दिवस असेच सुरु होते . त्या दोघांच भेटण अगदी नेहमी नाही व्हायच . पण जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हढा वेळ ते मनसोक्त एन्जॉय करायचे . त्याला आता कामातून वेळ काढून तिला भेटायची फार इच्छा व्हायची . पण तिला ते नेहमीच नाही जमायच. पण जेव्हाही जमेल तेव्हा मात्र त्यांचं भेटणं होत होत. त्याच कामात दुर्लक्ष होतय हे त्याला जाणवल . पण त्याला ते कंट्रोल करता येत नव्हतं. अगदी मोजक्याच भेटी गाठी झाल्या होत्या त्यांच्या पण ते एकमेकांना अगदी कॉम्प्लिमेंट करायचे . आता तर असं व्हायच एखादी गोष्ट बोलायच्या आधी ती दुसऱ्याला समजायची. त्याला तिच्याबद्दल वाटणारी ओढ हळूहळू वाढतच चालली होती. ती गोड अनुभूती त्याला सुखावत होती.
जे आपल्याला वाटतंय ते तिलाही आपल्याबद्दल वाटत असेल का ? याच विचाराने त्याला अस्वस्थ केलं होत . गेले कित्येक दिवस तो याच विचारत होता. तिला हे विचारण्याचा प्रयत्नही करत होता. पण ती जेव्हा समोर यायची तेव्हा तो तिच्यातच हरवून जात होता आणि तिला हे विचारायचं धाडसच व्हायचं नाही त्याच .
पण आज त्याने मनाशी ठरवल होत समोर बोलता येत नाही तर आज फोनवर बोलून या गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या. त्याने तिला फोन लावला.
" हाय, कसा आहेस ? "
त्याने काही बोलायच्या आधीच तिची गनमशीन सुरु झाली होती.
" मी ठीक आहे. तू कशी आहेस ? "
" मस्त "
" अग मला तुला काही सांगायच आहे . "
" मलाही तुला काही सांगायच आहे. "
" ऐक ना "
" नाही आधी तू ऐक मी काय सांगतेय ते. "
" अग पण "
" अग नाही आणि काही नाही "
" बर बोल . " ती आपल्याला बोलूच देणार नाही याची त्याला खात्री झाली होती.
" अरे माझं लग्न ठरलय "
क्षणभर त्याला आपण काय ऐकतोय हेच समजत नव्हतं . ती मात्र बोलतच होती.
" अरे म्हणजे आज नाही काही तीन महिने झाले आहेत "
त्याला काय बोलाव हेच समजेना . पण काहीतरी विचारायच म्हणून त्याने विचारल
" काय करतो मुलगा ?" बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं काय बोलतोय तो ? मुलगा वगैरे काय ? कुणी नातेवाईक करतात तशी काय चौकशी करतोय आपण . हा विचार तो करतच होता तोपर्यंत तिने रिप्लाय केला
" अरे तो माझ्याच कंपनीमधे आहे. "
आता मात्र तो सावध झाला .
" काय म्हणालीस. पण माग तर तू म्हणालीस कि इथं तुझं कोणी ओळखीचं नाही. "
" अरे ती पण एक गम्मतच आहे. "
" गम्मत ? काय गम्मत ?"
" अरे त्यानेच मला सांगितल होत कि कुणापुढेही नाही सांगायच आपल्या रिलेशन बद्दल "
" आणि असं का ?"
" उगाच कशाला कुणाची नजर लागायला "
" बर "
" पण कस आहे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून तुझ्याकडे मन मोकळ करते आहे. "
" बेस्ट फ्रेंड आहे ? आणि आता सांगते आहेस ? "
" अं ... " तिला काय बोलाव सुचत नव्हत . त्यानच तिला पुढे विचारलं
" अच्छा . बर किमान नाव तरी सांग त्याच . "
" सुधीर "
त्यानंतर मात्र त्याला तीच बोलणं काही ऐकूच येत नव्हत
तो विचार करत होता .