" ठीक आहे मी येतो तुझ्या सोबत . जाऊ आपण . आता ठीक आहे ना ? " त्यानं एव्हढं बोलताच तिची कळी खुलली . पण तो पोरगा बोलला
" तुम्ही जाणार ? पण आत्ताच तर... "
त्याने एक भेदक नजर त्या पोरावर टाकली तसा तो बोलता बोलता थांबला .
ते दोघे निघाले . ते एका चिंचोळ्या गल्लीतून निघाले होते .
" मी इथून नव्हते आले . "
" माहीत आहे तू बरीच फिरून आली आहेस . हा शॉर्टकट आहे . "
ती गल्ली तशी फारच अरुंद होती आणि पुढे अजूनच अरुंद होत चालली होती . तिला भीती वाटू लागली होती . तिने अभावितपणे त्याचा हात पकडला . त्याने वळून तिच्याकडे पाहिले ती खूपच बावरली होती . त्याने तिची समजूत काढत म्हटल
" काही होत नाही मी आहे सोबत . "
त्याच्या बोलण्याने तिला आधार आला . ते तसेच पुढे निघाले होते . पुढे एका मोठ्या गटारावरून पलीकडे जाण्यासाठी छोटासा पूल होता पुढे जरा प्रशस्त होत . तो तिथेच थांबला आणि तिला म्हणाला हि बघ इथून पलीकडे गेलीस कि तू त्या सोसायटीमधे पोहोचशील . तिथे गेलीस कि तुला लक्षात येईल तुझी बिल्डिंग . मग जा तू . "
त्याने अस म्हणताच ती खूपच घाबरली .
" नको ना मला नाही सापडल घर तर . "
" अग सापडेल . फार बिल्डिंग नाहीत तिथे . "
" नाही तुम्ही चला तिथे माझ्या सोबत . " म्हणत ती त्याचा हात सोडतच नव्हती . शेवटी त्याला पर्याय नव्हता त्यामुळे तो तिच्यासोबत निघाला .
ते त्या सोसायटीमधे पोहोचले आणि तिथे प्रत्येक बिल्डिंग पाहू लागले . पण तिला त्या कोणत्याच बिल्डिंग ओळखीच्या वाटेना . अगदी तो रस्ता तो परिसरही तिला ओळखीचा वाटत नव्हता . शेवटी तिला लक्षात येत नसेल म्हणून त्याने बिल्डिंगच्या आत जाऊन तिला ती दाखवू लागला . पण व्यर्थ तिची बिल्डिंग काही सापडली नाही . तो विचार करत होता कि काय प्रॉब्लेम आहे तेव्हढ्यात त्याला काहीतरी दिसल त्याबरोबर त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळपास ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला . तिला काहीच कळेना काय . पण तो न थांबता चालत होता . शेवटी ते मघाच्या पुलावरून पलीकडे गेले . तेव्हा तिने त्याला थांबवल आणि काय झालय म्हणून विचारलं .
" हे बघ आता खूप उशीर झाला आहे आणि रात्रही फार झाली आहे . आपण उद्या येऊन शोधूया . "
तिला परत तिकडे जायच नव्हत . पण पर्याय नव्हता त्यामुळे तिला जाणं भाग होत .
" बर तू आज इथेच रहा . मी तुझी राहण्याची सोय करतो . "
त्याने एका तुटक्या फुटक्या खोलीपाशी आणलं . आणि आत आवाज दिला एक मध्यम वयाची जाड बाई बाहेर आली . तिचे केस विस्कटलेले होते . उगाचच करायचा म्हणून केलेला भडक मेकअप आणि अस्ताव्यस्त साडी . अशा अवतारातल्या त्या बाईला आधीच घाबरली . त्यात त्याने सांगितलं आज तू " या मावशींकडे रहा . उद्या आपण जाऊया तुझ घर शोधायला . "
अस म्हणून तो निघाला . त्या बाईने तिच्या हाताला पकडून जवळपास खेचतच तिला घरात घेऊन गेली . त्या घरात कसलासा कुबट वास येत होता . सगळ अस्ताव्यस्त पडलं होत .
ती बाई तिला एका मोडक्या खुर्चीवर बसवून " मी आलेच " म्हणत आतल्या खोलीत निघून गेली . ती त्या बाईच्या बाहेर येण्याची वाट बघत बसली होती . इतक्यात तिला जाणवल तिच्या शेजारी कुणीतरी उभ आहे . तिने कुणाला आत येताना तर पाहिलं नव्हत मग इथे कोण आल आणि तेही आपल्या इतक्या जवळ . असा विचार करून तिने वळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि समोर जे होत ते पाहून तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली आणि ती बेशुद्ध झाली .

No comments:
Post a Comment