" सर आम्हाला पण शिकवा कि हे "
" काय शिकवायचं आहे ? "
" हेच जे तुम्ही दिवसभर करत असता . "
" हे कुठ काय . काम आहे माझं तेच चालत दिवसभर . "
" तरीही दिवसभर तुमच्या तालावर सगळ ऑफिस चालत "
" अस का "
" तुमच्या इथून गेल्याशिवाय काम होत नाहीत . "
" हो ते खर आहे . माझी पोझिशनच अशी आहे कि तुम्हा सर्वांना इथून जाव लागत ना . "
" हो तर "
" बर तुझ काम झाल का ? "
" नाही ना . आता नविनच आले आहे अजून तितकस नाही जमत काम व्यवस्थित . पण मी लवकरच शिकेन . मी खूप फास्ट आहे त्यात . "
" बर मग पहिला रिझल्ट कधी देते आहेस ? "
" सध्यातरी काही नाही . पण लवकरात लवकर देईन मी रिझल्ट . "
" ऑल द बेस्ट "
==========================================================
" अरे कुठल्या बेसीसवर घेतात यांना काही माहित नाही . इतक विचित्र बोलतात क्लायंट सोबत कि काय विचारायची सोय नाही . "
" अरे अस का म्हणतोय अजून काही एक्सपिरिअन्स नाही त्यांना . थोडा वेळ जाऊदे मग करतील . "
" सुमित, तुझा भारी सपोर्ट असतो हा या सगळ्यांना . "
" अरे असायलाच हवा . थोड एन्करेज तर करू शकतो ना आपण यांना . "
" तुला अजून व्यवहार नाही कळत सुमित . हे सगळे गोडबोले आहेत फक्त . त्यांच त्यांच काम कसही करून काढून घ्यायच एव्हढच माहित आहे यांना . "
" अस कस असेल सगळेच कसे असतील असे ? "
" हो मान्य आहे सगळेच नसतील असे पण काही तर नक्की आहेत आणि कोण अस आहे आणि कोण नाही हे समजायला इतक सोप नाही . "
" हो हे खर आहे . ज्याचा त्याचा स्वभाव . तो आपण नाही बदलू शकत . तेच माझ आहे . मलाही चांगलच वाटत त्यांना सपोर्ट करण , म्हणून तर करतो . बाकी काही नाही . "
" हो तुला सांगितलं तरी तू काही सुधारणार नाहीस सुमित . "

कामातून थोड मोकळ करणारा ब्रेक मिळाला आणि सगळे चहा कॉफीचा स्वाद घेत गप्पामधे मग्न होते . सुमित निवांतपणे खिडकीतून बाहेर पाहत कॉफीचा स्वाद घेत होता . तितक्यात त्याला पाठीमागून कुणीतरी हाक मारली . त्याने माग वळून पाहिलं . प्रिया उभी होती आणि त्याला आवाज देत होती .
" काय कुठ आहे लक्ष ? "
" काही नाही ग थोड निवांतपणे बाहेरचा निसर्ग पाहत होतो . "
" इथं इतके लोक आहेत आणि तुम्ही असे एकटे एकटे का ? "
" कस आहे प्रिया दिवसभर काम आणि बाकी सारं असत त्यातून असा स्वतःसाठी वेळच नाही मिळत . असा वेळ मिळाला कि थांबतो मग स्वतःसोबत . तुही वेळ घालवत जा स्वतःसोबत थोडातरी चांगलं वाटेल . "
" तुमच्यासारखं मला नाही जमणार . मला एकट राहिलं कि त्रास होतो . काही जुन्या आठवणी छळू लागतात . "
" एव्हढ काय आहे ? "
तेव्हढ्यात ब्रेक संपला आणि सगळे जाऊ लागले . प्रियाही जाऊ लागली .
" प्रिया सांगितल नाहीस . "
" सांगेन. नक्की सांगेन पण आत्ता जाव लागेल . "
=============================================================
त्या दिवशी वेळ होता आणि आता सर्व सविस्तर विचारता येईल प्रियाला म्हणून तिच्यासमोर तो विषय काढला .
" तुम्हाला एक बोलू तुमच्या समोर मन मोकळ करते म्हणून जरातरी ठीक आहे पण कधी कधी अस वाटत कि जीव द्यावा "
" जीव द्यायचा आहे तुला सोप आहे बघ हि खिडकी आहे बघ बरीच उंचावर इथून उडी मारलीस कि सगळ संपल पण कस आहे आता जी तू इथं उभी आहेस ते काही एका दिवसात झालेलं नाही . त्यासाठी तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं असेल . आणि जवळपास २-२.५ किलो वजन असत बाळाचं . कधी पाठीला २.५ किलोची बॅग अडकवून दिवसभर फिरून पहा कस वाटतय ते सांग . आणि हे काही तास आहे इथतर चोवीस तास हे सांभाळायचं असत आणि तेही खांद्याला नाही पोटाच्या नाजूक स्नायूंना हा भार सहन करावा लागतो . "
" सर तुमचं सायन्स होत का ? "
" हो होत "
" किती भयंकर सांगता हो तुम्ही बाकीच सोडून याचीच भीती वाटावी . "
" आणि इतकच नाही कधी लहान बाळ सांभाळलं आहे . "
" हो सांभाळलं आहे कि . मला खूप आवडतात . "
" ती वेगळी गोष्ट . दुसऱ्याच्या मुलाला थोडावेळ खेळवणे वेगळ आणि २४ तास स्वतःच्या मुलाला सांभाळणं वेगळ . त्या एव्हढ्याश्या बाळाची इतकी मोठी मुलगी व्हायला तुझ्या पेरेन्टस्ला किती त्रास सहन करावे लागले असतील हे तुला आता नाही कळणार . ते तेव्हा कळेल जेव्हा तू स्वतः आई होशील . "
आता मात्र तिला काय बोलावं हे समजत नव्हत .
" आता सांगशील का काय झाल इतक ? " सुमितने परत विचारल .
" तुम्ही कधी कुणावर प्रेम केल आहे का ? " तिने त्यालाच प्रतिप्रश्न केला .
" म्हणजे प्रेमभंगातून तू हे करणार आहेस तर . "
" प्रेमभंग किती सहज बोलून मोकळे झालात ना तुम्ही . पण त्याच दुःख काय असत हे त्यालाच माहित जो यातून गेलेला आहे . "
" सांगशील तर कळेल ना मला . "
" काय सांगू आणि काय नको . कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही . "
" अतुल, अतुल त्याच नाव . आम्ही एकत्र होतो कॉलेजला . तो आवडायचा मला पण बोलता आल नव्हत किती दिवस . तो सगळ्या फ्रेंड सर्कलच्या सेंटर पॉइंटवर असायचा . अगदी हसरा खोडकर . कुणालाही प्रेम व्हाव असाच होता तो . आणि मी... मी त्याच्या अगदी विरुद्ध . मला राग फार यायचा . फ्रेंड सर्कलमधे होते पण माझ फार कुणाशी बोलण व्हायच नाही . माझी एक खास मैत्रीण होती तिच्यासोबतच असायचे मी जास्त आणि तिच्यामुळेच मी त्या सर्कलला जोडली गेली होती . एकदा त्याने माझी खूप चेष्टा केली . म्हणजे तस सगळ्या ग्रुपचं ठरल होत . आणि तो फक्त पुढे होता . पण बाकीचेही त्याला साथ देत होते . पण माझा सगळा राग त्याच्यावर निघाला . तो खरतर इतका घाबरला होता माझा अवतार पाहून कि काय सांगू ते आठवून आताही हसू येत . त्या दिवसानंतर मी बरीच मिसळले ग्रुपमधे . आणि त्यांनी माझं नावही ठेवल होत .
" काय नाव ठेवल होत ? "
" चिडकू , काय नाव झाल का हे . पण ते वेडेपणाचे दिवस होते आणि तसेच होते सगळे . "
नंतर माझी ती मैत्रीण एका मुलासोबत एंगेज झाली . ती त्याला भेटायला जायची तिच्या सोबत मी असायचे . आणि त्या मुलासोबत अतुल असायचा . सगळे एकत्र असायचो तोपर्यंत ठीक पण जेव्हा ते दोघंच असायचे तेव्हा मात्र आम्हा दोघांनाच दुसरीकडे थांबव लागे . आणि तेव्हा जर त्याने पाहिलं काही काम केलं असेल तर ते म्हणजे त्याने माझी माफी मागितली अगदी कितीतरी वेळा . मी त्याला सांगितलं होत कि मी तुला माफ केलं तरीही कितीतरी वेळा तो माफी मागतच राहायचा आणि तेही असं कि मला खूप हसू यायच . खूप खुश असायचे मी त्याच्या सहवासात . माझी मैत्रीण बाजूला राहिली आणि मी आणि अतुलच जास्त एकत्र राहू लागलो . कॉलेजमधे आल कि सगळा वेळ त्याच्या सोबतच जायचा . कितीवेळ आम्ही बोलायचो आणि किती नाही याच भानच राहायचं नाही . एकदा त्यांच्या घरी पूजा होती तेव्हा आमचा ग्रुप सगळा ग्रुप त्यांच्याकडे गेलेला तेव्हा त्याच्या घरच्यांसोबत माझी छान ओळख झाली होती . त्याच्या आईच आणि माझं खूप छान जमल होत . सगळी काम करताना आम्ही दोघी सोबतच होतो . दोघीमध्ये वयाच अंतर असूनही ते तस जाणवलच नाही . तो दिवस खूप छान गेला आणि जाताना त्याच्या आईने मला परत येत जा म्हणून सांगितल . आणि त्यानंतर तर काय मी नेहमीच त्यांच्या घरी जायचे . अगदी सर्वांसोबत माझ छान जमायच . आणि अतुलच तर काय आम्ही अगदी नवरा बायको सारखेच झालो होतो फक्त आता कधीतरी लग्न होईल आणि आम्ही ऑफिशिअली त्या नात्यात येणार होतो . पण म्हणतात ना सगळ कस चांगल होईल .
त्याचा त्याच्या व्यवसायात जम बसू लागला . ते लोक मोठ प्रस्थ झाले . मी खुश होते त्याच्या प्रगतीने पण मला कुठे माहित होत पुढे काय वाढून ठेवल आहे माझ्यासाठी . तो हळूहळू माझ्यापासून दूर राहू लागला . त्याला माझ्याशी बोलायला भेटायला वेळ मिळेनासा झाला . त्याच काम , त्यातून त्याला वेळ मिळत नाही हि त्याची सबब होती . मीही विचार केला तो प्रगति करतो आहे तर करुदे . चांगलच आहे ना . पण मी वेडी होते आणि अशीच गाफील राहिले . आणि एके दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला . त्याच लग्न आहे उद्या . मला तर काही समजेनासच झालेल . मी त्याला फोन करत होते पण तो उचलत नव्हता . मी त्याच्या घरातल्या सर्वांना फोन लावून पाहिला पण एकतर फोन लागत नव्हते किंवा लागले तरी कुणी ते उचलत नव्हत . मी खूपच सैरभैर झाले . सरळ त्याच घर गाठलं पण तिथे कुलूप होत . शेजारी चौकशी केली तेव्हा समजल कि गावी गेले आहेत आणि त्याच लग्न आहे . किती वय असेल माझं आणि किती समज असेल . सोबत फारशे पैसेही नाहीत . पण फार काही विचार न करता होते तेव्हढे पैसे घेऊन मी त्याच्या गावी गेले तर तिकडे समजलं कि ज्या मुलीसोबत त्याच लग्न होणार आहे त्या मुलीच्या गावी गेले आहेत ते . ते गाव तिथून बरच दूर होत माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते पण मी तशीच निघाले . शेवटी काही अंतर तर मला विदाउट तिकीट प्रवास करावा लागला . मला गाडीतून मधेच रस्त्यात उतरवल . मी तशीच चालत तिथून त्या गावापर्यंत पोहोचले . पण तिथे मला कुणी दाद लागू दिली नाही . मला दमदाटी करून मला बाजूला सारून त्यांनी ते लग्न उरकलच .
इतक्या आड बाजूच्या गावात कोणी ओळखीच ना पाळखीच कोण मदत करणार माझी . मला तर काय कराव हेच समजेनास झाल होत . मी तिथून कशी घरी आले ते माझं मला माहित . माघारी आले आणि आजारी पडले . आपण जिवंत राहूच नये असच वाटत होत मला . त्यामुळे लवकर बरीही नाही झाले . पुढे कशीबशी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. अनेक फ्रेंड्सनी मदत केली यातून बाहेर पडायला पण जेव्हा एकटी असते तेव्हा परत त्या आठवणी रुंजी घालू लागतात . मग प्रश्न पडतो कि का जगते आहे . म्हणूनच म्हटल कधी कधी वाटत मरून जाव . "
" तो अतुल कसा आहे आता ? "
" छान चालल आहे त्याच . संसार आहे बायको आहे आणि एक मुलगीही आहे. कस आहे ना कधी कधी वाटत कि जे लोक वाईट वागतात त्यांच चांगल होत . आणि जे यात त्रास सहन करतात त्यांनाच पुढही दुःख भोगावी लागतात. "
" मला माहित नव्हतं तुझ्या आयुष्यात इतक काही घडून गेल आहे . माझ्यामुळे तुला हे सगळं परत आठवाव लागल . "
" आठवायच काय त्यात ते नेहमी असत माझ्यासोबत फक्त आता बोलले इतकच . "
त्यानंतर मात्र त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला . तिला शक्य ती मदत व्हावी . तिला शक्य तितकं एन्करेज करण सुरु होत . पण बहुदा तिचं मन तिथे लागत नव्हत . एकूणच परिस्थिती अशी होती कि तिच कामही व्यवस्थित होत नव्हत त्यामुळे ती फार दिवस तिथे राहील अस वाटत नव्हत . एक दिवस ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली
" मी आता इथे फार दिवस नाही राहणार . "
" का गं ? असं का ? "
" का आणि काय नाही राहणार . पण मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरून जाल ना . "
" तुझं नाही माहित पण मी तर तुला नाही विसरणार. "
" इथं किती लोक येतात किती जातात तुम्ही सर्वाना थोडीच लक्षात ठेवणार आहे ? "
"सर्वाना नाही पण तू नक्कीच आठवणीत राहशील . "
दोघांनी आपले नंबर एक्सचेंज केले .
ती त्या दिवशी जाणार होती त्या दिवशी त्याने तिला सांगितल कि जाताना भेटून जा . तो वाट पाहत होता पण ती त्याला न सांगताच गेली . त्याला राग आला होता तिचा .
काही दिवसांनी ती परत आलेली ऑफिसमध्ये पण त्याने लक्षच नाही दिल तिच्याकडे . ती त्याला भेटायला आली पण तो दुसऱ्याच कामात मग्न राहिला . दोघांचं काही बोलणंही नाही झालं .
काही दिवसांनी त्यांची परत भेट झाली तोपर्यंत त्याचा राग शांत झाला होता .
" तुम्ही तर म्हणाला होतात कि मला विसरणार नाही आणि त्यादिवशी साध बोललाही नाही . मी स्वतःहून भेटायला आले होते ना तुम्हाला . "
" त्या दिवशी तुला ऑफिसमधून जाताना थांब म्हटल होत . तू थांबलीस का ? "
" त्या दिवशी माझं भांडण झाल त्यांच्यासोबत मग कशी थांबणार होते मी . सरळ निघून जावं लागलं तिथून मला . "
" मला राग आला होता तुझा . "
" तुम्ही पण काय कशावर राग येईल तुम्हाला सांगता यायच नाही . आणि नंतर तर मी स्वतःच आले होते ना तुम्हाला भेटायला मग का नाही भेटलात . "
" त्या दिवशीचा राग होता म्हणून . "
" आता गेला ना राग "
" हो "
त्यानंतर दोघांचं फोनवरच बोलण व्हायच . ती कशी आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही . नेहमीचच बोलता बोलता तिची इतकी चिंता इतकी काळजी आपण का करतो आहे याच काही उत्तर त्याला मिळत नव्हत . सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना अजाणतेपणे काही लोक आपल्या मनाच्या इतक्या जवळ येतात कि काही विचार करणही अवघड होऊन जात .
त्यादिवशी त्या दोघांच बोलणं सुरु होत त्याच्या शब्दातली काळजी तिलाही जाणवली आणि तिने विचारलं
" का करता इतकी काळजी ? "
" नाही माहीत "
" नसेलच माहित तर शोधा कारण . आणि कारण माहित असूनही स्वतःलाच नसेल पटत तर ...
इक सांगू ज्या रस्त्यावर चालून इच्छित स्थळी पोहचता येत नाही त्या रस्त्यावर चालू नये . " तिने थोडक्यात महत्वाचं सांगितल होत .
" तुला माहित आहे आपल्या हृदयाची धडधड मुद्दाम करावी लागत नाही ती आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत होत राहते तुझ्यासाठी माझ्या भावना माझी काळजी अशीच आहे . मी आहे तोपर्यंत ती अशीच राहील . अनेक कपल्सची रिलेशन सर्वसाधारणपणे जितका वेळ टिकतात तितका वेळ तर मी तुला विसरण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतका प्रयत्न केल्यावर लक्षात आल कि असा ऑप्शनच नाही माझ्याकडे . सकाळी जाग आली कि पहिली तुझी आठवण येते तुझा लास्ट सीन पाहिल्याशिवाय चैन पडत नाही . दिवसभर हाच विचार डोक्यात असतो कि या वेळी तू काय करत असशील . रात्री झोपताना तुझीच आठवण असते . जर एखाद्या दिवशी तू ऑनलाईन नसलीस तरी ठीक नाही वाटत मला . मागे तुमच्या एरिया मधे तो प्रॉब्लेम झाला होता तेव्हा न्यूज मध्ये फक्त तुमच्या एरियाच नाव येत होत . तेव्हा तर काय करू आणि काय नाही अस होऊन तुला फोनही केला पण तू नाहीस उचललास . काय सांगू तेव्हा माझी काय अवस्था झाली होती . "
" पण का आणि कशासाठी मला या मोहात परत पडायचं नाही . "
तिच्या या विचारासाठी त्याच्याकडे उत्तर नव्हत .
आता त्याचा नाइलाजच झाला होता . त्याने तिला उत्तर दिल
" तू तुझं आयुष्य जग. मी तुझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाहीये . फक्त आपल्यातल नातं असच राहू दे . "
" काय नातं आहे आपल्यात ? मी मैत्रीपर्यंत ठीक आहे आणि तुला त्याच्या पुढ जायच आहे कस राहिल नात . "
" हे बघ दोन व्यक्तीमधलं नात एखादे वेळीस परिस्थिनुसार बदलेल पण जर त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटत असेल तर ते टिकत . "
" अस परिस्थितीनुसार बदलणार नात काय कामाच ? "
" तस म्हणत नाहीये मी . कधी मित्राच्या नात्याने राहू शकतो कधी तुला किंवा मला जर काही सल्ला किंवा काही मदत लागली तर ती करू शकतो . आपण जितक एकमेकांना ओळखतो त्याचा नक्कीच काही चांगला उपयोग होईल . "
" काय चांगला उपयोग मला राग येतो कधीकधी तुझ्या मेसेजेसचा . "
" मग येऊ दे ना . ते चांगलच आहे तुझ्यासाठी . तुला लो बीपीचा त्रास होतो ना . असा कधीकधी राग येण चांगलाच आहे . रागाने बीपी वाढतो आणि त्यामुळे तुझ्या बाबतीत तो नॉर्मल राहील . तुझ्यासाठी दुःखी आणि निराश होणं चांगल नाही कारण त्याच्यामुळे बीपी कमी होऊन तुला त्रास होईल . "
" कसा आहेस रे तू ? अस काही बोलतो कि वाटत डॉक्टर सोबत बोलते आहे . "
" म्हणून म्हणतो एकच काम कर विश्वास ठेव माझ्यावर आणि माझ्या कृतीचा अर्थ नको लावूस किंवा त्यांच स्पष्टीकरण नको मागू . इतकच लक्षात ठेव मी तुझ्यासाठी जे चांगल करू शकतो तेच करेन . म्हणून माझ्या प्रेमासाठी इतकच कर, तू फक्त आनंदी रहा, हसत रहा, इतकं तर करू शकतेस ना माझ्यासाठी . "
" परत तेच परत प्रेम "
हे बघ माझ आहे तुझ्यावर प्रेम आणि ते आयुष्यभर राहिल ते मी नाही बदलू शकत . मी तुला अस नाही म्हणत कि तू माझ्या प्रेमाचा स्विकार कर , तुही माझ्यावर प्रेम कराव अस नाही . माझ म्हणन इतकच आहे कि तू फक्त तुला हव तशी रहा अॅज फ्रेंड ऑर जस तुला हव तस . पण सोबत राहा आयुष्यभर "
" बर ठीक आहे . पण एक सांग आयुष्यभर माझ्यावर प्रेमच करणार आहेस कि काही करिअरचं पाहणार आहे . "
" जॉबच म्हणशील तर अस नाही कि मी काहीच करत नाही . मी इतर लोकांसारखा नाही नॉर्मल वे ने नाही जाऊ शकत माझे माझे प्रयत्न सुरूच आहेत . आणि मी माझ्या क्षेत्रात सक्सेस मिळवेनच तू त्याची काळजी नको करू . "
" तुला अस नाही का वाटत कि तुझ्या माझ्यासाठी इतक वाटत आणि मी तुझा काहीच विचार करू नये . तू काळजी करतो आहेस माझी मग मला नाही वाटणार का तुझ चांगल व्हाव . "
" ते नक्की होईल गं . तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करते आहे ते सुरु ठेव माझी माझ्या करिअरबद्दल जी स्वप्न आहेत त्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत . बघू आपल्याला आपली नशीब कुठं घेऊन जातात पण तोपर्यंत माझ्यासाठी माझा हा वेडेपणा सहन कर ना "
त्याने तर त्याच भविष्य स्वतःची मेहनत आणि त्याच भविष्यावर सोडल . पण तुम्ही या कथेचा शेवट तसा करा जसा तुम्हाला स्वतःला वाटतो .
....

No comments:
Post a Comment