" सोन्या जरा डोक्यात बघ ना लय वळवळतय . तुला भेटायला लय आसुसले होते पण हे डोकं थंड बसूच देत नव्हतं . तासभर फनी केली पण काय फरक नाय पडला बघ . एकदा तू प्रयत्न करून बघ कि , काय माहित तुझ्या प्रेमाच्या स्पर्शातून सगळं मोकळं होईल . " पिंकीच्या डोळ्यात ती वेदना आणि मनात ते दुःख जाणवत होत जी ती डोकं खाजवून शांत करण्याचा प्रयत्न करत होती .
" थांब प्रिये तुझा छान भांग पाडतो . तुझ्या केसातल्या सगळ्या उवा काढतो . " बंड्या एव्हढच बोलला आणि कामाला लागला . शांतपणे तिच्या डोक्यातली एक-एक बट मोकळी करून तिच्या डोक्यातली एकेक ऊ हळूहळू तो बाजूला करू लागला . त्याच काम मनोभावे चालल होत .
त्या दोघांपासून थोड्या अंतरावर सुमी बसली होती . सुमी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती . तिचा बॉयफ्रेंड सागऱ्या तिला त्यांच्याकडे तस बघताना बघून म्हणाला
" अय काय चाललंय तुझं ? हित तुझ्यासाठी आलुय मी न तू तिकडंच बघत बसलीस . "
ती म्हटली ," तिकडं बघ कि त्यो कसा प्रेमानं तिच्या डोक्यातल्या वा ती काडतूय . कसलं प्रेम असल . "
त्याला रागच आला तिचा . आणि म्हटला
" असलं असतय व्हय गं प्रेम . वा काढणं म्हणजे काय प्रेम झालं का ? मी सांगू का तुला कस असत प्रेम " असं म्हणून त्यानं तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला . ती म्हटली
" अय थांब जरा . हो बाजूला . आधी ती तोंडातली गायछाप थूक . त्याच्यामुळं गेल्या वेळेला मला चक्कर यायला लागली हूती . "
तिचा हा हल्ला त्याच्या मनाला लागला आणि तो कळवळून म्हणाला
" अय गायछापला नावं नाय ठेवायची . गायछाप हाय म्हणून आपण हाय . पण एक सांग तुझा ब्रँड कुठला . "
सुमीला काय कळेना हा असं का विचारतोय ती बावरून त्याला म्हणाली
" मी कुठं तंबाकू खाती ? मी फक्त मशेरी लावती . "
" अगं मशेरी काय अन तंबाकू काय , काय फरक नसतो . ये अशी जवळ . अशी जवळ आली म्हणजे तुलापण सवय हुवून जाईल तंबाकूची . " असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतलं .
शेजारीच बसलेल्या बज्यान ते बघितल अन त्यानं धनीला सांगितलं
" बघ धने कस चाललंय त्यांचं अन तू बसलीय लांब आपली तिकडं . "
धनीन लगेच थोडं दूर होत त्याला सांगितलं
" अय बास कर कि बाबा तुझं . तुला त्याच्याशिवाय दुसरं काय सुचत का ? कधी आलं कि तुझं तेच . दुसरं काय नको बोलाय नको काय नगो सारक तेच "
" अगं त्याच्याशिवाय कुठं मजा हाय . " बज्या तिला समजावत म्हणाला .
" बस कर एकदा सुरु झाला कि किती वेळ चालत तुझं काय थांबत नाय . " सुमी तक्रारीच्या सुरात म्हणाली .
" गप असं नसतय काय . " - बज्या
" राहू दे मी काय ऐकायची नाय . " सुमीनं परत नकार दिला .
पण त्यानं काय ऐकल नाही तिच . आणि तो जबरदस्तीच तिला कीस करू लागला . बराच वेळ त्यांचा कीस चालू होता . त्याच्यानंतर तो तिच्याकडे प्रेमाने पाहून म्हटला
" धने मी तुझ्या तोंडातल चिंगम खाल्ल . "
धनी जराशी लाजली आणि म्हणाली
" चिंगम नव्हत काय ते जरासा शेंबूड आला होता . "
तो एकदम चिडला आणि म्हटला
" अगं काय ? तुला काय कळत का नाय ? शेंबडे ... आधी नाक शिकरून करशील का नाय कीस "
ती म्हटली
" मग शिकारल होत कि मघाशी पण तुझं काय थोडक्यात उराकत वय ? मंग आला थोडा . अन त्याला काय होतय ? गर्लफ्रेंडच सगळ गोड लागत अन शेंबूडच काय गोड लागत नाय वय "
" हं तर तर लय हाय शानी शेंबडे "
" तुला सांगू बज्या मला ना दिवसभर तुझीच आठवण येते आणि वाटत कधी येऊन तुला भेटेल आणि तुझ्याशी किती बोलेल अन तुझं मात्र हे असं सुरु असत बोलत जा कि . "
" अगं धने तुजा आवाज लय गोड हाय . त्यामुळे बोलण्यापेक्षा तुला ऐकत राहावं असं वाटत . "
" खरं "
" हो ग माझ्या धने "
" पन मग मला एक सांग तुला इतकं बोलायचं असत आन तू लगीच कशी जातीस . "
" अर मला पण वाटत कि इथून जाऊच नये पण घराची विचारत्याती कि . आन हे चिम्पाट घेऊन यायचं म्हनलं कि ती गुड मॉर्निंग पथक वाली कुठ भेटत्याल त्याचा काय नेम नाय . आणि वर आई पण म्हणती धने कमी खात जा इतका वेळ लागतो तुला झेपलं इतकंच खा . असं म्हणून दोन दिवस १ चपातीच देतीय . माझं मी कस सहन करते आहे माझं मला माहित आहे . "
" अगं धने अजून थोडे दिवस मग तुला नाय त्रास होणार "
" खरंच . "
" हो गं माझी रानी . "
तिकडं बंड्याच्या बराचश्या उवा काढून झाल्या होत्या . पिंकी म्हणाली
" बास कर आता . फूडच्या वेळेला येईन तेव्हासाठी असू दे कि . "
" म्हणजे तू निघालीस . "
" नाही निघाले लगेच पण आता उवा काढायचं बास . "
बंड्या आता उवा काढायचं थांबवून पिंकीच्या केसातून हात फिरवत होता .
" तुला सांगू बंड्या मला असं वाटतं ... मला असं वाटत "
" काय वाटत पिंके ? "
" मला असं वाटत माझे केस असावे , तुझा हात असावा आणि आयुष्यभर तू अशाच उवा काढत बसावा . "
" हो गं पिंके किती भारी स्वप्न आहे गं तुझं . हे स्वप्न नक्की खर होणार . "
इकडे सुमीच डोक गरगरायला लागलं होत .
" सागऱ्या तुला किती वेळा सांगितलं ती गायछाप नको चक्कर येतेय बग . "
" अगं सुमे होईल सवय तुला पण असं गायछापला नाव ठेऊ नये . अगं असा एकदा बार लावला कि कशी ब्रह्मानंदी टाळी लागते . "
" मजी रं . "
" अगं म्हणजे मग कितीबी काम असलं तरी दमायला होत नाही . "
" बर बर . भारी हाय तुझं . पण यगदा माझ्या बाबाला य कि भेटायला . आपलं कधी सांगणार . "
" अगं सांगणारच कि . ह्यो पट्ट्या घाबरतो कि काय कुणाला . "
ती कौतुकानं म्हणाली " तर तर ... "
" काय गं धने तुला सारखी सर्दी कशी होते गं . सगळी तुला शेंबडी धनी म्हणतात कि . "
" अं समदी म्हणू दे पण तू नको म्हणू . "
" अगं प्रेमान म्हणतो मी . प्रेमाचं बोलणं असं नाकारायचं नसत . "
" बर मग म्हण . "
" ए शेंबडे , माझ्या शेंबडे धने . "
त्याच्या अशा हाक मारण्यान धनी आनंदानं न्हाऊन निघाली आणि म्हणाली
" तुला काय सांगू तू असं प्रेमान मला शेंबडे म्हणतो ती मला कस गलबलून आलय . "
" होय . "
" अर कसचं गलबलून आलाय . मी जाऊन येऊ का चिंपाट घेऊन पाच मिनटात . "
" तुज काय गं . कधी कुठल्या वेळी काय सुचलं काय सांगता येत नाही . येताना जाऊन नव्हती का आलीस . "
" कुठं तू गडबड केली ती तशीच आले . "
" बर जा . "
तोपर्यंत एकच गलका झाला
" अर गुड मॉर्निग पथक आलं . "
सगळ्यांनी पळायला सुरुवात केली . धनीपण चिंपाट सावरत निघाली .
" अगं टाक ते चिंपाट "
" ऊं म्हणं टाक चिंपाट . आय जोड्यान हानल . आमच्या आज्ज्यापासन चिंपाट हाय ते . "
" बर घे ते चिंपाट आन पळ . "

No comments:
Post a Comment