हलक फुलक
Saturday, January 2, 2021
सावित्री
Monday, August 24, 2020
कोवळीक (भाग २)
" सरे, बंड्या इचारत हुता तुझ्याबद्दल . " - राधा
" पर्वातर रव्या म्हणलीस " - सरी
" ए यडी , रव्या माझा फ्रेंड हाय त्यो काय नाय म्हनला . त्याचा एक फ्रेंड हाय बंड्या त्यो इचारत होता तुझ्याबद्दल . " - राधा
" तू आता सगळ्या पोरांबरोबर बोलतीस का ? " - सरी
" ए हुबलाक , ते माज्याशी नाय बोलत , त्यानं रव्याला सांगितलेलं आन रव्यान मला . " - राधा
" काय म्हनला ? " सरी
" तूच बघ कि बोलून काय म्हणतय ते " - राधा
" मी नसते बोलत . काय बोलला ते तूच सांग . " - सरी
राधा तशीच पुढे निघाली . ते पाहून सरीला राग आला आणि ती म्हणाली
" ए राधे , आता सांगती का " - सरी
" आज येणार हाय ते रव्या बरोबर . " - राधा
सरीच्या मनाची घालमेल होत होती . असं काही करावं असं तिला वाटत नव्हतं . कोण आहे याची मात्र तिला उत्सुकता होती . आपण त्याला भेटू नये . पण एकदा पाहावं तरी कोण आहे असं तिला वाटल . मग तिने ठरवलं आज राधा सोबत जायचं नाही . हा विचार पक्का झाल्यावर तिने पाहिलं राधा हळूहळू पुढं निघाली आहे जणू आपल्या येण्याची वाट पाहत होती . तिने सरळ दुसरा रस्ता पकडला आणि तडक घरी निघाली . आज ती एकटीच घरी आली होती . पण तो कोण आहे हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता .
' आज एकटीच आलीस ' या आईच्या प्रश्नाला ' जरा बर वाटत नव्हतं म्हणून आले ' असं तिनं सांगितलं . त्यावर आईने ' जरा पड मग बर वाटलं . 'असं सांगितल्यामुळे ती तशीच अंगावर घेऊन पडून राहिली . झोप काही येत नव्हती . ती नुसती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती . बराच वेळाने कुठे तिला झोप लागली . तिचा जरा डोळा लागला असेल तोवर आईने तिला उठवलं .
" अगं उठ कि किती वेळ झोपलीस भायर राधी आलीय . चूळ भरून घे . मी च्या टाकते . "
तिने तसेच पाण्याचे दोन-तीन हबकारे चेहऱ्यावर मारले आणि तोंड पुसत बाहेर आली . राधा स्वतःच्याच विचारात गाणं गुणगुणत बसली होती .
" तू आता आलीस व्हय ? " - सरी
" हो " - राधा
" इतका उशीर होतीस वय तिकडं ? " - सरी
" अगं यष्टी चुकली अन मग बराच वेळ पुढची गाडी नाय आली . " - राधा
" तुझं काय चाललंय कळतंय का तुला ? " - सरी
" अगं खरच गाडी चुकली . आन आपल्याकडं गाड्यांचं कस हाय ते तुला माहित आहेच कि . आन तुला इतकच वाटतय तर थांबली का नाहीस ? तुलाच कळलं असत कि काय झालं न काय नाय . "
असं म्हणून तिने तिच्या सॅकमधून काहीतरी काढून दिल . सरीन पाहिलं ग्रीटिंग होत ते .
" अगं हे काय देतीय आमच्या बापूंनी पायल तर हितच उभी चिरतील मला . "
असं म्हणत ती ते ग्रीटिंग राधाला परत करत होती . पण राधाने ते घेतलं नाही आणि येते मी म्हणत ती सटकली . इकडे सरीला ते कुठं ठेवावं ते सुचत नव्हतं . घरी आल्यावर आपण सॅक कुठं ठेवलीय तेही आठवेना . ती कावरी-बावरी होऊन इकडे तिकडे सॅक शोधत होती . शेवटी तिला ती सापडली . तिने ते ग्रीटिंग कसबस त्यात टाकलं आणि सॅक आत नेऊन ठेवली . इकडे राधा बाहेर जात होती इतक्यात सरीच्या आईनं तिला थांबवलं आणि चहा घ्यायला सांगितलं . तिने कसाबसा घोटभर चहा घेतला आणि ' येते काकी ' म्हणत बाहेर पडत होती इतक्यात सरीपण तिथे आली होती आणि ती राधाकडे रागाने पाहत होती .
" य उद्या " म्हणत राधा निघत होती आणि " येते " असं धुमसत सरी तिला सांगत होती . राधा गेली तशी सरी आई स्वयंपाक घरातच आहे याचा कानोसा घेऊन आत गेली आणि सॅक घेऊन ते ग्रीटिंग पाहू लागली . तेव्हढयात आई आत आली . आईला अचानक आत आलेलं पाहून सरी एकदम गडबडली आणि तिने ते ग्रीटिंग पटकन आत ठेवलं . या सगळ्या प्रकाराने ती पुरती भांबावली होती आणि त्याचा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पण आईच फार काही लक्ष नव्हतं . ती फक्त
" अगं च्या घी कि . ती पुस्तक नंतर बग . " एव्हढच म्हणून बाहेर गेली . सरीन ते ग्रीटिंग परत बाहेर काढलं . तेव्हढ्यात आईचा परत आवाज आला
" अगं यी की च्या गार हुईल . "
तस तिने ते ग्रीटिंग परत आत ठेवलं . इथं हे बघण्यात काही अर्थ नाही हे मात्र तिच्या लक्षात आलं होत . उद्या कॉलेजला गेल्यावरच पाहूया असा तिने विचार केला आणि ती चहा घ्यायला गेली .
आज कसा काय पण सरीला उशीर झाला होता . तिची वाट बघून राधा आणि वसुधा पुढे गेल्या होत्या . आता आपली एसटी चुकते कि काय असं सरीला वाटत होत . ती तशीच भरभर पाय उचलून निघाली होती . स्टॉपपासून ती काही अंतरावर होती तेव्हढयावर एसटी फाट्यावर येऊन थांबली . तिला पळत जावं लागलं . सगळे आत चढेपर्यंत ती तिथे पोहोचली होती . सगळ्यात शेवटी ती आत गेली . राधा वसुधा बऱ्याच मागे उभ्या होत्या आणि मध्ये सगळी मुलं उभी होती त्यामुळं तिला मागे जाणं शक्य झालं नाही त्यामुळं ती तिथेच उभी राहिली . तिला ते ग्रीटिंग पाहायचं होत . तिने हळूच मागे पाहिलं राधा वसुधा बोलण्यात मग्न होत्या . तिने हळूच सॅक उघडली आणि बाहेर न काढताच ते ग्रीटिंग पाहण्याचा प्रयत्न करू लागली . तितक्यात जोराचा ब्रेक दाबला गेला आणि सरी जवळपास पडता पडता वाचली . मागोमाग कंडक्टरचा आवाज आला
" ए पोरी नीट धरून उभी राहा कि पडशील तोंडावर . "
मग तिने सॅक बंद केली आणि आपल्या स्टॉपची वाट पाहू लागली . एकदाची बस थांबली . बसमधून उतरल्यावर तिने पहिल्यांदा राधाला गाठलं आणि कालपासून असलेला राग व्यक्त करू लागली .
" ए हुबलाक हि कशाला घेऊन आलीस गं घरी ? घरी बापूंनी बगितलं असत तर उभी चिरली असती मला . " तिला अजूनही काही बोलायचं होत पण राधा मधेच म्हणाली
" अगदी नको असल्यासारखं का करतीय ? "
तशी राधा घाबरट , कुणी रागानं बोललं तरी बोलायला चाचपडायची . पण आता काही दिवसात राधात काय बदल झाला होता काय माहित ती अगदीच बिनधास्त झाली होती . तशीच आताही सरी तिच्यावर राग काढत होती तेव्हाही तिने सरीच्या डोळ्यात डोळे घालून प्रतिप्रश्न केला होता .
तिच्या या पवित्र्याने सरी एकदम बिचकली पण स्वतःला सावरत म्हणाली
" मला नको ते काही "
तेव्हढ्यात एक बाईक येऊन शेजारी थांबली . राधाने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली . तेव्हढ्यात दुसरी एक बाईक तिथे आली . सरीन पाहिलं एक किडकिडीत उंच पोरगं होत ते , गोरा रंग , कुरळे केस आणि डोळ्याला गॉगल अशा अवतारात तिच्याकडे पाहून ते स्माईल करत होत . सरीच्या कपाळावर आठी पडली .
" बंड्या तुझं ग्रीटिंग दिल बग तिला . " राधानं पटकन माहिती पुरवली .
" थँक्स राधा " राधाचे आभार मानून त्यानं आपला मोर्चा सरीकडे वळवला
" सरे माझ्या ग्रिटिंगला एक्सेप्ट केल्याबद्दल तुला थँक्स "
त्यासरशी सरी चवताळली .
" ए मी तुझं ग्रीटिंग बघितलं पण नाय "
असं म्हणत तिने ते सॅकमधून बाहेर काढून त्याच्या हातात कोंबलं .
" आन मला असला फालतूपणा चालत नाय . परत मला भेटायचा अन बोलायचा प्रयत्न करू नको . ए चला ग जाऊ . " असं ती म्हणत होती तेव्हढ्यात राधा रवीच्या गाडीवर बसत होती . तेव्हा सरीन वसुधाचा हात पकडला
" चल गं वसुधा आपण जाऊ "
असं म्हणत जवळपास तिला ओढत तिथून काढता पाय घेतला .
मध्ये असेच काही दिवस गेले . तो मुलगा रवीसोबत दिसायचा . तिच्या आसपास पण थोडं अंतर ठेऊन तो राहत होता . त्याने परत भेटण्याचा , बोलण्याचा प्रयत्न मात्र केला नाही . राधापासून त्या दोघी थोड्या दूर राहू लागल्या होत्या . एक दिवस राधा सरीपाशी आली आणि तिला एकटीला बाजूला घेऊन समजाऊ लागली . बराच वेळ सांगूनही सरीवर काही परिणाम होत नव्हता तेव्हा ती म्हणाली
" हे बघ सरे तू पण काय अप्सरा नाहीस अगदी . काळी सावळीच आहेस . " राधा असं म्हटली तसा सरीचा पारा चढला .
" राधे ... "
ती काही बोलणार तोवर राधा परत म्हणाली .
" ऐकून घे . इथं पोरींची कमी नाही तरी त्याला तुझ्याबद्दल वाटतंय . आणि तसही तुझ्यापेक्षा उजवाच आहे तो . विचार कर . आपल्यावर प्रेम करणार , काळजी करणार माणूस भेटलच असं नाही . "
सरी विचारात पडली .
" लगेच सांगावं असं काही नाही त्याला भेट बोल . लगीच काय लवशीप करावी असं काय नाय . पटल तर फ्रेंडशिप कर . " - राधा
सरी अजून विचारातच होती .
" काय गं ? काय म्हणतेय मी ? सांगू का त्याला ? "
" नको विचार करते मी . मग सांगते . " - सरी
" बरं ठीक आहे तस कर . "
राधाने सरीकडं पाहिलं . तिच्या डोळ्यात विचारचक्र सुरु होत . टोकाच्या नकारापासून विचार करते इथपर्यंत तर गाडी आली होती आणि तिचं उत्तर काय असेल याचा राधाला अंदाज आला होता . त्यामुळं ती स्वतःशीच गालातल्या गालात हसली .
... क्रमशः
Monday, June 8, 2020
First Love (भाग २)
=============================================================
पहाटे लवकरच जाण्याची तयारी झाली होती . सगळे भेटले पण आरती काही आली नाही त्यामुळे राहुलला काही ठीक वाटत नव्हतं . त्याचे डोळे तिलाच शोधत होते . पण ते निघाले तरी ती आली नाही . राहुलला हुरहूर लागून राहिली , एकदा भेटलो असतो तिला किंवा किमान पाहिलं तरी असत . गाडी तिथून निघत होती तरीही तो ती कुठे दिसते आहे का हेच पाहत होता पण ती काही दिसलीच नाही . गावाची वेस सोडली पण त्याच्या मनातून ती काही जात नव्हती . का केलं असेल तिने असं ? तिलाही असच वाटत असेल ना . कि तिच्या मनात दुसरं काही आहे . ते घरी पोहोचले तरी त्याला अजूनही तिची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती . पुढचे कितीतरी दिवस त्याच्या मनात तेच होत .
=============================================================
रंग हे नवे नवे दुनिया हि नवी नवी .... या ओळी बहुदा हवेत तरंगत होत्या . त्याच्या शाळेतच १२वी पर्यंत वर्ग होते त्यामुळे त्याच शिक्षण तिथंच झालं होत . आणि त्याच्या शाळेने ११वी १२वीची शाळाच केली होती . त्यामुळे आजपर्यंत त्यानी कॉलेज लाईफ अशी अनुभवली नव्हती . त्यामुळे इथे आल्यापासून त्याला हवेत तरंगत असल्यासारखं वाटू लागलं होत . आपण इतके दिवस इथेच राहत होतो कि कोण्या नवीन ग्रहावर आलो आहे असं वाटायचं त्याला . वेगळीच दुनिया होती हि . आतापर्यंत युनिफॉर्ममध्ये वावरलेल्या त्याला हे रंगीबेरंगी जग हवंहवंसं वाटू लागलं होत . सगळे नवे मित्र आणि मैत्रिणी ... नाही त्या नव्हत्या अजून कोणी पण आसपास ज्या मुली दिसत होत्या त्या पाहून वाटू लागलं होत कि खरंच इतक्या सुंदर असतात का मुली ? कि आजपर्यंत आपणच नाही पाहिलं ? काय माहित पण खरंच किती सुंदर आहेत . एखादी अप्सरा किंवा कुणी परी जमिनीवर उतरून आली आहे असंच वाटू लागलं होत त्याला . त्यांना किती पाहू आणि किती नको असं व्हायचं त्याला . दिवस अगदी अत्तर उडून जावं तसे भुर्रकन निघून जात होते आणि त्याला हे समजतही नव्हतं .
" ए हॅलो " त्याने मागे वळून पाहिलं . समोर ती उभी होती . कोण होती ती ? हिला आधी तर कधी पाहिलं नाही . हा विचार तो करत होता तोपर्यंत ती परत बोलली
" ऐकलं नाही का मी काही बोलतेय . "
" हो ऐकतोय ना . " एव्हढं बोलून तो तिच्याकडे पाहतच राहिला . त्यावर तीच बोलली
" इथं ऑफिस कुठं आहे ? "
तो तसाच भान हरपून तिच्याकडे पहात होता .
" लक्ष कुठं आहे तुझं ? "
तिनं असं म्हटल्यावर तो भानावर आला
" काय काय म्हणत होती तू . "
" राहू दे माझं मी शोधते ऑफिस . " असं म्हणून ती जाऊ लागली . तेव्हा तो पटकन पुढे झाला आणि म्हणाला " अच्छा तुला ऑफिस मध्ये जायचं आहे , अशी सरळ जा पुढे लेफ्ट घे तिथून थर्ड लेफ्ट आणि मग पुढे जे सर्कल आहे तिथून डाव्या बाजूचा तिसरा रस्ता तिकडेच आहे . "
ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती . आणि तो स्माईल करत तिच्याकडे पाहत होता .
" प्लिज माझ्यासोबत येशील का ? मला जरा अर्जंटली तिथं जायचं आहे . काम आहे माझं . "
" ठीक आहे मी येतो तुझ्या सोबत . "
ते दोघे निघाले . ती म्हणाली
" बरं झालं तू भेटलास नाहीतर मला किती वेळ लागला असता काय माहीत . "
" अगं काही नाही तसही मला तिकडे जायचं होतंच . "
" तुझं काय काम होत तिकडे . "
" माझं.. माझं ते हे . मला लायब्ररीत जायचं होत . "
" आता आता कॉलेज सुरु झालं आणि तू लायब्ररी अँड ऑल दॅट . स्टुडिअस आहेस वाटत . नाहीतर आम्ही जेव्हा एक्झाम असेल तेव्हाच तिकडे जातो . "
" ओह , हे बघ हे आलं ऑफिस . मी आहे लायब्ररीत . "
" ओके थँक्स "
तो काही वेळ लायब्ररीत जाऊन आला . माघारी येताना त्याला कुणाचा तरी ओरडल्यासारखा , भांडल्यासारखा आवाज येत होता . काय आहे हे पाहावं म्हणून तो तिकडे गेला तर तिकडे ती मघाची मुलगी भांडत होते .
" हा काय प्रकार आहे मी इतकी लांबून आले आणि तुम्ही म्हणत आहेत वेळ संपली . "
" अहो फी भरावी लागेल ना आणि कॅशचा टाइम संपला ना आता . "
" मग बाकीची प्रोसिजर तर पूर्ण करून घ्या . "
" अहो फी भरल्याशिवाय कशी होईल बाकीची प्रोसिजर . "
" काय हरकत आहे मी फी भरणारच आहे ना . "
त्यांचं बराच वेळ चाललं होत . मग ती तावातावान बाहेर पडली . तो समोरच उभा होता . त्याला पाहून ती म्हणाली
" हि काय पद्धत झाली का ? मी पैसे भरायला तयार आहे . पण त्यांना ते घ्यायचे नाहीत आणि त्यामूळ पुढची प्रोसिजरही करायची नाही . "
" अगं पण होईल ना नंतर . "
" अरे पण का नंतर ? आता का नाही ? का आपलं हेच करत बसायचं . "
" अगं पण तू क्लास अटेंड करू शकतेस ना . हे नंतरही करता येईल . "
" हो पण यासाठी परत यावंच लागेल ना . आणि एव्हढ्याशा वेळाच काय असत ? घेता आले असते ना पैसे . "
" कॅश टाईम ३ ला संपते आणि आता ४.३० वाजलेत . "
" एक मिनिट एक मिनिट तू कुणाकडून आहेस ? माझ्याबाजूने कि त्यांच्या बाजूने "
" तस नाही पण तू इतकं का टेन्शन घेते आहेस एव्हढीशी तर गोष्ट आहे . "
" कस आहे ना मी जे काम करायला सुरुवात करते ना ते पूर्ण करतेच असं हरणं किंवा काम अर्ध्यात सोडणं मला आवडत नाही . "
" चांगलं आहे . "
" अर्थात आहेच "
तेव्हढ्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं .
" एक मिनिट एक मिनिट इथंच आपण मघाशी भेटलो होतो ना ? "
" हो "
" आणि आपण तर तिथून फक्त हि एक बिल्डिंग पार केली आणि इथे आलो . पण जाताना तर इतकं फिरून आलो . "
" कस आहे एक तर या बिल्डिंगमधून फिरून फिरून जावं लागत आणि तू नवीन आहेस त्यामुळं तुला ते समजणार नाही आणि दुसरं असं कि बाकीच्या फॅकल्टीच्या स्टुडन्ट्सना इथून जायची परमिशन नाही . फाईन वगैरे करतात . आम्ही जातो कधीकधी पण ते लपून आणि तुझ्यासोबत बोलता बोलता माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे इकडून आलो . "
तिने त्याच्याकडे ऍटिट्यूड मध्ये एक लूक दिला आणि म्हणाली
" बाय द वे तुझं नाव काय आहे ? "
" मी राहुल "
" लूक राहुल माझं नाव मेघना आहे आणि मी रुल्स किंवा इतर काहीही मोडू शकते . जिथं मी जाते तिथं माझे रुल्स आणि फक्त माझ्या कंडीशनच चालतात . मी मी आहे ....
... क्रमशः
Friday, June 5, 2020
अनुराधा (भाग ६)
अंजली सांगत होती अगं काही नाही गं कोण एक मूर्ख बाइकवाला आला आणि पाठीमागून डॅश दिली . मी सावध नव्हते त्यामुळे पडले . हात फ्रॅक्चर झालाय बाकी काही नाही . '
' अगं फक्त हातच फ्रॅक्चर झालाय तर मग इथं का ठेवलंय . घरी का जाऊ नाही दिल . ' पूजाने सगळ्यांच्या मनातला प्रश्न तिला विचारला .
यावर अंजली म्हणाली " अगं डोक्यालापण दुखापत झाली आहे ना . ते अंडर ऑबझर्वेशन साठी म्हटले ते आज थांबा . उद्या जाता येईल . "
" म्हणजे तू डोक्यावर पडलीयस " राधानं अचानक असं विचारलं आणि सगळ्या हसू लागल्या .
नर्सने येऊन जवळपास त्यांना हाकलेपर्यंत त्या तिथेच होत्या . अंजलीही खूप रिलॅक्स झाली होती आता . तेव्हा त्या तिचा निरोप घेत निघाल्या . सगळ्या किती अवली आहेत असा विचार बसमधून येताना अनुच्या मनात होता .
मध्ये काही दिवस असेच गेले अंजलीने काही दिवस सुट्टीच घेतली होती . अनुराधाही जरा जास्त काम असल्यामुळे तिची कामाची वेळ थोडी बदलली होती . सकाळी थोडं लवकर जावं लागत होत आणि संध्याकाळी नेहमीपेक्षा उशीर होत होता . यामुळे हे काही दिवस तिची समीरसोबत भेट झाली नव्हती . कामामुळे तिला ते लक्षातही आलं नव्हतं . जवळपास ती त्याला विसरून गेली होती .
आणि अचानक ती बातमी आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली . अंजली गेली होती या जगातून अगदी कायमची . इतकंस लागलेलं तिला त्या दिवशी आपण किती हसलो बोललो आणि आज अचानक असं काय झालं ? तिच्या मनात खूप असूनही तिला जाता आलं नाही अंजलीच्या घरी . त्यामुळं तिला खूप वाईट वाटत होत . काही दिवसांनी तिच्या आईला भेटायचं मात्र तिने मनात ठरवलं होत . या विचारात ती निघाली होती एव्हढ्यात तिला मागून कुणीतरी हाक दिली पण तिचं लक्ष नव्हतं आणि ती तशीच पुढे गेली . तेव्हढ्यात एक बाईक अचानक तिच्या समोर येऊन थांबली . तिने दचकून पाहिलं . समीर होता . तिने रागाने विचारलं
" काय चाललंय तुझं ? "
" अगं काय ? काय झालंय ? लक्ष कुठं आहे तुझं ? मघापासून तुला हाक मारतोय आणि तू पुढेच निघाली आहेस . आणि म्हणून असा समोर आलो तर तू किती भडकते आहेस ? "
" तुला काही कळत का ? मी विचारात होते , माझं लक्षही नव्हतं म्हणून नसेल ऐकू मला . पण म्हणून काय अशी एकदम गाडी अंगावर घालायची का ? "
" अगं रिलॅक्स . मी अंतरावर होतो तुझ्यापासून आणि फक्त समोर गाडी आणली इतकंच . "
" म्हणजे असं वागून तुला त्याच काही वाटतच नाही ना . ठीक आहे तू हो बाजूला मला जाऊ दे "
" अगं एव्हढी चिडतेस का ? शांत हो . "
पण ती आज ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती . ती त्याला तसच ठेऊन निघाली . त्याने क्षणभर विचार केला तिला विचारावं काय झालय , मग त्याने विचार केला आता तिचा मूड खराब आहे . आणि असं परत परत तिच्या समोर जाणं ठीक दिसणार नाही . म्हणून तो तसाच निघून गेला . तिने तो आहे कि गेलाय हे पाहण्याचीही तसदी घेतली नाही आणि ती तडक तशीच निघून गेली .
.... क्रमशः
Monday, May 18, 2020
First Love ( भाग १ )
किती इच्छा होती इथं येण्याची आणि आज ती इच्छा पूर्ण होते आहे . ते शिवार , ती नदी , ती साधी भोळी माणसं आणि .... आणि आरती . काय वेळ होती ती . कधी एक क्षण गेला नाही तिच्याशिवाय . नेहमी तिच्याच सोबत असायचो . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या असण्याशिवाय आपलं पानही हलायचा नाही आणि मध्ये किती दिवस , किती वर्ष अशीच गेली .... तिला न भेटता , तिच्याशी न बोलता , तिला न पाहता . इतके दिवस तर निघून गेले पण आता जेव्हा मी गावापाशी आलो आहे आणि मला माहित आहे ती आता भेटणार आहे . आणि यासाठी काहीच क्षण बाकी आहेत . पण हे क्षणच खूप मोठे वाटू लागले आहेत . आता मात्र धीर धरवत नाही . तिला भेटायला आतुर झालोय .
एकदाच गाव आलं आणि मग इतक्या वर्षांपूर्वी पाहिलेले ओळखीचे , थोडे अनोळखी चेहरे , काहींची ओळख लागत होती तर काही नव्हते आठवत . तिचं घर जस जस जवळ येऊ लागलं तसं काळीज धडधडत होत . तिचे आई बाबा भेटले . मुश्किल वाटलं त्यांना ओळखणं पण शेवटी ओळख लागली . काका शेतावर निघाले होते त्यामुळे ते लगेच गेले . काकुंसोबत गप्पा मारत होतो आणि अचानक कुणीतरी पाठीत जोरदार धपाटा घातला . वळून पाहतो तो समोर आरती .
=========================================================
" हं इकडे कुठे वाट चुकला ? "
ते डोळे , ती बोलण्याची पद्धत ती अजूनही तशीच होती जशी आठवत होती . तिनेही त्याला क्षणात ओळखलं होत . तिला पाहून तर त्याला आनंद झाला होता पण पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे रागही आला होता म्हणून तो म्हणाला
" तू आहेस होय अजून , मला तर लक्षातच नाही आलं कि तू असशील . "
" का तुला काय वाटलं गेले मी ? "
काकूंना समजलं आता यांच्या मध्ये पडण्यात काही अर्थ नाही . म्हणून त्या म्हणाल्या
" तुमचं चालू द्या निवांत मला स्वयंपाक करायचा आहे मी जाते . "
आणि त्या तिथून निघाल्या .
" बघ तुझ्यामुळे काकू गेल्या . " राहुल तिला चिडवत म्हणाला .
" माझ्यामुळे नाही काही ती तुझ्यामुळे गेली . तुलाच लागत ना सारखं भांडायला . " आरतीही काही कमी नव्हती ती फणकाऱ्याने म्हणाली .
" बघा कोण बोलतय ? जिचं जेवण भांडल्याशिवाय पचत नाही ती सांगतेय . " तो तिला तोंड वेडावून म्हणाला .
" गप चिडकू . आठवतंय ना तुला सगळे चिडकू म्हणायचे . " तीही काही कमी नव्हती ती त्याला तोडीस तोड उत्तर देत होती .
" आणि तुला काय म्हणायचे ते आठवतंय ना " आता मात्र तीच बोलणं त्याला लागलं होत आणि तो आपलं महत्वाचं अस्त्र वापरू इच्छित होता .
तिने दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि ती त्याच्याकडे ऍटिट्यूडमध्ये पाहू लागली .
" काय आता नवीन नाव का रखुमाई ? " त्यानं विचारलं .
" हे नाव आवडेल मला . " तिला खरंच ते नाव आवडलं होत .
" आणि ते नावं " तो परत त्या अस्त्राचा वापर करण्याच्या विचारात होता .
ती परत त्याच ऍटिट्यूडमधे त्याच्याकडे पाहत होती त्यामुळे त्याच धाडस झालं नाही तिला त्या नावाने हाक मारायला . त्याने तिला तशी हाक नाही मारली तरी तिला त्याचा राग आला होता . ती निघून जाऊ लागली . तेव्हा तो तिला म्हणाला
" अगं कुठं निघालीस ? "
" काम आहे मला . " असं म्हणत ती घुश्यातच निघाली .
" अगं मी इतक्या दुरून आलो आणि तू निघालीस . " ती निघाली तसा मात्र त्याचा धीर सुटला .
" आलास ते काही मला भेटायला थोडीच आला आहेस . " ती पुढे जात म्हणाली .
" अगं थांब ना . " तो तिला थांबवत होता पण ती गेलीच .
=============================================================
जेवण वगैरे झालं आणि तो जरा फिरायला म्हणून बाहेर पडला . जातानाच आरती भेटली . दोघंही निवांत गप्पा मारत निघाले . दोघांची लहानपणीची एक गोष्ट मात्र तशीच राहिली होती ती म्हणजे कितीही भांडण झाली किंवा काहीही बोलणं झालं तरी त्यांना काही फरक पडायचा नाही . ते पुढच्यावेळी भेटायचे ते अगदी सहज पाठीमागच काही लक्षात न ठेवता . खूप जुन्या आठवणी निघत होत्या दोघेही त्या भूतकाळात रमले होते .
" पण एक सांग तू कस ओळखलस मला ? " आरतीने मधेच त्याला प्रश्न केला .
" त्यात काय तशीच तर आहेस " राहुलनेपण सहजपणे सांगितलं .
" तशीच आहे का मी ? " - आरती
" हो " - राहुल
" छे सगळे म्हणतात किती बदल झाला आहे . " - आरती
" हो बदल तर झाला आहे " - राहुल
" आता म्हणत होता काही बदल नाही आणि आता म्हणतोय बदल झालाय . उगाच आपलं हो मध्ये हो मिळवायचं . " - आरती
"तस नाही ग काही गोष्टी तशाच आहेत आणि काही बदलल्या आहेत . " - राहुल
" हो का मग सांग काय तसंच आहे " - आरती
" तुझे डोळे तसेच नितळ निरागस , तुझी बोलण्याची पद्धत , एव्हढं अधिकारानं कोणी बोलत नाही तुझ्याशिवाय माझ्याशी . आणि ते आवडत मला . " - राहुल
तिला थोडं लाजल्यासारखं वाटत होत तरी तिने त्याला विचारलं .
" आणि बदल काय झाला आहे ? " - आरती
" आता किती सुंदर झाली आहेस " तो तिच्या डोळ्यात डोकावून म्हणाला .
ती लाजली पण ते न दाखवता लटक्या रागाने म्हणाली
" का तेव्हा नव्हते का ? " - आरती
" होतीस ना पण इतकी नाही . " - राहुल
आता मात्र ती लाजली.
" चल तुझं आपलं काहीतरीच . " - आरती
" अगं खरंच आणि हे लाजायला कधीपासून लागलीस . आधी तर नव्हती अशी " - राहुल
" आता किती तरी गोष्टी बदलल्या आहेत पण तुला लक्षात कुठं येत आहेत ? " - आरती
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं . ती नजर चोरून दुसरीकडे पाहू लागली .
" हं खरंच गं माझ्या लक्षातच नाही आलं . " - राहुल
तिला ते सगळं छान वाटत होत पण क्षणात तिला परिस्थितीच भान आलं . तो किती दिवस दूर आहे . तिकडे शहरात किती मॉडर्न लाईफ आणि आपण कुठे . म्हणून ती म्हणाली
" तिकडच्या आयुष्यातून तुला कुठे वेळ मिळणार आहे ? "
" इतक्या सुंदर लोकांसाठी नक्कीच मिळेल कि . " - राहुल
" का ? तिकडे असतील ना पऱ्या " - आरती
हे बोलून ती काहीशी फुरंगटून बसली होती . मग त्याला समजलं आणि तो तिला म्हणाला
" कशाला हवी अगदी परी, पण असावी जरा बरी . आणि तू आहेस ना बरी . "
" मी बरी काय . आता जरी तयार होऊन बाहेर पडले तरी किती मुलांची नजर नाही ढळणार " - आरती
त्याने पटकन तिचा दंड पकडला आणि म्हणाला
" कशाला हवं कोणी ? तू फक्त माझी आहेस . "
तो असं बोलल्यावर ती एकदम बावरली . काय करावं तिला कळेना . पण तशीच स्वतःला सावरत म्हणाली
" आणि हे कधी ठरवलस " - आरती
" मी एकट्याने थोडीच हे ठरवलंय तुलाही हेच वाटत ना . " - राहुल
तिला काय बोलावं हे समजत नव्हतं . किती वेळ ती खालीच पाहत होती . मग तिला कसलीशी आठवण झाली आणि ती म्हणाली
" खोटं सगळं खोटं . असच होत तर मग इतक्या वर्षात तुला माझी आठवण तरी आली का ? "
" तुला सांगू इतके वर्ष तू सोबत नव्हतीस तर ठीक नव्हतं वाटत . सारखी तुझी आठवण येत होती कधी तुला भेटेन असं झालं होत . " - राहुल
" हो का , म्हणून आल्या आल्या माझ्याशी भांडलास का ? " - आरती
" तू पाठीत मारलस म्हणून राग आलेला म्हणून बोललो . पण म्हणून प्रेम नाही कमी झालं . " - राहुल
हे ऐकून मात्र ती लाजून चूर झाली .
" काय ग किती लाजतेय . " - राहुल
ती मान खाली घालून तशीच उभी होती . त्याने हळूच तिची हनुवटी वर केली आणि तिला म्हणाला
" वर बघ ना "
पण ती काही केल्या वर बघत नव्हती
" बघ ना मला तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे " - राहुल
तिने नजर वर केली
" हाये मार डाला " - राहुल
तिने लाजून परत मान वळवली . त्याने तिची मान परत वर करण्याचा प्रयत्न केला तशी ती त्याला धक्का देऊन तिथून सटकली .
" अग थांब तरी " पण ती काही थांबली नाही .
=============================================================
" का गं मघाशी का गेलीस ? " - राहुल
" का गेलीस काय ? काय चाललं होत तुझं . एक तर इतके वर्षांनी आलास आणि आता एकदम हे असं ... " असं म्हणत बोलता बोलता ती थबकली . त्याला जाणवलं तिला थोडं अवघडल्यासारखं होत आहे . तेव्हा तिला थोडं नॉर्मल करण्यासाठी तो म्हणाला
" तुला आठवतंय किती भांडायचो आपण एकमेकांसोबत . "
" मग भांडू का आता तुझ्याशी ? " - आरती
" बघ म्हटलं ना तूच भांडखोर आहेस . " - राहुल
" कोण म्हटलं कि आपण किती भांडायचो ? " - आरती
" अग तेव्हा भांडायचो असं म्हटलो मी . आता भांडूया असं नाही . " - राहुल
" का तुला कंटाळा आला का भांडायचा ? कि घाबरलास मला ? " - आरती
" तस नाही खूप भांडलो कि आता थोडं प्रेम करूया म्हटलं . " - राहुल
ते ऐकून ती थोडी लाजली पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाली
तू कधीपर्यंत आहेस इथे ? "
" आज आहे . उद्या पहाटे परत निघणार . " - राहुल
ती खट्टू झाली आणि म्हणाली
" आणि मग परत कसा भेटणार मला ? "
" अगं भेटू ना आपण असं का म्हणतेस ? " - राहुल
" तेच म्हणतेय कधी ? हे बघ तुझं जग फार वेगळं आहे . इथून गेलास कि परत कधी येशील कधी नाही काही माहित नाही मग हे कशाला ? " - आरती
तो थोडा भावूक झाला आणि म्हणाला
" असं का म्हणते आहेस तुझं नाही का प्रेम माझ्यावर ? "
" असं नाही रे पण या प्रेमाला पुढं काय भविष्य असेल म्हणून म्हणतेय या वाटेवर नको जायला . " - आरती
" हे बघ खरंच जर प्रेम असेल तर रस्ता सापडतो त्याला . " - राहुल
ती काहीच नाही बोलली . मग त्याने परत तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलायला तयार नव्हती . त्याने खूप आर्जव करूनही ती तयार झाली नाही . आणि शेवटी म्हणाली
" जे अशक्य आहे त्या रस्त्यावर नको चालायला . "
एव्हढं बोलून ती निघाली .
त्याने तिला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली
" आता जा तू . आपली मैत्री तेव्हढी लक्षात राहू दे . "
... क्रमशः
Tuesday, May 12, 2020
मित्र प्रेम
Thursday, April 23, 2020
अनुराधा (भाग ४)
" अरे घरी चल ना . तुला कालच बोलणार होते पण राहिलंच बघ . "
तो जरा अवघडतंच म्हणाला
" अग राहू दे ग . एव्हढं काय . येईन परत . एव्हढं काही नाही . "
" मला ठीक नाही वाटणार . तू ये प्लिज . " तिला त्याच न येणं पटत नव्हतं म्हणून ती त्याला आग्रह करत म्हणाली .
आता त्याचा नाईलाज झाला होता . तो यायला तयार झाला . ते दोघे तिच्या घरी पोहोचले . तिने लॉक उघडून ते आत गेले .
" तू बस मी चहा करते . " म्हणत ती चहा करायला आत गेली .
" अग नको उगाच काही करू नको . "
" अरे झालच बघ . "
म्हणत तिने पटकन पाणी ठेवलं .
" तू एकटीच असतेस ? "
" अरे नाही भाऊ-भावजय आहेत सोबत ते दोघ उशिराच येतात . "
तो एकटाच अवघडल्यासारखा बसून इकडे तिकडे बघत होता . तेव्हढ्यात ती चहा घेऊन आली .
" अरे एव्हढ्यात आलीस . "
" हो रोजच रुटीन आहे आले कि चहा लागतोच मला . मग आधी चहा घेते मग बाकीचं उरकते . सो झाला पटकन . "
" मग भाऊ येईपर्यंत निवांत असशील . "
" हो थोडीफार . बर एक सांग तुझ्या घरी कोण-कोण असत ? "
" आई, बाबा आणि मी "
" भाऊ-बहीण नाही का ? "
" बहीण आहे . तिचं लग्न झालं आहे . "
" आणि तुझं ? "
" काय ? "
" लग्न ? "
" नाही . नाही केलं . "
" का ? "
" आता काय सांगू आधी परिस्थिती चांगली नव्हती . त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली . मग थोडा जम बसला . तेव्हा बहिणीचं लग्न झालं . "
" आणि स्वतःच्या लग्नाचा विचार नाही केलास . "
" म्हणजे अगदी तसच नाही . आता तुझ्याशी जितकं बोलतो आहे तितकं नाही बोलत कोणाशी . का कोणास ठाऊक एक मोकळेपणा वाटतो तुझ्याशी बोलताना म्हणून तुला सांगतो . तसा रिलेशनशिपमध्ये होतो पण माझी परिस्थिती यामुळं तिच्या घरच्यांचा विरोध होता . तरीही आम्ही सोबत होतो . पण पुढे पुढे तिही दूर होत गेली . तसा मलाच उशीर झाला सेटल व्हायला . तोपर्यंत ती फार दूर गेली . लग्न झालं तिचं . आता सात वर्ष झाली तिचं लग्न होऊन . त्यानंतर मेहनत घेत गेलो . शक्य तितका सेटल झालो . पण त्यानंतर आतापर्यंत परत कधी विचार केला नाही लग्नाचा . "
त्याचा मूड थोडा खराब झाला होता .
तिला वाटलं उगाच त्याला हे विचारलं .
" आय एम सॉरी . मी उगाच तुला त्या आठवणी परत करून दिल्या . "
" इट्स ओके . बर चल निघतो आता माझी बाईक माझी वाट पाहत असेल माझी . "
" हो का ? "
" हो तर आणि सोबत त्या दोन हेल्मेटची सुद्धा काळजी आहेच ना . "
" कुणाला कशाची तर कुणाला कशाची . तरी त्याला वायर लॉक नि व्यवस्थित गाडीला लागलं आहे कि नाही हे चेक करून निघालास ना . "
" तू पाहिलंस . "
" हो तीनदा ओढून चेक केलस लॉक लागलं आहे कि नाही . "
" हो म्हणजे काय खात्री नको करायला . "
" हो पण इतकी ? "
" असू दे गं . बर थँक्स फॉर चहा . अगदी मस्त झाला होता . आणि आता निघतो मी . उद्या भेटू स्टॉपवर . "
" हो चल बाय . "
" बाय "
असं म्हणत तो गेला .
काय मी पण नाही नको तर म्हणायचं लगेच तयार झाले . पण काय हरकत आहे ? असच का म्हणून जायचं बसनं . कस वाटत ते उगाच यंत्रवत वागल्यासारखं . माणूस असल्यासारखं वाटत का तरी उगा उठायचं आवरून स्टॉपवर जायचं . त्यात बसमध्ये हि गर्दी . लटकून जायचं धड उभही राहता येत नाही . कुणाशी काही न बोलता . का कशासाठी मीही माणूसच आहे ना . मलाही वाटत कि बोलावं हसावं मोकळेपणाने . मग का नको . त्याच्यासोबत जाते तर किती दिवसातून बोलते आहे मोकळेपणाने . किती मोकळं मोकळं वाटतंय . मनावरचं दडपण दूर झाल्यासारखं वाटतंय . किती दडपणाखाली होते आणि हे कधी लक्षातही नाही आलं . पण आज ते जाणवतंय . हो नक्कीच मलाही हक्क आहे मोकळेपणाने श्वास घेण्याचा . हो उगाचच नाही नको म्हणायला . जाऊया त्याच्या सोबत . तेव्हढीच या आयुष्यात सुखाची झुळूक वाहते .
सकाळी लवकर उठून तिने पटकन स्वतःच आवरून घेतलं आणि स्टॉपवर जाऊन उभी राहिली . अगदी नेहमीपेक्षा लवकरच आलेली ती . बराच वेळ तो काही आला नाही . तो येईल कि नाही याचा विचार करत होती एव्हढ्यात तो आला .
" अगं सॉरी सॉरी आज थोडा उशीरच झाला . तुला फार थांबाव लागलं असेल ना . "
" छे , हे काय आताच येऊन उभी राहिली आहे . "
का कोणास ठाऊक तिला वाटलं शेजारची बाई तिच्याकडे पाहते आहे . तिने तिकडे पहिले तर ती खरंच तिच्याकडेच पाहत होती . अरे हि तर मी आल्यापासून इथे उभी आहे आणि मी तर म्हटलं मी आताच आले या विचारसरशी तिने पटकन नजर वळवली आणि ती गाडीवर बसली . बसता बसता तिला स्वतःचच हसू आलं . काय आपण कशा वागतोय . पण लगेच मनात आलं असू दे ना त्याला काय होतंय . मी का काही विडा उचललाय का आयष्यभर सिरीयस वागण्याचा नि सिरीयस राहण्याचा . मनात का कोण जाणे त्या ओळी रुंजी घालत होत्या ...
' आज फिर जिनेकी तमन्ना है आज फिर मरनेका इरादा है .... '
... क्रमशः