" अरे ती जाम कंजूस आहे . "
" मुली पैशाच्या बाबतीत थोड्या काटकसरीचं असतात . "
" अरे ते वेगळं . ती एक स्टॉप आधीच उतरते आणि तिथून चालत येते . जवळपास अर्धा किलोमीटर किंवा जास्तच अंतर असेल का तर ३ रुपये वाचतात आणि व्यायामपण होतो अशी ती जाता येता ६ रुपये वाचवते . कोण करत असं . किती तो कंजूषपणा . "
***
ती तिच्या जगात मग्न होऊन गुणगुणत चालली होती . तितक्यात एक कार शेजारी येऊन थांबली . ' मानसी ' अशी हाकही ऐकू आल्यासारखी वाटली. ती थोडी बावरली . तेव्हढ्यात कारची ग्लास खाली झाली . ओळखीचा चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलं .
" तुमची कार आहे ? "
" अगं कार कंपनीची आहे . इम्पॉर्टन्ट डॉक्युमेंट किंवा काही महत्वाचं काम असलं कि मला यातून जाता येत . त्यामुळे तशी सध्या माझीच आहे. तू ये ना तुला सोडतो . "
" नाही मला थोडं पुढेच जायचं आहे स्टॉपपर्यंत . "
" असू दे तिथपर्यंत सोडतो . "
ती कारमध्ये बसली .
" ओह सॉरी मी तुम्हाला एकेरी बोललो "
" नो इट्स ओके . तुम्ही मला एकेरीच बोला "
" चालेल पण मग तुही मला तसच बोल "
" पण.. "
" आता पण नको "
" हो पण तुमचं आय मिन तुझं नाव काय आहे ? "
" मी रोहित "
" ओह "
"अग पण एक सांग ऑफिस बिल्डिंगच्या अपोझिट साईडला थोडं पुढं गेलं कि बस स्टॉप आहे . मग तू इतक्या दूर का जात आहेस ? "
" नाही पुढे एक बस स्टॉप आहे. मी तिकडूनच बस पकडते . दिवसभर बसूनच असते ना . थोडे पाय मोकळे होतात . "
" ओह असं आहे "
" हो बघा ... म्हणजे बघ कुठं दूर आहे माझा स्टॉप हा आला बघ "
असं म्हणून ती उतरली .
तिला निरोप देऊन तो निघाला .
***
" समीर एक काम कर . त्या दिवशी इंटरव्यू झाले त्या दिवशीच त्या एरियाच सीसीटीव्ही फुटेज हवं आहे . रिसेप्शन, इंटरव्यू पॅनल, लॉबी अगदी सगळं . "
ते फुटेज घेऊन समीर आला .
" सर काही विशेष शोधताय का "
त्याची नजर पाहून समीर " सॉरी सर "
" हा कोण आहे ?"
समीरन पाहिलं
" सर हा सुधीर आहे . अमितच्या टीममध्ये आहे. "
" कधी जॉईन झाला आहे?"
" सहा महिने झाले असतील "
' याच काय काम आहे सिलेक्शन टीम सोबत ' तो मनातल्या मनात पुटपुटला .
" एक काम कर पाटीलला स्कॅन कर . त्याची बँक आणि कॉल डिटेल्स घे मागच्या काही महिन्यांची
गरज पडलीतर फॅमिली, फ्रेंड आणि नातेवाईक यांचीही . "
" जा तू . "
समीर गेला .
" जरा अमितला पाठवून दे "
" सुधीर तुझ्या टीममध्ये आहे ना ?"
" हो सर "
" कसा आहे ?"
" का काही प्रॉब्लेम आहे का "
" म्हणजे कामात तर ठीकच आहे. इतरांसोबत पण चांगलं आहे. दुसऱ्या टीम्स किंवा इतर डिपार्टमेंटमधील लोकांशीही त्याच बोलणं असत . "
" तुला एक ऍडिशनल काम आहे. आणि हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील "
" ओके सर "
" त्याला टोटल स्कॅन करायचा . सोशल साईटस् , कॉल डिटेलस्, बँक डिटेल्स सगळं काही . जे कोण एक्स्पर्ट लागतील ते बघ . प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गरज लागल्यास घे . पण हे सगळं कंपनीपासून दूर पर्सनल लेव्हल वर करायचं . "
" ओके सर "
" जा तू आणि लवकरात लवकर रिपोर्ट कर . "
***
" काय माणूस आहेस तू ? तुला काम सांगायच्या आधी तू कामाला लागला वाटत. दॅट्स गुड . बर आता कोणत्या नावाने वावरतो आहेस ? "
" ... "
" गुड "
... क्रमशः

No comments:
Post a Comment