Sunday, September 25, 2016

एक संवाद

      " अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? "

      " काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ."

     " का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? "
   
" अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो .  आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत . चल ते सोड आपली सोना नाय बघितली दोन दिवस . "

    " कोण भाई ? अरे ती नाय का बाजूच्या बिल्डिंगमधली ."

    " ती काळा शेपटावाली ? "

    " हं "

    " एकदम आयटम आहे भाई . "

    " अबे भाभी है तेरी . आयटम काय बोलतोस ? "

    " सॉरी भाई सॉरी चूकून मिस्टेक झाली . "

    " हां परत लक्षात ठेव . "

    " ओके भाई . "

    " आणि काय मॅटर . "

    " हो भाई दोन बेघर मांजरी त्यांची पिल्ल घेऊन आस-याला एका ठिकाणी गेल्या होत्या तिथल्या माणसाने जाम कटकट केली . "

    " त्यांना काय दुखापत वगैरे . "

    " नाय नाय तस काय नाय . तस झाल असत तर गल्लीतले सगळे बोके घेऊन गेलो असतो न चांगला धडा शिकविला असता . "

    " बर आता कस आहे त्यांच ? "

    " तात्पुरत्या शिफ्ट झाल्यात त्या . "

    " म्हणजे आपणच माघार घेतली ना ? या मांजरीपण अशा असतात ना , पिल्ल झाली की आपल्याला जवळ करत नाहीत अंगावर धाऊन येतात पण माणसाच्या बाबतीत का माघार घेतात काय माहीत  ? अरे यार हा माणूस पण काय प्राणी आहे ? शेपूट नाही त्याला . अरे ज्याला शेपूट नाही त्याला कसली आलीये किंमत ? "

    " आणि ते म्हणे कपडे घालून फिरतात किती वल्गर दिसत ते . सो चीप . "

    " जाऊदे रे बिचारा प्राणी आहे तो . त्याला अंगावर साधे केसही नसतात . आपले बघ कसे मस्त केस आहेत ते ."

    " हो ना भाई एक नंबर . "

    " अरे मग रोज काळजी घेतो त्याची रोज चाटून पुसून साफ करतो , उगाच काय ? अरे तू  कॅटबुक वर आहेस का ? "

    " नाय भाई . "

    " अरे ये लौकर . काल फॉरेनच्या मांजरी पहात होतो काय होती एकएक काय ते डोळे काय ती फिगर आणि केस म्हणाव का फर असा प्रश्न पडतो . "

    " काय भाई भाभीला विसरला काय ? "

    " नाय रे बाकी की बिल्लीयाँ आनी जानी है सोना तो मन की रानी है . सिंपल आहे रे ती . अगदी क्लास . बाकीच्या मांजरींसारखी कुठ भटकत फिरत नाही . सकाळी देवळात जाते तेव्हढच . आणि तिची नजर , तिनं नुसत बघिटलं तरी काळजाचं नुसतं पाणी पाणी होतं . "

    " हाय हाय भाई तो एकदम सेंटी हो गया . "

    " हळवा कप्पा आहे तो हार्टचा . बर जास्त इमोशनल नको व्हायला . "

    " भाई जेवला का नाय तुमी ? "

    " हो मी जेवलो . आणि तुझं  जेवण झालं का ? "

    " आपल्याकडे जेवणाची काही आबाळ नसते . मटण , चिकन , मासे झालच तर फ्रेश उंदिरपण ."

    " हो काय ? मजा आहे मग तुझी . "

    " मग काय भाई . भाई ते राहिलच त्या माणसाच काय करायच ? त्याच्या नावाची पाल देऊया का ? "

    " काय गरज नाय त्याची त्यांच्यातलेच लोक 'त्याच काय करायच ' म्हणून धागे टाकतात . ते बघून घेतील . "

   " बाकी भाई पाल काय सगळ्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही . ब-याच जणांना ती लागते . "

    " हं बाकी आपल्याला पालीच्या शेपटीचही व्यसन नाही . "

    " हो ना भाई "

    " बाकी गल्लीत अजून काही नविन ."

    " हा भाई एक नविन बोका आलाय गल्लीत . मग घेतला का नाय त्याचा क्लास .  "

    " नाय भाई एकदम बिल्डर आहे . दोघा चौघाला पण नाय ऐकणार . "

    " मग असूदे त्याच्याकडे बघू नंतर . आता जाऊ जरा मांजरी बघून येऊ . "  

No comments:

Post a Comment