" काय गं , आता झाली की मोकळी सगळ्या जवाबदाऱ्यांमधून . आता तरी कर ना स्वतःचा विचार . "
राधाक्का अनुला सांगत होत्या . त्यावर अनु अगदी सहजपणे म्हणाली
" अहो, करते मी स्वतःचा विचार . असं थोडीच आहे कि जवाबदाऱ्या होत्या तेव्हा काही आयुष्याचा आनंद घेत नव्हते . आणि अशू प्रतिक या दोघांच करताना मला नाही का आनंद होणार ? "
राधाक्काला तीच पटत होत पण त्यांना सांगायच होत ते अनुला समजत नव्हत . त्यामुळे त्या तिला समजावत म्हणाल्या
" तेव्हाच वेगळ होत गं . आता दोघेही आपापल्या संसाराला लागले आहेत . आता ते त्यात गुरफटू लागतील आणि तू वेगळी पडशील . आज ठीक आहे पण उद्याच नाही सांगता येणार . तेव्हा लवकर निर्णय घे आणि संसाराला लाग . "
त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितल .
" अहो अस काही नाही ते नाहीत माझ्यापेक्षा वेगळे आणि आता संसार थाटायचा ? नको त्यापेक्षा मी अशीच बरी आहे . नोकरी चांगली चालली आहे आणि सगळं स्थिरस्थावर आहे . आता परत नविन सुरुवात करायला मन धजावत नाही . "
" अगं सोळा वर्षाची कोवळी पोर असो किंवा पन्नाशीला आलेली बाई कुणालाही आयुष्यात नविन काही करताना अवघड तर होणार पण म्हणून नवीन काही करायचं नाही असं नाही ना . "
" असू द्या हो " म्हणत अनुने विषय टाळला .
===========================================================
" काय गं किती गोड आहे ही . मी ठेऊन घेऊ का हिला . "
ते गोड बाळ बघून अनुला राहवत नव्हत . तिचे किती लाड करावेत आणि किती नाहीत अस झाल होत तिला .
सुधा तिच्या मुलीला पहिल्यांदाच घेऊन आली होती ऑफिसमधे आणि तिचं येण म्हणजे सोहळाच झाला होता .
" दिदी एक बोलू " सुधाने अनुच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली .
अनु अजून छोटीमधेच मग्न होती ती तिच्याशी खेळतच सुधाला म्हणाली
" काय गं ? "
" तू स्वतः किती गोड आहेस गं , तुला अस नाही वाटत का कि स्वतःच बाळ असाव . "
सुधा तस बोलली तशी अनु बाळापासून थोडी दूर झाली .
" तुला आवडल नाही का मी तिला घेतलेल ? "
" अस काही नाही आणि हे तुलाही माहीत आहेच . ती माझ्याकडे जितकी आनंदी राहील तितकीच ती तुझ्याकडे राहील . पण माझ्या मनात कितीही असलं तरी तिला तुझ्यासोबत नेहमी तर नाही ना ठेऊ शकणार . पण मला माहीत आहे तू किती प्रेमळ आहेस आमचीही तू मोठया बहिणीप्रमाणे काळजी घेते तेव्हा तुझं चांगल व्हावं असं मला नाही का गं वाटणार . "
" माझं चांगलच चाललय ना . मला थोडीच काही त्रास आहे ? "
" अगं तस नाही . तू किती प्रेमळ आहेस इतकी प्रेमळ आई आणि तितकीच प्रेमळ बायको होशील . मग यापासून कुणी का मुकावं ? "
अनु थोडी बावरली पण स्वतःला सावरत म्हणाली
" अगं अशुच बाळ आहेच कि त्याची माया करतेच ना . "
" पण तू स्वतःच का नको म्हणते आहेस ? स्वतःच माणूस हवं हक्काच . "
" अगं हा एकच विषय आहे का ? "

आज सुट्टी थोडा घरच्यांसोबत वेळ घालवण्याची हक्काची वेळ पण आज प्रतिकबायकोला घेऊन बाहेर गेलेला . त्यांना तसाही एकत्र घालवायला वेळ मिळत नाही त्यामुळे आज दोघच बाहेर गेले होते . घरातली काम आवरण्यातच तिचा बराचसा वेळ गेला पण नंतर बसून काय करायच म्हणून तिने अशुला फोन लावला . बोलता बोलता अशुच्या छोटीच , मुग्धाच काहीतरी बिनसलं . तिकडे अशु तिला घेऊन बसली . तिला लक्षातच नाही राहील फोन सुरूच असल्याच . अनु बराच वेळ अशु माघारी येण्याची वाट पहात राहिली आणि नंतर तिने कंटाळून फोन ठेवला . थोडा वेळ काय कराव याचा विचार करत राहिली . तिला आठवल आपण बऱ्याच दिवसात चांगल संगीत ऐकलंच नाही . तिने मोबाईलमधे रेडिओ सुरु केला . वेगवेगळी चॅनेल्स , एक दोन चॅनेलवर तो इंस्ट्रूमेंचा गोंगाट आणि त्या जॉकींची बडबड सुरु होती . ती एकामागून एक चॅनल बदलत होती . अशीच ती त्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचली आणि तिथे सुरु होत ' ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा ... '
.... क्रमशः

No comments:
Post a Comment