" तर इथलं सगळं बऱ्यापैकी कंट्रोलमधे आहे आता . "
" हो सर . तुम्ही फारच सुरेख हे सगळ हाताळल . " कुलकर्णींनी त्याच्या कामाची मनापासून तारीफ केली .
तो मीटिंग संपल्याचं त्याने ऑफिशिअली जाहीर केल आणि सगळे निघाले . त्याने सुजीतला थांबवून घेतल .
" हे बघ सुजीत हे आता तरी सांभाळलंय पण पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तू जातीन लक्ष दे . "
" सर खर सांगायच तर आता जे आपण केल आहे ते बाहेर बाहेरची डागडुजी आहे . खरा प्रॉब्लेम काय आहे . म्हणजे ऍक्च्युली कोण आहे हे अजून समजलेलंच नाही . "
" तुला काय म्हणायच आहे सुजीत ? "
" सर डिअर मस्ट बी अ ट्रोजन "
" आर यू शुअर ? "
" हो सर . एकाएकी इतक्या मोठ्या गोष्टी कशा होतील आणि तेही कुणालाही न समजता ? "
तो विचार करू लागला . हे त्यालाही वाटत होत पण त्याला सुजीतच मत लक्षात घ्यायचं होत .
" तुला काय वाटतय काय करायला हव मग ? "
" सर तुम्ही इथले खरे मालक आहात हे फार कुणाला माहीत नाही . त्यांना असच वाटत कि तुमचे अंकल इथले मालक आहेत . आणि फ्रँकली स्पिकिंग अंकलच वय झालय आता त्यामुळे कुणालाही असच वाटेल कि त्यांना बाजूला करून हे सगळ एम्पायर हस्तगत करायच . "
तो विचार करत होता .
" सर आता तुम्ही स्वतः पुढे येऊन कंपनी लीड करायला हवी . "
सुजीत तुझ म्हणन पटतय मला त्यांना त्रास द्यायला मलाही आवडत नाही . खरच आता मलाच हे सगळ करायला हवं . "
" ठीक आहे आपण करूया हे . यासाठी काही लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील . ते करू आपण पण तोपर्यंत सतर्क राहा . "
" सर आता तुम्ही ? "
" बॅक टू पॅव्हेलियन . "
दोघेही हसले .
========================================================
" हो सर , तुम्ही या तर खर "
" ओके " म्हणत त्याने फोन ठेवला .
तो ऑफिस बिल्डिंगच्या बाहेरच होता त्याच लक्ष तिच्याकडे गेल . ती फारच डिस्टर्ब वाटत होती . त्याने विचार केला कि आता नको हे , नंतर विचार करूया याचा . त्याने पाहिलं प्रिया समोरच होती . तिने त्याच्याकडे पाहिलं आणि स्माईल केल . त्याने विचार केला कि हे सगळं तर इथंच घडून आलं आहे . एकतर तिचा मूडही चांगला नाही आणि हे ठिकाण पण योग्य होणार नाही . त्याने ठरवल गोष्टी पोस्टपोन करायला हव्या . त्याने पटकन फोन लावला ... पण समोरून फोन उचलला जात नव्हता . आता मात्र त्याला काही समजत नव्हत . एका अनामिक भीतीने त्याला घेरल होत . तो परत परत कॉल लावत होता पण समोरून नो रिप्लाय . आणि अचानक फोन रिसिव्ह झाला तो पटपट बोलत होता . हे सगळ थांबवायला सांगत होता . पण समोरून काहीही रिप्लाय नव्हता . फोन फक्त समोर होणाऱ्या गोष्टी त्याला ऐकता येण्यासाठी उचलला गेला होता . सर्वकाही त्याच्या नजरेसमोर घडत होत आणि कानाने ऐकू येत होत . सर्व होताना तो पाहू शकत होता पण त्याला आता काहीही करता येत नव्हत . त्याला जे करायच होत ते हे नक्कीच नव्हत . आणि जे होत होत ते त्याला पाहवत नव्हत . त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते . मानसी मानसी काय अवस्था झाली होती तिची तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते . ती स्वतःच प्रेम वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होती . सुधीर तिला हवं तस बोलत होता त्याला त्याचा राग येत होता आणि तिची अवस्था पाहून डोळ्यात पाणी दाटून आलं होत त्याला पाणावलेल्या डोळ्यासमोर ती अस्पष्ट दिसत होती . ती तशीच वळली आणि धावू लागली . तो हताशपणे तिला पाहत होता इतक्यात त्याला जाणवलं ती रस्त्याच्या दिशेने धावते आहे . तो तिकडे धावला . त्याच्या काळजाचा ठोका क्षणात चुकला ती मोठी लॉरी तिच्या दिशेने येत होती . मानसी त्याने जिवाच्या आकांताने आवाज दिला पण तो तिच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही . ती तशीच बेभान धावत होती . तो तिच्यापर्यंत पोहोचला . तिला त्यानं वेगान दूर ढकललं आणि काहीतरी जोरदार आघात झाला . त्याने तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू सर्व अस्पष्ट धूसर होत गेलं .
No comments:
Post a Comment