Monday, June 8, 2020

First Love (भाग २)

राहुल खूप वर्षांनी आपल्या गावी निघाला होता . तिथल्या अनेक आठवणी त्याच्या मनात रुंजी घालत होत्या पण त्याला सर्वात जास्त ओढ लागली होती ती त्याची बालमैत्रीण आरतीला भेटण्याची . तिथे दोघांची भेट होते आणि जणू काही मधला काळ गायबच होऊन जातो आणि त्यांचं ते पूर्वीच रुसणार भांडणार नातं तसच समोर येत पण आरतीला जाणवत की मध्ये खूप वेळ गेला आहे . आता सर्व गोष्टी तशाच असतील असं नाही आणि ती राहुलपासून अंतर ठेऊ पहाटे . 
=============================================================
पहाटे लवकरच जाण्याची तयारी झाली होती . सगळे भेटले पण आरती काही आली नाही त्यामुळे राहुलला काही ठीक वाटत नव्हतं . त्याचे डोळे तिलाच शोधत होते . पण ते निघाले तरी ती आली नाही . राहुलला हुरहूर लागून राहिली , एकदा भेटलो असतो तिला किंवा किमान पाहिलं तरी असत . गाडी तिथून निघत होती तरीही तो ती कुठे दिसते आहे का हेच पाहत होता पण ती काही दिसलीच नाही . गावाची वेस सोडली पण त्याच्या मनातून ती काही जात नव्हती . का केलं असेल तिने असं ? तिलाही असच वाटत असेल ना . कि तिच्या मनात दुसरं काही आहे . ते घरी पोहोचले तरी त्याला अजूनही तिची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती . पुढचे कितीतरी दिवस त्याच्या मनात तेच होत .
=============================================================
रंग हे नवे नवे दुनिया हि नवी नवी .... या ओळी बहुदा हवेत तरंगत होत्या . त्याच्या शाळेतच १२वी पर्यंत वर्ग होते त्यामुळे त्याच शिक्षण तिथंच झालं होत . आणि त्याच्या शाळेने ११वी १२वीची शाळाच केली होती . त्यामुळे आजपर्यंत त्यानी कॉलेज लाईफ अशी अनुभवली नव्हती . त्यामुळे इथे आल्यापासून त्याला हवेत तरंगत असल्यासारखं वाटू लागलं होत . आपण इतके दिवस इथेच राहत होतो कि कोण्या नवीन ग्रहावर आलो आहे असं वाटायचं त्याला . वेगळीच दुनिया होती हि . आतापर्यंत युनिफॉर्ममध्ये वावरलेल्या त्याला हे रंगीबेरंगी जग हवंहवंसं वाटू लागलं होत . सगळे नवे मित्र आणि मैत्रिणी ... नाही त्या नव्हत्या अजून कोणी पण आसपास ज्या मुली दिसत होत्या त्या पाहून वाटू लागलं होत कि खरंच इतक्या सुंदर असतात का मुली ? कि आजपर्यंत आपणच नाही पाहिलं ? काय माहित पण खरंच किती सुंदर आहेत . एखादी अप्सरा किंवा कुणी परी जमिनीवर उतरून आली आहे असंच वाटू लागलं होत त्याला . त्यांना किती पाहू आणि किती नको असं व्हायचं त्याला . दिवस अगदी अत्तर उडून जावं तसे भुर्रकन निघून जात होते आणि त्याला हे समजतही नव्हतं .

" ए हॅलो " त्याने मागे वळून पाहिलं . समोर ती उभी होती . कोण होती ती ? हिला आधी तर कधी पाहिलं नाही . हा विचार तो करत होता तोपर्यंत ती परत बोलली
" ऐकलं नाही का मी काही बोलतेय . "
" हो ऐकतोय ना . " एव्हढं बोलून तो तिच्याकडे पाहतच राहिला . त्यावर तीच बोलली
" इथं ऑफिस कुठं आहे ? "
तो तसाच भान हरपून तिच्याकडे पहात होता .
" लक्ष कुठं आहे तुझं ? "
तिनं असं म्हटल्यावर तो भानावर आला
" काय काय म्हणत होती तू . "
" राहू दे माझं मी शोधते ऑफिस . " असं म्हणून ती जाऊ लागली . तेव्हा तो पटकन पुढे झाला आणि म्हणाला " अच्छा तुला ऑफिस मध्ये जायचं आहे , अशी सरळ जा पुढे लेफ्ट घे तिथून थर्ड लेफ्ट आणि मग पुढे जे सर्कल आहे तिथून डाव्या बाजूचा तिसरा रस्ता तिकडेच आहे . "
ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती . आणि तो स्माईल करत तिच्याकडे पाहत होता .
" प्लिज माझ्यासोबत येशील का ? मला जरा अर्जंटली तिथं जायचं आहे . काम आहे माझं . "
" ठीक आहे मी येतो तुझ्या सोबत . "
ते दोघे निघाले . ती म्हणाली
" बरं झालं तू भेटलास नाहीतर मला किती  वेळ लागला असता काय माहीत . "
" अगं काही नाही तसही मला तिकडे जायचं होतंच . "
" तुझं काय काम होत तिकडे . "
" माझं.. माझं ते हे . मला लायब्ररीत जायचं होत . "
" आता आता कॉलेज सुरु झालं आणि तू लायब्ररी अँड ऑल दॅट . स्टुडिअस आहेस वाटत . नाहीतर आम्ही जेव्हा एक्झाम असेल तेव्हाच तिकडे जातो . "
" ओह , हे बघ हे आलं ऑफिस . मी आहे लायब्ररीत . "
" ओके थँक्स "
तो काही वेळ लायब्ररीत जाऊन आला . माघारी येताना त्याला कुणाचा तरी ओरडल्यासारखा , भांडल्यासारखा आवाज येत होता . काय आहे हे पाहावं म्हणून तो तिकडे गेला तर तिकडे ती मघाची मुलगी भांडत होते .
" हा काय प्रकार आहे मी इतकी लांबून आले आणि तुम्ही म्हणत आहेत वेळ संपली . "
" अहो फी भरावी लागेल ना आणि कॅशचा टाइम संपला ना आता . "
" मग बाकीची प्रोसिजर तर पूर्ण करून घ्या . "
" अहो फी भरल्याशिवाय कशी होईल बाकीची प्रोसिजर . "
" काय हरकत आहे मी फी भरणारच आहे ना . "
त्यांचं बराच वेळ चाललं होत . मग ती तावातावान बाहेर पडली . तो समोरच उभा होता . त्याला पाहून ती म्हणाली
" हि काय पद्धत झाली का ? मी पैसे भरायला तयार आहे . पण त्यांना ते घ्यायचे नाहीत आणि त्यामूळ  पुढची प्रोसिजरही करायची नाही . "
" अगं पण होईल ना नंतर . "
" अरे पण का नंतर ? आता का नाही ? का आपलं हेच करत बसायचं . "
" अगं पण तू क्लास अटेंड करू शकतेस ना . हे नंतरही करता येईल . "
" हो पण यासाठी परत यावंच लागेल ना . आणि एव्हढ्याशा वेळाच काय असत ? घेता आले असते ना पैसे . "
" कॅश टाईम ३ ला संपते आणि आता ४.३० वाजलेत . "
" एक मिनिट एक मिनिट तू कुणाकडून आहेस ? माझ्याबाजूने कि त्यांच्या बाजूने "
" तस नाही पण तू इतकं का टेन्शन घेते आहेस एव्हढीशी तर गोष्ट आहे . "
" कस आहे ना मी जे काम करायला सुरुवात करते ना ते पूर्ण करतेच असं हरणं किंवा काम अर्ध्यात सोडणं मला आवडत नाही . "
" चांगलं आहे . "
" अर्थात आहेच "
तेव्हढ्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं .
" एक मिनिट एक मिनिट इथंच आपण मघाशी भेटलो होतो ना ? "
" हो "
" आणि आपण तर तिथून फक्त हि एक बिल्डिंग पार केली आणि इथे आलो . पण जाताना तर इतकं फिरून आलो . "
" कस आहे एक तर या बिल्डिंगमधून फिरून फिरून जावं लागत आणि तू नवीन आहेस त्यामुळं तुला ते समजणार नाही आणि दुसरं असं कि बाकीच्या फॅकल्टीच्या स्टुडन्ट्सना इथून जायची परमिशन नाही . फाईन वगैरे करतात . आम्ही जातो कधीकधी पण ते लपून आणि तुझ्यासोबत बोलता बोलता माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे इकडून आलो . "
तिने त्याच्याकडे ऍटिट्यूड मध्ये एक लूक दिला आणि म्हणाली
" बाय द वे तुझं नाव काय आहे ? "
" मी राहुल "
" लूक राहुल माझं नाव मेघना आहे आणि मी रुल्स किंवा इतर काहीही मोडू शकते . जिथं मी जाते तिथं माझे रुल्स आणि फक्त माझ्या कंडीशनच चालतात . मी मी आहे ....

... क्रमशः

Friday, June 5, 2020

अनुराधा (भाग ६)

अनु सकाळी लवकर घरातून निघाली . आज तिला समीरबद्दल जाणून घ्यायचं होत . अंजलीला आज पटकन गाठावं आणि काय ते स्पष्ट करून घ्यावं . ती आज बसनेच ऑफिसला आली होती . बराच वेळ ऑफिस बिल्डिंगच्या खाली वाट पाहून कंटाळा आला तेव्हा ती ऑफिसमध्ये जाऊन पोहोचली . स्वतःची पर्स जागेवर टाकून दोन-तीनदा तिच्या चकरा झाल्या रिसेप्शयनला . आज भेटायचं तर अंजली गायब शेवटी ती जाऊन आपल्या जागी बसली . पण तिची नजर मधून अधून कुठे अंजली दिसते आहे का यातच गुंतली होती . पण नंतर तिला समजलं अंजलीचा अपघात झाला आहे . तिने मनात विचार केला आपण उगाच विचार करत होतो आणि त्या बिचारीच काय झालं असेल . तिला जेव्हा समजलं कि ती आहे ते हॉस्पिटल जवळच आहे तेव्हा तिने मनाशी पक्क केलं कि जाऊन यावं तिकडे . संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघी-तिघी तिच्यासोबत अंजलीला बघायला गेल्या . तिथे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं कि अंजली झोपली आहे आणि तिच्या डोक्याला पट्टी आहे आणि हाताला बँडेज आहे . सोबत तिची आई बसली होती . तिने अंजलीला जाग केलं . ती उठून बसली . तिची आई काहीतरी आणायला बाहेर गेली . तेव्हा सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या कुणालाही याची आठवणच राहिली नाही कि तिची तब्बेत ठीक नाही .
अंजली सांगत होती अगं काही नाही गं कोण एक मूर्ख बाइकवाला आला आणि पाठीमागून डॅश दिली . मी सावध नव्हते त्यामुळे पडले . हात फ्रॅक्चर झालाय बाकी काही नाही . '
' अगं फक्त हातच फ्रॅक्चर झालाय तर मग इथं का ठेवलंय . घरी का जाऊ नाही दिल . ' पूजाने सगळ्यांच्या मनातला प्रश्न तिला विचारला .
यावर अंजली म्हणाली " अगं डोक्यालापण दुखापत झाली आहे ना . ते अंडर ऑबझर्वेशन साठी म्हटले ते आज थांबा . उद्या जाता येईल . "
" म्हणजे तू डोक्यावर पडलीयस " राधानं अचानक असं विचारलं आणि सगळ्या हसू लागल्या .
नर्सने येऊन जवळपास त्यांना हाकलेपर्यंत त्या तिथेच होत्या . अंजलीही खूप रिलॅक्स झाली होती आता . तेव्हा त्या तिचा निरोप घेत निघाल्या . सगळ्या किती अवली आहेत असा विचार बसमधून येताना अनुच्या मनात होता .
मध्ये काही दिवस असेच गेले अंजलीने काही दिवस सुट्टीच घेतली होती . अनुराधाही जरा जास्त काम असल्यामुळे तिची कामाची वेळ थोडी बदलली होती . सकाळी थोडं लवकर जावं लागत होत आणि संध्याकाळी नेहमीपेक्षा उशीर होत होता . यामुळे हे काही दिवस तिची समीरसोबत भेट झाली नव्हती . कामामुळे तिला ते लक्षातही आलं नव्हतं . जवळपास ती त्याला विसरून गेली होती .
आणि अचानक ती बातमी आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली . अंजली गेली होती या जगातून अगदी कायमची . इतकंस लागलेलं तिला त्या दिवशी आपण किती हसलो बोललो आणि आज अचानक असं काय झालं ? तिच्या मनात खूप असूनही तिला जाता आलं नाही अंजलीच्या घरी . त्यामुळं तिला खूप वाईट वाटत होत . काही दिवसांनी तिच्या आईला भेटायचं मात्र तिने मनात ठरवलं होत . या विचारात ती निघाली होती एव्हढ्यात तिला मागून कुणीतरी हाक दिली पण तिचं लक्ष नव्हतं आणि ती तशीच पुढे गेली . तेव्हढ्यात एक बाईक अचानक तिच्या समोर येऊन थांबली . तिने दचकून पाहिलं . समीर होता . तिने रागाने विचारलं
" काय चाललंय तुझं ? "
" अगं काय ? काय झालंय ? लक्ष कुठं आहे तुझं ? मघापासून तुला हाक मारतोय आणि तू पुढेच निघाली आहेस . आणि म्हणून असा समोर आलो तर तू किती भडकते आहेस ? "
" तुला काही कळत का ? मी विचारात होते , माझं लक्षही नव्हतं म्हणून नसेल ऐकू मला . पण म्हणून काय अशी एकदम गाडी अंगावर घालायची का ? "
" अगं रिलॅक्स . मी अंतरावर होतो तुझ्यापासून आणि फक्त समोर गाडी आणली इतकंच . "
" म्हणजे असं वागून तुला त्याच काही वाटतच नाही ना . ठीक आहे तू हो बाजूला मला जाऊ दे "
" अगं एव्हढी चिडतेस का ? शांत हो . "
पण ती आज ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती . ती त्याला तसच ठेऊन निघाली . त्याने क्षणभर विचार केला तिला विचारावं काय झालय ,  मग त्याने विचार केला आता तिचा मूड खराब आहे . आणि असं परत परत तिच्या समोर जाणं ठीक दिसणार नाही . म्हणून तो तसाच निघून गेला . तिने तो आहे कि गेलाय हे पाहण्याचीही तसदी घेतली नाही आणि ती तडक तशीच निघून गेली .

.... क्रमशः