आज उशीर होत होता त्यामुळे तो इकडे आला होता . नाहीतर या लिफ्टने तो कधीच जात नव्हता . लिफ्ट पूर्ण भरली होती पण एका माणसाला जागा होऊ शकत होती . तो आत शिरणार तेव्हढ्यात मागून आवाज आला, "प्लिज मला जाऊ द्या ना . "
त्याने वळून पाहिलं ती फारच अस्वस्थ वाटत होती तिच्या डोळ्यात ते जाणवत होत . त्यालाही उशीर होत होता पण त्यान तिला जाऊ दिलं .
" सर आज आप इस लिफ्टसे . "
" बस कभी कभी चेन्ज भी जरुरी होता है . "
***
" पाटील कुठपर्यंत आले इंटरव्ह्यू ? "
" सर आताच सुरु झाले आहेत . "
" ओके यु कॅरी ऑन ."
***
" हि मुलगी कोण आहे ? हीचा इंटरव्यू झाला का ?" त्यानं रिसेप्शनिस्टला विचारलं .
" सर मघाशीच जाऊन आली. "
" तिचा रिपोर्ट जरा मला द्या. "
" ओके सर "
***
" ओके पाटील सिलेक्शन झाली सगळी? "
" हो सर पहिल्या लॉटसाठीची सिलेक्शन झाली आहेत. हि आहे लिस्ट. "
'मानसी. हि आहे लिस्ट मध्ये. ओके. 'तो स्वतःशीच पुटपुटला .
***
त्यादिवशी तो जरा लवकरच आला होता व आज जरा निवांतच होता . तेव्हढ्यात त्याला त्यादिवशीची ती मुलगी दिसली . तिने त्याला पाहिलं व स्माईल करत ती त्याच्याकडे आली.
"ओ हाय, मला तुम्हाला थँक्स म्हणायच होत. "
"कशासाठी?"
"तुम्ही त्या दिवशी मला जाऊ दिलंत त्यासाठी."
"अहो एव्हढ्यासाठी कसलं थँक्स"
"अहो तुमच्यासाठी एव्हढसच आहे पण माझा इंटरव्यू होता त्या दिवशी आणि पोहोचल्या पोहचल्या मला आत बोलावलं बर झालं वेळेत पोहोचगले नाहीतर सुरुवातीलाच बॅड इम्प्रेशन पडलं असत."
"तुम्ही सर्वात शेवटी तिथे पोहोचला आणि तुम्हाला सर्वात आधी बोलावलं स्टेंज ना."
"तस नाही पर्वा दिवशीच इंटरव्यू बद्दल त्यांनी कळवलं होत . तेव्हा माझं नाव आधी असेल म्हणून.
"बाय द वे तुमचं नाव काय?"
"मानसी ... मानसी देसाई"
"m .... d ... म्हणजे अल्फाबेटीकलीपण ..."
"ते सोडा हो पण मला जॉब मिळाला. सो थँक्स."
"तुम्हाला जॉब मिळाला आणि नुसतं कोरड थँक्स."
त्याच्या हातावर पाण्याचे काही शिंतोडे उडले. त्याने चमकून पाहिलं तिने तिच्या बॉटलच्या टोपणातलं पाणी झटकलं होत . त्याने तिच्याकडे पाहिलं. ती स्माईल करत होती.
"तुम्हीच म्हणाला ना कोरड कोरड म्हणून ..."
"अहो म्हणजे ..."
"नाही बरोबर आहे पण काय आहे ना आज जाण्यायेण्यापुरतेच नेमके पैसे आणलेत सो ."
"इट्स ओके"
"पण मी तुम्हाला नक्की ट्रीट देईन."
"असू द्या हो पण आज तुमच्या साठी चांगला दिवस आहे . मी देतो तुम्हाला ट्रीट."
"अहो असं कस मी द्यायला हवी ट्रीट."
"आज मी देतो ट्रीट. तुम्ही नंतर द्या चालेल?"
"पण ...."
"पूरे ... चला "
आता तिला पर्याय उरला नव्हता . ते दोघे कॅफेटेरियात गेले. तिला फारशी सवय नसावी अशी . ती थोडी अन्कम्फटेबल, थोडी बुजल्यासारखी वाटत होती. त्याने तिला नॉर्मल करण्यासाठी सहजच विचारलं.
"तुम्ही आधी कुठे होता जॉब ला"
"नाही हो . पहिलाच जॉब आहे आताच माझा रिझल्ट लागला फायनल इयरचा."
मधेच तिने त्याला विचारलं
" कोणत्या फ्लोअरवर आहे तुमचं ऑफीस?"
"तस नाही माझं मोस्टली फिल्डवर्कच असत. मी आमच्या ऑफिसच्या मेन ब्रांचला असतो . इथे थोडं काम आहे म्हणून आलोय या ब्रान्चला ."
"म्हणजे नेहमी तुम्ही इथे नसता ?"
"नाही"
"ओह मग तुम्ही परत कसे भेटणार?"
"अं?"
"तुम्हाला मी ट्रीट देणार आहे ना."
"असू द्या येईन मी कधीतरी"
"तस नको तुमच्या मेन ऑफिसचा पत्ता द्या"
"एक काम करा माझा फोन नंबर देतो . तुम्हाला सोपं जाईल . नाहीतर तेव्हढ्यासाठी तुम्ही इतक्या दूर मेन ऑफिसला जाणार आणि मी बाहेर असलो तर. "
"अरे हो ते पण आहेच"
त्यांचं आवरलं होत .
" बर भेटू पुन्हा" म्हणून ते निघाले .

Next part please
ReplyDelete5 parts post zalele aahet
DeleteKhup Chhan ahe
ReplyDeleteThanks
DeleteKhup chan stoty write aahe
ReplyDeleteKhupach bhari
ReplyDelete