमची तब्येत वगैरे . "
" माझ्या तब्येतीच सोड मला काय धाड भरली आहे तू तिकडच बोल तिकडे काय परिस्थिती आहे ते सांग . "
" अहो इकडे सगळ ठीक आहे . मी योग्य त्या अॅक्शन घेतल्या आहेत सगळ व्यवस्थित होत आहे . "
पण मनात विचार करत होतो ' कुठं काय व्यवस्थित आहे . ' पण त्यांना हे सांगता येणार नव्हत त्यामुळे पुढे म्हणालो
"आणि काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल . आणि तोपर्यंत मी इथच थांबून जातीन लक्ष घालतो आहे . तुम्ही काळजी करू नका . "
" हो ते ठीक आहे पण तू निघाल्यावर तिथं परत तशी परिस्थिती होऊ नये म्हणून तरतूद करून ठेव . "
" हो अंकल तुम्ही नका काळजी करू . "
त्यांच समाधान झाल होत .

त्याने अमितला फोन लावला
" काय अमित तिकडे काय हाल हवा . "
" सर तुम्ही काय केलत हे ? इथ काय परिस्थिती झाली आहे काय सांगू तुम्हाला . "
" का काय झाल अस ? "
असं म्हणून त्याने लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केली
" त्या सुधीरला प्रमोशन दिल त्यामुळे तो या सगळ्यापासून तर दूर गेला पण तिकडे काय करतो आहे तो ? "
तो ऐकत होता .
" अहो सर त्याला आता कोण कंट्रोल करणार . त्याला आता फक्त पाटील साहेबांना रिपोर्टींग करायची आहे . पण त्यांनाही त्याच्या बॉससारख राहता येणार नाही . फक्त रिपोर्ट मेल करतो तो त्यांना . त्यांना त्याला फार काही विचारताही येत नाही . त्याला कोण बोलू शकत तर ते तुम्ही आहे . आणि या ऑफिसमधे तुम्ही तुमचा प्रॉपर प्रेझेन्स दाखवत नाही मग कस होणार ? "
" असू दे ते मी पाहून घेईन पण बाकी काही त्रास नाही ना त्याचा ? "
" सर आता त्याने केबिनला प्रायव्हेट रूम बनवायचच बाकी ठेवल आहे . "
" का काय केलं त्यानं "
" अहो तो आणि त्याची सेक्रेटरी ... "
" ओह . ठीक आहे मी पाहतो पण तुझ लक्ष असू दे त्याच्यावर "

अजून काही कॉल सुरु होते त्याचे .
" काय गं कशी आहेस ? "
" सर तुम्ही . काय सर आमची आठवण येते कि नाही . "
" अगं अस कस ? मग का कॉल केला मी ? "
" पण किती दिवस झाले सर तुम्ही काही कॉल पण नाही केला आणि इकडे आला पण नाही . "
" अगं कामात होतो ना . "
" अहो किती काम करताय "
" चालायचच . बर एक सांग तू म्हणाली होतीस ते खर आहे ना "
" हो सर १०० % खर आहे . "
" नाही माझा विश्वास नाही बसत . "
" माझ्यावर नाही तुमचा विश्वास . "
" तुझ्यावर आहे गं विश्वास पण बाकीचे पण आहेत ना त्यांच्यावर नाही विश्वास . "
" मी एक काम करते आत्ताच तुम्हाला याच प्रूफ देते . "
" ऐक आता नको मी तिकडे येईन तेव्हा . पण तोपर्यंत कुठं काही बोलायच नाही "
" ओके सर . "
त्याने फोन ठेवला . अजून दोन तीन महत्वाचे फोन करून झाले त्याचे . मग तो मनाशी विचार करत होता . ' आता सगळे पत्ते तर व्यवस्थित ठेवले आहेत . बघूया पुढं काय होत ते . '
==========================================================
" अरे काय कुठं आहेस तू ? किती दिवस झाले तू दिसलाच नाहीस . "
" अगं सांगितल ना तुला आमच काम कस असत . "
" हो पण आपण फ्रेंड आहोत ना एखादा तरी फोन करायचा ना . "
" बर असुदे मला तुला काहीतरी सांगायच आहे . " म्हणत तिने सुरुवात केली . ती कितीतरी वेळ बोलत होती आणि तो फक्त तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पहात होता . तिचे डोळे , तिचे ओठ , तिची प्रत्येक एक्सप्रेशन सगळ काही त्याला घायाळ करत होत .
" अरे सांग ना ? "
" काय सांगू ? "
" अरे मी काय बोलते आहे इतका वेळ . तुझं लक्ष आहे कि नाही . "
"अगं नाही . काय म्हणालीस ? "
" जाऊदे नाही सांगत आता मी . इतकी सिरिअसली मी सांगतेय आणि तुला त्याच काहीच नाही . "
" अगं काय सांगू तुला मला काय झालय ? "
" का काय झालय तुला ? "
" राहू दे . तू तरी कुठं सांगते आहे मला . "
" ठीक आहे सांगते मी " म्हणत तिने सगळं परत सांगितल . ते ऐकून त्याला पुढे काय कराव याचा विचार पडला .
" बर आता मला सांग तुला काय होत आहे ? "
" मला... मला...  मला...  अगं मला अस आठवत नाही काही . "
" हे , मात्र अगदी खर आहे . "
आता मात्र त्याच्याच चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखे झाले होते .
...क्रमशः

Thursday, August 22, 2019

आरसपानी (भाग ३)

" ठीक आहे मी येतो तुझ्या सोबत . जाऊ आपण . आता ठीक आहे ना ? " त्यानं एव्हढं बोलताच तिची कळी खुलली . पण तो पोरगा बोलला
" तुम्ही जाणार ? पण आत्ताच तर... "
त्याने एक भेदक नजर त्या पोरावर टाकली तसा तो बोलता बोलता थांबला .
ते दोघे निघाले . ते एका चिंचोळ्या गल्लीतून निघाले होते .
" मी इथून नव्हते आले . "
" माहीत आहे तू बरीच फिरून आली आहेस . हा शॉर्टकट आहे . "
ती गल्ली तशी फारच अरुंद होती आणि पुढे अजूनच अरुंद होत चालली होती . तिला भीती वाटू लागली होती . तिने अभावितपणे त्याचा हात पकडला . त्याने वळून तिच्याकडे पाहिले ती खूपच बावरली होती . त्याने तिची समजूत काढत म्हटल
" काही होत नाही मी आहे सोबत . "
त्याच्या बोलण्याने तिला आधार आला . ते तसेच पुढे निघाले होते . पुढे एका मोठ्या गटारावरून पलीकडे जाण्यासाठी छोटासा पूल होता पुढे जरा प्रशस्त होत . तो तिथेच थांबला आणि तिला म्हणाला हि बघ इथून पलीकडे गेलीस कि तू त्या सोसायटीमधे पोहोचशील . तिथे गेलीस कि तुला लक्षात येईल तुझी बिल्डिंग . मग जा तू . "
त्याने अस म्हणताच ती खूपच घाबरली .
" नको ना मला नाही सापडल घर तर . "
" अग सापडेल . फार बिल्डिंग नाहीत तिथे . "
" नाही तुम्ही चला तिथे माझ्या सोबत . " म्हणत ती त्याचा हात सोडतच नव्हती . शेवटी त्याला पर्याय नव्हता त्यामुळे तो तिच्यासोबत निघाला .
ते त्या सोसायटीमधे पोहोचले आणि तिथे  प्रत्येक बिल्डिंग पाहू लागले . पण तिला त्या कोणत्याच बिल्डिंग ओळखीच्या वाटेना . अगदी तो रस्ता तो परिसरही तिला ओळखीचा वाटत नव्हता . शेवटी तिला लक्षात येत नसेल म्हणून त्याने बिल्डिंगच्या आत जाऊन तिला ती दाखवू लागला . पण व्यर्थ तिची बिल्डिंग काही सापडली नाही . तो विचार करत होता कि काय प्रॉब्लेम आहे तेव्हढ्यात त्याला काहीतरी दिसल त्याबरोबर त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळपास ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला . तिला काहीच कळेना काय  . पण तो न थांबता चालत होता . शेवटी ते मघाच्या पुलावरून पलीकडे गेले . तेव्हा तिने त्याला थांबवल आणि काय झालय म्हणून विचारलं .
" हे बघ आता खूप उशीर झाला आहे आणि रात्रही फार झाली आहे . आपण उद्या येऊन शोधूया . "
तिला परत तिकडे जायच नव्हत . पण पर्याय नव्हता त्यामुळे तिला जाणं भाग होत .
" बर तू आज इथेच रहा . मी तुझी राहण्याची सोय करतो . "
त्याने एका तुटक्या फुटक्या खोलीपाशी आणलं . आणि आत आवाज दिला एक मध्यम वयाची जाड बाई बाहेर आली . तिचे केस विस्कटलेले होते . उगाचच करायचा म्हणून केलेला भडक मेकअप आणि अस्ताव्यस्त साडी . अशा अवतारातल्या त्या बाईला  आधीच घाबरली . त्यात त्याने सांगितलं आज तू " या मावशींकडे रहा . उद्या आपण जाऊया तुझ घर शोधायला . "
अस म्हणून तो निघाला . त्या  बाईने तिच्या हाताला पकडून जवळपास खेचतच तिला घरात घेऊन गेली . त्या घरात कसलासा कुबट वास येत होता . सगळ अस्ताव्यस्त पडलं होत .
ती बाई तिला एका मोडक्या खुर्चीवर बसवून " मी आलेच " म्हणत आतल्या  खोलीत निघून गेली . ती त्या बाईच्या बाहेर येण्याची वाट बघत बसली होती . इतक्यात तिला जाणवल तिच्या शेजारी कुणीतरी उभ आहे . तिने कुणाला आत येताना तर पाहिलं नव्हत मग इथे कोण आल आणि तेही आपल्या इतक्या जवळ . असा विचार करून तिने वळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि समोर जे होत ते पाहून तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली आणि ती बेशुद्ध झाली . 

Sunday, August 18, 2019

अनुराधा (भाग १)

" काय गं , आता झाली की मोकळी सगळ्या जवाबदाऱ्यांमधून . आता तरी कर ना स्वतःचा विचार . "
राधाक्का अनुला सांगत होत्या . त्यावर अनु अगदी सहजपणे म्हणाली
" अहो, करते मी स्वतःचा विचार . असं थोडीच आहे कि जवाबदाऱ्या होत्या तेव्हा काही आयुष्याचा आनंद घेत नव्हते . आणि अशू प्रतिक या दोघांच करताना मला नाही का आनंद होणार ? "
राधाक्काला तीच पटत होत पण त्यांना सांगायच होत ते अनुला समजत नव्हत . त्यामुळे त्या तिला समजावत म्हणाल्या
" तेव्हाच वेगळ होत गं . आता दोघेही आपापल्या संसाराला लागले आहेत . आता ते त्यात गुरफटू लागतील आणि तू वेगळी पडशील . आज ठीक आहे पण उद्याच नाही सांगता येणार . तेव्हा लवकर निर्णय घे आणि संसाराला लाग . "
त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितल .
" अहो अस काही नाही ते नाहीत माझ्यापेक्षा वेगळे आणि आता संसार थाटायचा ? नको त्यापेक्षा मी अशीच बरी आहे . नोकरी चांगली चालली आहे  आणि सगळं स्थिरस्थावर आहे . आता परत नविन सुरुवात करायला मन धजावत नाही . "
" अगं सोळा वर्षाची कोवळी पोर असो किंवा पन्नाशीला आलेली बाई कुणालाही आयुष्यात नविन काही करताना अवघड तर होणार पण म्हणून नवीन काही करायचं नाही असं नाही ना . "
" असू द्या हो " म्हणत अनुने विषय टाळला .
===========================================================
" काय गं किती गोड आहे ही . मी ठेऊन घेऊ का हिला . "
ते गोड बाळ बघून अनुला राहवत नव्हत . तिचे किती लाड करावेत आणि किती नाहीत अस झाल होत तिला .
सुधा तिच्या मुलीला पहिल्यांदाच घेऊन आली होती ऑफिसमधे आणि तिचं येण म्हणजे सोहळाच झाला होता .
" दिदी एक बोलू " सुधाने अनुच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली .
अनु अजून छोटीमधेच मग्न होती ती तिच्याशी खेळतच सुधाला म्हणाली
" काय गं ? "
" तू स्वतः किती गोड आहेस गं , तुला अस नाही वाटत का कि स्वतःच बाळ असाव . "
सुधा तस बोलली तशी अनु बाळापासून थोडी दूर झाली .
" तुला आवडल नाही का मी तिला घेतलेल ? "
" अस काही नाही आणि हे तुलाही माहीत आहेच . ती माझ्याकडे जितकी आनंदी राहील तितकीच ती तुझ्याकडे राहील . पण माझ्या मनात कितीही असलं तरी तिला तुझ्यासोबत नेहमी तर नाही ना ठेऊ शकणार . पण मला माहीत आहे तू किती प्रेमळ आहेस आमचीही तू मोठया बहिणीप्रमाणे काळजी घेते तेव्हा तुझं चांगल व्हावं असं मला नाही का गं वाटणार . "
" माझं चांगलच चाललय ना . मला थोडीच काही त्रास आहे ? "
" अगं तस नाही . तू किती प्रेमळ आहेस इतकी प्रेमळ आई आणि तितकीच प्रेमळ बायको होशील . मग यापासून कुणी का मुकावं ? "
अनु थोडी बावरली पण स्वतःला सावरत म्हणाली
" अगं अशुच बाळ आहेच कि त्याची माया करतेच ना . "
" पण तू स्वतःच का नको म्हणते आहेस ? स्वतःच माणूस हवं हक्काच . "
" अगं हा एकच विषय आहे का ? "
===========================================================
आज सुट्टी थोडा घरच्यांसोबत वेळ घालवण्याची हक्काची वेळ पण आज प्रतिकबायकोला घेऊन बाहेर गेलेला . त्यांना तसाही एकत्र घालवायला वेळ मिळत नाही त्यामुळे आज दोघच बाहेर गेले होते . घरातली काम आवरण्यातच तिचा बराचसा वेळ गेला पण नंतर बसून काय करायच म्हणून तिने अशुला फोन लावला . बोलता बोलता अशुच्या छोटीच , मुग्धाच काहीतरी बिनसलं . तिकडे अशु तिला घेऊन बसली . तिला लक्षातच नाही राहील फोन सुरूच असल्याच . अनु बराच वेळ अशु माघारी येण्याची वाट पहात राहिली आणि नंतर तिने कंटाळून फोन ठेवला . थोडा वेळ काय कराव याचा विचार करत राहिली . तिला आठवल आपण बऱ्याच दिवसात चांगल संगीत ऐकलंच नाही . तिने मोबाईलमधे रेडिओ सुरु केला . वेगवेगळी चॅनेल्स , एक दोन चॅनेलवर तो इंस्ट्रूमेंचा गोंगाट आणि त्या जॉकींची बडबड सुरु होती . ती एकामागून एक चॅनल बदलत होती . अशीच ती त्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचली आणि तिथे सुरु होत ' ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा ... '
.... क्रमशः 

Saturday, August 17, 2019

प्रियतमा भाग ६

तिचं नाव जरी आठवल तरी मनात चलबिचल होते . एव्हढी क्षमता आहे आपल्यात . आपण मनात आणलं तर काहीही करू शकतो आणि तिच्यासाठीतरी नक्कीच . आणि सुधीरच तर असं आहे ना त्याच काही नक्की नाही , ना त्याच कॅरेक्टर , ना इतर काही . तो हिच्यावर खर प्रेम करत असेल का नुसता तस दाखवत आहे काय माहित . मग मी हे नक्कीच करू शकतो . पण तिचं खरच त्याच्यावर प्रेम असेल तर . मग आपलं अस त्यांच्या मधे येण चुकीच ठरेल मग काय कराव काही समजत नाहीये . हो खरच . तिच खरच प्रेम आहे त्याच्यावर आणि आपण जर काही उलट सुलट केलं तर तिला खूप त्रास होईल . छे मग हेच ठीक राहील कि आपण काहीही न करता सगळ देवाच्या भरोशावर सोडाव . त्याच्या मनात असेल तर होईल नाहीतर नाही . त्याचा निर्णय झाला होता . पण हा निर्णय त्याच्या मनाला फार लागला होता . तो तसाच विषण्ण मनःस्थितीत होता . तेव्हढ्यात त्याचे अंकल तिथे आले . तो त्याच्याच विश्वात गुंग होता . किती वेळ तरी त्याला अंकल आल्याच समजलच नाही . शेवटी अंकलनीच त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला सावध केल . त्याने वळून पाहिलं अंकल प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होते . त्याने पटकन आपला मूड बदलून हसत सामोर जाण्याचा प्रयत्न केला .
" ओह अंकल तुम्ही कधी आलात मला समजलच नाही . "
"  तुझं चित्त थाऱ्यावर नव्हत . "
" ओह आय अॅम सॉरी . "
" सॉरी नको, मला सांग काय घालमेल सुरु आहे तुझ्या मनात ? "
" तस काही नाही तुम्ही नका काळजी करू . "
" हे बघ तुला लहानपणापासून ओळखतो आहे . माझ्यापासून काही लपवून ठेऊ नकोस . "
त्याचा काहीच पर्याय चालला नाही तेव्हा त्याने सगळं त्यांना सांगून टाकलं . त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले
" तू खूप समंजस आहेस त्यामुळे योग्य तो निर्णय तू नक्की घेशील पण इतकं मात्र लक्षात ठेव प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत . "
एव्हढ बोलून ते गेले .
एव्हढया दिवसात इतक काही कमावलं आहे . या सगळ्यातून एक ताकत नक्कीच निर्माण झाली आहे . हि ताकत काय कामाची . एव्हढ्या ताकतीचा वापर केला तर काय बिघडत . पण दुसर मन म्हणत होत चुकीच वागूनच नाही तर बरोबर वागूनही उत्तर शोधता येत .
============================================================
" अरे तू पण तिच्या मागे आहेस का असं काय आहे तिच्यात ? "
त्याला जाताजाता या गोष्टी कानावर पडत होत्या . म्हणजे फक्त तोच नाही तर इतर लोकही होते जे तिच्या मागे होते . ती होतीच तशी कि कुणालाही आवडेल . तेव्हढ्यात ते गप्पा मारणारे दोघे हसत एकमेकांना टाळ्या देत तिथून गेले . त्यांचा असा समाज होता कि मानसी त्याच्याशी बोलते तेव्हा तिच्या बोलण्यातुन तिला त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर जाणवतो म्हणजे ती त्याचीच आहे . तो स्वतःशीच हसला या दोघांना तर खर काही माहितीच नाही उगाच खयाली पुलाव शिजवणं सुरु आहेत यांचे . बरोबर आहे कुणीही आणि कितीही लोक असू शकतात ज्यांच काही घेण ना देणं आहे पण त्यांना वाटत असेल कि ते डिसर्व करतात . आणि आपण त्या प्रत्येकासाठी तिला नाही सोडू शकत . मग हे तर नक्की कि आपण स्वतःला एक चान्स द्यायचा .
त्यासाठी सगळे अधिकार , सगळ्या ओळखी , सगळे नातेसंबंध वापरावे लागले तरी हरकत नाही . यासाठी सर्वस्व पणाला लावाव लागलं तरी हरकत नाही .
=============================================================
" सर आमचं काही चुकल आहे का ? " अमित अविश्वासाने विचारत होता .
" का काय झाल ? "
" सर इतकी माहिती गोळा केली सुधीरबद्दल आणि तुम्ही त्याला प्रमोशन देत आहात . "
" अरे अजून त्याची पूर्ण कुंडली नाही सापडली . तो काय करतो आहे ते तर कळलं पण का करतो ते तर नाही कळलं ना . ते शोधयच सुरु आहे आणि तोपर्यंत त्याला सेन्सिटिव्ह कामापासून दूर ठेवायच आहे आणि तेही त्याला संशय न येता . त्यासाठी हे सगळ . "
" सर तुम्ही ठरवलं आहे तर त्यावर खूप विचार करूनच ठरवल असेल . तेच योग्य ठरेल आम्हाला ते नाही समजणार . "
" तू नको जास्त विचार करू . जा त्याला हि बातमी दे . "
     ऑफिसमधे हीच चर्चा होती . सुधीरला प्रमोशन मिळाल होत त्याला स्वतंत्र केबिन आणि पर्सनल सेक्रेटरी सुद्धा होती . दब्या आवाजात त्याच्यावर हि मेहरबानी का व इतर डिझर्विंग लोकांना का डावलल गेल आहे याची चर्चा सुरु होती .
=============================================================
" तुझं काय सुरु आहे ? आपलं एम्पायर काय एव्हढ्याच ऑफिसवर एकवटलं आहे का ? तुझं इतर ऑफिसेसकडे दुर्लक्ष होतंय असं वाटत नाही का तुला ? "
अंकल फारच चिडून बोलत होते . त्याने अंकलला अस कधी पाहिलं नव्हत आणि आज ते असं का करत आहेत ? त्याने अंदाज बांधला आणि तो बोलला
" ते सुधीरच म्हणताय का ? "
" हे बघ कोण सुधीर हि इज नथिंग हिअर . तू अशा गोष्टींवर लक्ष देत बसला आहेस आणि दुसर काय सुरु आहे काही माहित आहे का तुला ? "
" का एव्हढ काय झालं अंकल ? "
त्याला काहीतरी सिरीयस आहे हे याचा अंदाज आला होता .
" हे बघ " म्हणत त्यांनी त्याच्यासमोर फाईल धरली .
" हे काय ? हे तर मला माहीतच नव्हतं . " तो आश्चर्यचकित होऊन ती पूर्ण फाईल पहात होता आणि जितकी पहात होता तितकाच चिंतित होत होता .
अंकलनी ती फाईल त्याच्या हातून काढून घेतली आणि म्हणाले
"आता लक्षात आलं का तुझ्या मी काय म्हणतो आहे ते ? "
" सॉरी अंकल माझी खरच खूप चूक झाली . माझ लक्षच नव्हत इकडे . "
तो खरच चिंतेत होता .
" आता हे बोलत बसू नको . यासाठी वेळ नाही . तू आताच निघ आणि योग्य ती ऍक्शन घे . "
तो तात्काळ निघाला .
खर म्हणजे सुधीरला ट्रॅप करण्यासाठीची योजना होती पण त्याला आता इतक अर्जंटली जाव लागत होत कि त्याच्याकडे लक्षही देता येणार नव्हत आणि माघारीही लवकर येता येणार नव्हत . त्यामुळे त्याने बराच विचार केला आणि जाण्यापूर्वी ती छोटीशी गोष्ट करून गेला . त्याला खात्री होती कि तो इथ नसला तरी त्याला हवं तस नक्कीच घडणार आहे किंवा तशी त्याची अपेक्षा तरी होती .
.... क्रमशः

Sunday, August 4, 2019

आरसपानी (भाग २)

एवढा वेळ तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता . पण त्याला बघून तिने त्याचा हात सोडला आणि ती दोन पावल माग सरकली . त्याने मान वळवली व तो जाऊ लागला . तिने आसपास पाहील अजूनही काही टवार मुलं दिसत होती . ती घाबरली . वळून तिने त्याला पाहण्याचा प्रयत्न केला. तो थोडा पुढे गेला होता . ती धावतच त्याच्यापाशी गेली आणि काही न बोलता त्याच्या मागे जाऊ लागली . थोड अंतर गेल्यावर त्याला तिची हालचाल जाणवली आणि त्याने मागे वळून पाहिलं . ती दचकून जागेवर थांबली .
" माझ्या मागे का येत आहेस ? जा ना घरी ." त्याने तिला दरडावून सांगितलं . तशी ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली आणि जाताना वळून वळून मागे पाहत होती . तेव्हढ्यात कोणीतरी मुलं मोटारसायकल रेस करत मोठ्याने आरडा ओरडा करत चित्रविचित्र आवाज काढत येत होती . ती वळून पळतच त्याच्यापाशी आली . तो ग्रूप आरडा ओरडा करत निघून गेला .
" तुझ काय आहे ? तू घरी का जात नाहीस ? " त्याने थोडं रागातच विचारलं .
" मी हरवली आहे . मला माझं घर सापडत नाही . "
" कुठ राहतेस तू ? "
ती रडवेली झाली .
" अग रडतेस काय ? सांग ना कुठं राहते ? "
" मला नाही आठवत ? "
" डोक्यावर पडली आहेस का ? "
तिने जोरात रडायला सुरुवात केली .
" अग म्हणजे ते डोक्यावर लागलं कि आठवत नाही तस काही आहे का ? "
ती रडतच होती आणि रडता रडता सांगत होती . मी इथ एक दोन दिवसच झाले आले आहे . मला इथलं काही माहित नाही . अगदी घराचा पत्ताही . मी फक्त थोड फिरून याव म्हणून बाहेर पडले आणि कुठे रस्ता चुकले काय माहित आणि मग कितीतरी वेळ शोधातच होते घर आणि मग इथं पोहोचले . "
बर म्हणजे इथ आसपासच कुठेतरी राहतेस . एक काम कर . त्याने हात करून तिथल्याच एका मुलाला बोलावल आणि त्याला म्हणाला
" ए जा रे हिला शेजारच्या कॉलनीत सोडून ये . "
तिने त्या मुलाकड पाहिल आणि पटकन मग सरकली .
" मी नाही जाणार याच्या बरोबर . "
" तो फक्त दिसतो तसा पण काय करणार नाही . जा तू . "
" मी नाही . "
" अग मग घरी कशी जाणार तू ? "
" तुम्ही चला . "
" मी येऊ सोडायला ? "
ते बघून तो मुलगा चिडून बोलला
" ए काय कळत का ? एक देईन ठेऊन . कोणाला बोलते काय ... " त्याने हातानेच त्या मुलाला थांबायची खूण केली . तस त्या मुलाने मधेच आपल बोलण थांबवल .

... क्रमशः 

Sunday, July 28, 2019

प्रियतमा भाग ५

दिवस असेच सुरु होते . त्या दोघांच भेटण अगदी नेहमी नाही व्हायच . पण जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हढा वेळ ते मनसोक्त एन्जॉय करायचे . त्याला आता कामातून वेळ काढून तिला भेटायची फार इच्छा व्हायची . पण तिला ते नेहमीच नाही जमायच. पण जेव्हाही जमेल तेव्हा मात्र त्यांचं भेटणं होत होत. त्याच कामात दुर्लक्ष होतय हे त्याला जाणवल . पण त्याला ते कंट्रोल करता येत नव्हतं. अगदी मोजक्याच भेटी गाठी झाल्या होत्या त्यांच्या पण ते एकमेकांना अगदी कॉम्प्लिमेंट करायचे . आता तर असं व्हायच एखादी गोष्ट बोलायच्या आधी ती दुसऱ्याला समजायची. त्याला तिच्याबद्दल वाटणारी ओढ हळूहळू वाढतच चालली होती. ती गोड अनुभूती त्याला सुखावत होती.
 
जे आपल्याला वाटतंय ते तिलाही आपल्याबद्दल वाटत असेल का ? याच विचाराने त्याला अस्वस्थ केलं होत . गेले कित्येक दिवस तो याच विचारत होता. तिला हे विचारण्याचा प्रयत्नही करत होता. पण ती जेव्हा समोर यायची तेव्हा तो तिच्यातच हरवून जात होता आणि तिला हे विचारायचं धाडसच व्हायचं नाही त्याच .

पण आज त्याने मनाशी ठरवल होत समोर बोलता येत नाही तर आज फोनवर बोलून या गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या. त्याने तिला फोन लावला.
" हाय, कसा आहेस ? "
त्याने काही बोलायच्या आधीच तिची गनमशीन सुरु झाली होती.
" मी ठीक आहे.  तू कशी आहेस ? "
" मस्त "
" अग मला तुला काही सांगायच आहे . "
" मलाही तुला काही सांगायच आहे. "
" ऐक ना "
" नाही आधी तू ऐक मी काय सांगतेय ते. "
" अग पण "
" अग नाही आणि काही नाही "
" बर बोल . " ती आपल्याला बोलूच देणार नाही याची त्याला खात्री झाली होती.
" अरे माझं लग्न ठरलय "
क्षणभर त्याला आपण काय ऐकतोय हेच समजत नव्हतं . ती मात्र बोलतच होती.
" अरे म्हणजे आज नाही काही तीन महिने झाले आहेत "
त्याला काय बोलाव हेच समजेना . पण काहीतरी विचारायच म्हणून त्याने विचारल
" काय करतो मुलगा ?" बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं काय बोलतोय तो ? मुलगा वगैरे काय ? कुणी नातेवाईक करतात तशी काय चौकशी करतोय आपण . हा विचार तो करतच होता तोपर्यंत तिने रिप्लाय केला
" अरे तो माझ्याच कंपनीमधे आहे. "
आता मात्र तो सावध झाला .
" काय म्हणालीस. पण माग तर तू म्हणालीस कि इथं तुझं कोणी ओळखीचं नाही. "
" अरे ती पण एक गम्मतच आहे. "
" गम्मत ? काय गम्मत ?"
" अरे त्यानेच मला सांगितल होत कि कुणापुढेही नाही सांगायच आपल्या रिलेशन बद्दल "
" आणि असं का ?"
" उगाच कशाला कुणाची नजर लागायला "
" बर "
" पण कस आहे, तू  माझा बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून तुझ्याकडे मन मोकळ करते आहे. "
" बेस्ट फ्रेंड आहे ? आणि आता सांगते आहेस ? "
" अं ... " तिला काय बोलाव सुचत नव्हत . त्यानच तिला पुढे विचारलं
" अच्छा . बर किमान नाव तरी सांग त्याच . "
" सुधीर "
त्यानंतर मात्र त्याला तीच बोलणं काही ऐकूच येत नव्हत
तो विचार करत होता .


Sunday, June 23, 2019

प्रियतमा भाग ४

" समीर काय झालं ? "
" सर हे आहेत सगळे डिटेल्स . सर आम्ही त्च्याया नातेवाईकांपर्यंत अनेकांना स्कॅन केलं पण काही संशयास्पद वाटलं नाही . तुम्ही एकदा पाहून घ्या. "
त्याने एकदा त्याच्यावरून नजर टाकली . पाटील क्लीन होता .
" गूड वर्क समीर. "
" थँक यू सर "
समीरला जायला सांगून त्याने अमितला बोलावून घेतलं .
" सो अमित काय प्रोग्रेस ? "
" सर हा सुधीर काय आहे हे समजत नाहीये . त्याच्या बद्दल काही गोष्टी समजत नव्हत्या म्हणून आम्ही आमचा कॅनव्हास वाढवला तर त्याच जाळं अजूनच वाढतंय ."
" हा सुधीर माणूस आहे का स्पायडर मॅन ? "
" सर त्याच सगळंच संशयास्पद आहे . बँकेचे व्यवहार, पर्सनल लाईफ, फोन डिटेल्स सगळच  संशयास्पद आहे . "
" हे बघा बँक डिटेल्स . "
त्याने पाहिलं आणि ते पाहून तो चपापला.
" हे काय आहे ? "
तो जितकं पाहत होता तितकं त्याला आश्चर्य वाटत होत.
" अरे काय आहे हे ? "
" हो ना सर आणि याची फोन डिटेल्स पण अशीच आहेत "
त्यानं पाहिलं अमितनं जागोजागी मार्क केल्यामुळे त्याला सहज सगळं लक्षात येत होत
सगळंच विचित्र आहे .
" सर हे असच त्याच्या सोशल साईट्स बाबतीतही आहे . त्याला मुलींचा फार नाद आहे . तो एक स्ट्रीकर आहे . हि काही मुलींची नाव आहेत त्यातल्या. "
" हे नाव आहे का त्यात कुठं ? " त्याने एक पेपर समोर करून त्यावरच नाव त्याला दाखवलं .
अमितने ते नाव पाहिलं आणि तो म्हणाला, "नाही सर हे नाव नाही त्यात कुठेच . "
" ग्रेट जॉब अमित. आता एक काम कर हे काम चालू ठेव असच अजून काय सापडतंय का ते बघ. "

त्याने पाटीलला बोलावून घेतलं .
" पाटील आपले सगळे इंटरव्यू राउंड झाले ना ? "
" हो सर "
" बर आपण फर्स्ट राउंड साठी काय ठरवलं होत सिलेक्शन बद्द्ल ? "
" सर एक्सपिरियन्सड आणि फ्रेशर अशा दोन्हीही रिक्वायरमेंट होत्या . " त्याने सोबतच्या फाईल मधले आकडे दाखवले .
" ठीक आहे ते ठेव . आणि हि लिस्ट बघ . हिला ओळखतो तू ? "
" नाही सर . " पाटीलच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले होते .
" हि कशी होऊ शकते इतक्या सहज सिलेक्ट . एकवेळ वेटिंगला राहून नंतर चान्स बनू शकला असता पण डायरेक्ट सिलेक्शन . "
" सॉरी सर ते मी... "
" हे एकच असं आहे कि अजूनही ? "
" नाही सर हे एकच . ते मी त्या सुधीरच्या ..."
" हं " त्याने पाटीलला अडवलं.
" सर त्याच्या बोलण्यात आलो मी. त्याला तर असा सुनावणार आहे ना . "
" असं तू काहीही करणार नाहीस . जसा नेहमी बोलतोस तसाच बोल . नो चेंज . "
" ओके सर . आणि आय अॅम रियली सॉरी "
" ठीक आहे पण असं परत होता कामा नये . हि तुला लास्ट वाॅर्निंग अँड लास्ट चान्स . "
पाटील गेला.
तिलाच घ्यायचं होत तर इतका खटाटोप करायची काहीच गरज नव्हती . ती पुढच्या राउंडमध्ये आलीच असती . मग हे सगळं कशासाठी . प्रकरण काहीतरी वेगळं आहे . ते शोधायला हवं .

... क्रमशः

Saturday, June 22, 2019

आरसपानी ( भाग १ )

     सप्तरंगी स्वप्न होती तिच्या डोळ्यात . छोट्या शहरातून येताना असलेला आणि या महानगरात येऊन थोडासा मावळलेला तिचा कॉन्फिडन्स . आज ती एकटीच बाहेर निघाली होती. नुसतंच काय घरात बसून रहायचं . हा रस्ता तिला तिच्या खिडकीतून दिसायचा . पुढे जाऊन डावीकडे वळतो हा . तिथून थोडंसं पुढं गेलं कि तिथून माघारी यायचं. बस एक छोटेखानी फेरी मारून ती फ्रेश होणार होती . तिनं घरातसुद्धा काही सांगितलं नव्हतं . उगाच परमिशन घेईपर्यंत आपण माघारी येऊ एव्हढा साधा हिशोब होता तिचा.

     साधासाच वाटणारा तो रस्ता पण ती माघारी येताना चुकली होती. कुठलंसं वळण चुकलं होत तीच पण ते दुरूस्त करण्याच्या नादात ती भलतीकडेच भटकली होती . थोडासा मोकळा श्वास घेता यावा थोडंसं बंधनातून मुक्त व्हावं या विचाराने बाहेर पडलेल्या तिचा श्वास गुदमरत होता. त्या अरुंद घाणेरड्या गल्ल्या त्यातून तिला जाताना पाहून  येणारे तिच्याकडे वळून वळून पहात होते . नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर तिनं पाऊल ठेवलं होत . या सगळ्या प्रकारामुळे ती घाबरली होती. गोंधळली होती . काय करावं तिला सुचत नव्हतं . कुणालातरी विचारावं ,पण काय विचारावं ? तिला तिच्या बिल्डिंगचं नाव आठवतं नव्हतं , ना कॉलनीच नाव . ती शेजारच्या दुकानात विचारणार होती पण काय विचारायचं ? तिला आता खूप भीती वाटू लागली होती .

     समोरून मुलांचा एक घोळका येत होता . त्यांचा एकूण अवतार त्यांचे हावभाव पाहून ती घाबरली . ती त्या अरुंद गल्लीतून जाताना अंग चोरून त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती . पण ती मुलं तिच्या दिशेलाच येत होती. तिने घाबरून शेजारी उभ्या असलेल्या माणसाच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला . ती मुलं मुद्दाम तिकडेच येऊ पाहत होती. तिने त्या माणसाचा हात घट्ट पकडला . ते पाहून एक मुलगा पुढे आला . तिला खेचून बाहेर काढण्याचा त्याचा विचार होता. एव्हढ्यात तो माणूस वळला . त्या  मुलाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती तरळली . ' सॉरी भाई ' म्हणत तो धडपडत मागे फिरला . आणि पटकन तिथून निघाला . बाकीची मुलंही तिथून पसार झाली . तिनं त्या माणसाच्यामागून डोकावून पाहिलं सगळी मुलं गेली होती . तिला हायस वाटलं . ज्याच्यामुळे आपण वाचलो त्याचे आभार मानन्यासाठी तिने त्याच्याकडे पाहिलं पण त्याला पाहून तिची भीतीने गाळणच उडाली.

... क्रमशः

Sunday, June 16, 2019

प्रियतमा भाग ३

" अगं काय किती दिवस भेटली नाहीस . कुठे आहेस कुठे ? "
" बस "
" बस ? का ? "
" माझी बस आली . " तिने पाठीमागे बोट करून दाखवलं.

Saturday, June 8, 2019

प्रियतमा भाग २

" अरे ती जाम कंजूस आहे . "
" मुली पैशाच्या बाबतीत थोड्या काटकसरीचं असतात . "
" अरे ते वेगळं . ती एक स्टॉप आधीच उतरते आणि तिथून चालत येते . जवळपास अर्धा किलोमीटर किंवा जास्तच अंतर असेल का तर ३ रुपये वाचतात आणि व्यायामपण होतो अशी ती जाता येता ६ रुपये वाचवते . कोण करत असं . किती तो कंजूषपणा . "
***
ती तिच्या जगात मग्न होऊन गुणगुणत चालली होती . तितक्यात एक कार शेजारी येऊन थांबली .     ' मानसी ' अशी हाकही ऐकू आल्यासारखी वाटली. ती थोडी बावरली . तेव्हढ्यात कारची ग्लास खाली झाली . ओळखीचा चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलं .
" तुमची कार आहे ? "
" अगं कार कंपनीची आहे . इम्पॉर्टन्ट डॉक्युमेंट किंवा काही महत्वाचं काम असलं कि मला यातून जाता येत . त्यामुळे तशी सध्या माझीच आहे. तू ये ना तुला सोडतो . "
" नाही मला थोडं पुढेच जायचं आहे स्टॉपपर्यंत . "
" असू दे तिथपर्यंत सोडतो . "
ती कारमध्ये बसली .
" ओह सॉरी मी तुम्हाला एकेरी बोललो "
" नो इट्स ओके . तुम्ही मला एकेरीच बोला "
" चालेल पण मग तुही मला तसच बोल "
" पण.. "
" आता पण नको "
" हो पण तुमचं आय मिन तुझं नाव काय आहे ? "
" मी रोहित "
" ओह "
"अग पण एक सांग ऑफिस बिल्डिंगच्या अपोझिट साईडला थोडं पुढं गेलं कि बस स्टॉप आहे . मग तू इतक्या दूर का जात आहेस ? "
" नाही पुढे एक बस स्टॉप आहे. मी तिकडूनच बस पकडते . दिवसभर बसूनच असते ना . थोडे पाय मोकळे होतात . "
" ओह असं आहे "
" हो बघा ... म्हणजे बघ कुठं दूर आहे माझा स्टॉप हा आला बघ "
असं म्हणून ती उतरली .
तिला निरोप देऊन तो निघाला .
***

" समीर एक काम कर . त्या दिवशी इंटरव्यू झाले त्या दिवशीच त्या एरियाच सीसीटीव्ही फुटेज हवं आहे . रिसेप्शन, इंटरव्यू पॅनल, लॉबी अगदी सगळं . "
ते फुटेज घेऊन समीर आला .
" सर काही विशेष शोधताय का "
त्याची नजर पाहून समीर " सॉरी सर "
" हा कोण आहे ?"
समीरन पाहिलं
" सर हा सुधीर आहे . अमितच्या टीममध्ये आहे. "
" कधी जॉईन झाला आहे?"
" सहा महिने झाले असतील "
' याच काय काम आहे सिलेक्शन टीम सोबत ' तो मनातल्या मनात पुटपुटला .
" एक काम कर पाटीलला स्कॅन कर . त्याची बँक आणि कॉल डिटेल्स घे मागच्या काही महिन्यांची
गरज पडलीतर फॅमिली, फ्रेंड आणि नातेवाईक यांचीही . "
" जा तू . "
समीर गेला .
" जरा अमितला पाठवून दे "
" सुधीर तुझ्या टीममध्ये आहे ना ?"
" हो सर "
" कसा आहे ?"
" का काही प्रॉब्लेम आहे का "
" म्हणजे कामात तर ठीकच आहे. इतरांसोबत पण चांगलं आहे. दुसऱ्या टीम्स किंवा इतर डिपार्टमेंटमधील लोकांशीही त्याच बोलणं असत . "
" तुला एक ऍडिशनल काम आहे. आणि हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील "
" ओके सर "
" त्याला टोटल स्कॅन करायचा . सोशल साईटस् , कॉल डिटेलस्, बँक डिटेल्स सगळं काही . जे कोण एक्स्पर्ट लागतील ते बघ . प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गरज लागल्यास घे . पण हे सगळं कंपनीपासून दूर पर्सनल लेव्हल वर करायचं . "
" ओके सर "
" जा तू आणि लवकरात लवकर रिपोर्ट कर . "
***

" काय माणूस आहेस तू ? तुला काम सांगायच्या आधी तू कामाला लागला वाटत. दॅट्स गुड . बर आता कोणत्या नावाने वावरतो आहेस ? "
" ... "
" गुड "

... क्रमशः

Monday, June 3, 2019

प्रियतमा

 आज उशीर होत होता त्यामुळे तो इकडे आला होता . नाहीतर या लिफ्टने तो कधीच जात नव्हता . लिफ्ट पूर्ण भरली होती पण एका माणसाला जागा होऊ शकत होती . तो आत शिरणार तेव्हढ्यात मागून आवाज आला, "प्लिज मला जाऊ द्या ना . "
त्याने वळून पाहिलं  ती फारच अस्वस्थ वाटत होती तिच्या डोळ्यात ते जाणवत होत . त्यालाही उशीर होत होता पण त्यान तिला जाऊ दिलं .
" सर आज आप इस लिफ्टसे . "
" बस कभी कभी चेन्ज भी जरुरी होता है . "
***

" पाटील कुठपर्यंत आले इंटरव्ह्यू ? "
" सर आताच सुरु झाले आहेत . "
" ओके यु कॅरी ऑन ."
***

" हि मुलगी कोण आहे ? हीचा इंटरव्यू झाला का ?" त्यानं रिसेप्शनिस्टला विचारलं .
" सर मघाशीच जाऊन आली. "
" तिचा रिपोर्ट जरा मला द्या. "
" ओके सर "
***

" ओके पाटील सिलेक्शन झाली सगळी? "
" हो सर पहिल्या लॉटसाठीची सिलेक्शन झाली आहेत.  हि आहे लिस्ट. "
'मानसी. हि आहे लिस्ट मध्ये. ओके. 'तो स्वतःशीच पुटपुटला .
***

त्यादिवशी तो जरा लवकरच आला होता व आज जरा निवांतच होता . तेव्हढ्यात त्याला त्यादिवशीची ती मुलगी दिसली . तिने त्याला पाहिलं व स्माईल करत ती त्याच्याकडे आली.
"ओ हाय, मला तुम्हाला थँक्स म्हणायच होत. "
"कशासाठी?"
"तुम्ही त्या दिवशी मला जाऊ दिलंत त्यासाठी."
"अहो एव्हढ्यासाठी कसलं थँक्स"
"अहो तुमच्यासाठी एव्हढसच आहे पण माझा इंटरव्यू होता त्या दिवशी आणि पोहोचल्या पोहचल्या मला आत बोलावलं बर झालं वेळेत पोहोचगले नाहीतर सुरुवातीलाच बॅड इम्प्रेशन पडलं असत."
"तुम्ही सर्वात शेवटी तिथे पोहोचला आणि तुम्हाला सर्वात आधी बोलावलं स्टेंज ना."
"तस नाही पर्वा दिवशीच इंटरव्यू बद्दल त्यांनी कळवलं होत . तेव्हा माझं नाव आधी असेल म्हणून.
"बाय द वे तुमचं नाव काय?"
"मानसी ... मानसी देसाई"
"m .... d ... म्हणजे अल्फाबेटीकलीपण ..."
"ते सोडा हो पण मला जॉब मिळाला. सो थँक्स."
"तुम्हाला जॉब मिळाला आणि नुसतं कोरड थँक्स."
त्याच्या हातावर पाण्याचे काही शिंतोडे उडले. त्याने चमकून पाहिलं तिने तिच्या बॉटलच्या टोपणातलं पाणी झटकलं होत . त्याने तिच्याकडे पाहिलं. ती स्माईल करत होती.
"तुम्हीच म्हणाला ना कोरड कोरड म्हणून ..."
"अहो म्हणजे ..."
"नाही बरोबर आहे पण काय आहे ना आज जाण्यायेण्यापुरतेच नेमके पैसे आणलेत सो ."
"इट्स ओके"
"पण मी तुम्हाला नक्की ट्रीट देईन."
"असू द्या हो पण आज तुमच्या साठी चांगला दिवस आहे . मी देतो तुम्हाला ट्रीट."
"अहो असं कस मी द्यायला हवी ट्रीट."
"आज मी देतो ट्रीट. तुम्ही नंतर द्या चालेल?"
"पण ...."
"पूरे ... चला "
आता तिला पर्याय उरला नव्हता . ते दोघे कॅफेटेरियात गेले. तिला फारशी सवय नसावी अशी . ती थोडी अन्कम्फटेबल, थोडी बुजल्यासारखी वाटत होती. त्याने तिला नॉर्मल करण्यासाठी सहजच विचारलं.
"तुम्ही आधी कुठे होता जॉब ला"
"नाही हो . पहिलाच जॉब आहे  आताच माझा रिझल्ट लागला फायनल इयरचा."
मधेच तिने त्याला विचारलं
" कोणत्या फ्लोअरवर आहे तुमचं ऑफीस?"
"तस नाही माझं मोस्टली फिल्डवर्कच असत. मी आमच्या ऑफिसच्या मेन ब्रांचला असतो . इथे थोडं काम आहे म्हणून आलोय या ब्रान्चला ."
"म्हणजे नेहमी तुम्ही इथे नसता ?"
"नाही"
"ओह मग तुम्ही परत कसे भेटणार?"
"अं?"
"तुम्हाला मी ट्रीट देणार आहे ना."
"असू द्या येईन मी कधीतरी"
"तस नको तुमच्या मेन ऑफिसचा पत्ता द्या"
"एक काम करा माझा फोन नंबर देतो . तुम्हाला सोपं जाईल . नाहीतर तेव्हढ्यासाठी तुम्ही इतक्या दूर मेन ऑफिसला जाणार आणि मी बाहेर असलो तर. "
"अरे हो ते पण आहेच"
त्यांचं आवरलं होत .
" बर भेटू पुन्हा" म्हणून ते निघाले .

Sunday, March 31, 2019

I Love You

" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . "

   " अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . "

   " अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . "

   " चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला             मानलं . "